मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ ; नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल ! अत्यंत उपयुक्त अशी माहिती

आरोग्य

मित्रांनो, अनेकजण मांसाहारी जेवणाचे शौकीन आहेत. परंतु मित्रांनो हे जेवण जेवढे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तेवढेच घातकही ठरू शकते. त्यामुळे काही गोष्टी पाळून मांसाहार करावा. ज्यामुळे आपणाला त्याचा काहीच वाईट परिणाम शरीरावर होणार नाही. जर तुम्ही मांसाहारी असाल आणि तुमच्या आहारामध्ये मटणाचा समावेश असेल तर मित्रांनो ही माहिती अगदी काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा. कारण मटन खाल्ल्यानंतर असे कोणते पदार्थ आहेत की जे आपण चुकूनही खाऊ नयेत. याचीच माहिती आपण घेणार आहोत.

मित्रांनो मटण खाण्याचे तसं पाहिलं तर अनेक फायदे आहेत. ज्या लोकांना शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते किंवा लोह कमी असतं अशा लोकांनी मटण नक्की खावं. मटण खाल्ल्याने कॅल्शिअमचे प्रमाण शरीरामध्ये वाढतं. परिणामी हाडे मजबूत होतात. तसेच ज्या लोकांना रक्ताची कमतरता असते, शरीरामध्ये रक्त कमी पडतं, हिमोग्लोबिन कमी झालेल आहे अशा लोकांना तुम्ही पाहिले असेल की डॉक्टर्स हे मटण खाण्याचा सल्ला देतात. कारण मटनामध्ये तुमच्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी, हिमोग्लोबिनची मात्रा वाढवण्यासाठी, आयर्न म्हणजेच लोहाची मात्रा मोठ्या प्रमाणात होते.

अशा या सर्व फायद्यांसाठी आपण मटण नक्की खायला हवं. मात्र मित्रांनो मटण खाल्यानंतर काही पदार्थ मात्र आपण चुकूनही खाऊ नयेत. कारण हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये अशा काही केमिकल रिएक्शन होतात. अशा काही रासायनिक अभिक्रिया होतात की, त्याचा परिणाम हा आपल्या एकंदरच आरोग्यावरती खूप गंभीरपणे जाणवतो आणि म्हणून मित्रांनो हे पदार्थ आपण खाऊ नयेत. चला तर पाहूया की हे पदार्थ कोणते आहेत.

मध
मित्रांनो पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मध. मटण खाल्यानंतर किंवा मटण खाण्यापूर्वी आपण चुकूनही मध खाऊ नका. कारण मधामध्ये जे घटक आढळतात या घटकांचा ज्यावेळी मटणाशी रासायनिक अभिक्रिया होते. त्यातून जे पदार्थ निर्माण होतात किंवा जे विषारी पदार्थ निर्माण होतात. त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावरती, आपल्या किडनी तसेच आपली आंतरेंद्रिये असतात यावर खूपच वाईट परिणाम होऊ शकतो. शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम करणारा असा हा पदार्थ आपण मटण खाल्ल्यानंतर किंवा मटण खाण्यापूर्वी चुकूनही खाऊ नये.

हे वाचा:   डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी फक्त एक वेळा हा उपाय करा दाढ दुःखी, १००% कायमची बंद एका मिनिटांत दातातील किड बाहेर दातांचे दुखणे ठणका मारणे कायमचे बंद ....!!

दूध
मित्रांनो पदार्थ नंबर दोन म्हणजे दूध म्हणजेच मिल्क. आपल्या सर्वांना माहीत असेल आपले आजोबा किंवा पूर्वज सुद्धा आपल्याला सांगून गेले आहेत कि, दुध किंवा दुधाचे पदार्थ हे मटणाबरोबर किंवा मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत. मित्रांनो याला अपवाद केवळ एक पदार्थ आहे आणि तो म्हणजे दही. दही हे मटणा बरोबर वापरू शकता. मात्र दूध हे चुकूनही मटणा बरोबर किंवा मटणानंतर खाऊ नका किंवा पिऊ नका. मित्रांनो दुधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात आणि त्यामुळेच या अँटिबायोटिक गुणधर्मांचा आणि मटणाचा जवळून संबंध येतो. त्यावेळी केमिकल रिअक्शन मधून खूपच भयंकर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो याची तुम्ही कल्पनासुध्दा करु शकत नाहीत.

मित्रांनो आजकाल बर्‍याच लोकांना अंगावरती कोड फुटणे असा आजार आढळतो. हा काही गंभीर आजार नाही. मात्र समाजामध्ये या आजाराबद्दल खूप भीती आढळते आणि म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या अंगावर कोड फुटू नये हा आजार होऊ नये तर मित्रांनो हे दोन विषम पदार्थ म्हणजेच मटण आणि दूध यांचे एकत्रित मिश्रण कधीही घेऊ नका.

जर तुम्हाला दूध घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही थेट दुसऱ्या दिवशी दुध घ्यायला हवं. कारण मटण पचण्यास कमीत कमी बारा ते चोविस तासांचा कालावधी लागू शकतो. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की दुधाचं सेवन आपण मटण खाल्ल्यानंतर चुकूनही करू नये.

चहा
मित्रांनो तिसरा पदार्थ म्हणजे चहा. बऱ्याच लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या सवयी असतात. बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. तर मित्रांनो ही अत्यंत चुकीची सवय आहे. कारण यामुळे गॅस, एसिडिटी आणि अनेक प्रकारचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते आणि म्हणून जेवण केल्यानंतर आपण चहा पिणे टाळावे. मटण खाल्ल्यानंतर चुकूनही चहा घेऊ नका. कारण एक तर आपण चहामध्ये दूध वापरत असतो. भारतीय लोक चहामध्ये दुधाचा वापर करतात आणि म्हणून मटण खाल्यानंतर चहा घेऊ नये.

हे वाचा:   फक्त दोन थेंब कानात टाका आणि चमत्कार पहा कानाच्या सर्व समस्या कायमच्या गायब सर्दी, खोकला चुटकीत गायब .....!!!!!

सिगारेट
मित्रांनो अजून एक पदार्थ म्हणजे सिगारेट ओढने. आजकाल सिगारेट ओढण्याची सवय अनेकांना केलेली आहे. जेवणानंतर ज्यावेळेस तुम्ही सिगारेट ओढता किंवा मांसाहार केल्यानंतर सिगारेटचे तुम्ही सेवन करता. त्यावेळी धूम्रपान केल्याने याचा वाईट परिणाम शतपटींनी वाढतो. म्हणजे तुम्ही रेग्युलर ज्यावेळेस धूम्रपान करतात त्यावेळीही त्याचे दुष्परिणाम आढळतात. त्याच्या कितीतरी पट अधिक दुष्परिणाम हे जेवण केल्यानंतर धूम्रपान केल्याने दिसून येतात.

झोप
मित्रांनो शेवटची गोष्ट म्हणजे झोप. जेवण झाल्यानंतर लागलीच झोपणे टाळा. जे लोक जेवण झाल्याबरोबर अर्धा-पाऊण तास झोपतात. या लोकांना अपचनाचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतात. छातीमध्ये जळजळ होते. पित्ताचा प्रकोप इतका वाढतो की पित्त असह्य होते.

मित्रांनो मटनामध्ये आपण पाहतो की तेलाचे, तिखटाचे प्रमाण तसेच मसाल्याचं प्रमाण फार मोठं असतं आणि म्हणून मटण खाल्ल्यानंतर मित्रांनो झोपण्याचा प्रयत्न करू नका. किमान अर्धा ते पाऊण तास तरी आपण मटन खाल्यानंतर झोपू नये. वामकुक्षी पंधरा ते वीस मिनिट आपण घेऊ शकता.

तर मित्रांनो तुम्ही देखील मटणाचे सेवन करत असाल तर वर सांगीतलेल्या गोष्टी, पदार्थांचे सेवन करणे टाळा. यामुळे कोणताही वाईट परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *