कुटे भेटलीच तर घेऊन या, या वनस्पतीची पाने आयुर्वेद ज्याची 100 % खात्री देतो तीच ही वनस्पती, या नंतर परत दवाखान्यात जाणे बंद कराल ….!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती असतात. औषधी वनस्पतीचे आयुर्वेदिक गुण जाणून घेणे अत्यंत फायदेशीर ठरते. ते आपल्या अनेक रोगांवर अत्यंत उपयुक्त असतात. म्हणूनच आज आपण एक अशा वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत की, जी वनस्पती सांधेदुखी त्याचबरोबर गुडघेदुखी आणि आमवात यांसारखे आजार कमी करते. त्याचबरोबर अन्य दहा रोग ही लगेच बरे करते. ही वनस्पती कोणती व या वनस्पतीमुळे कोण कोणते रोग बरे होतात? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या अशा या अत्यंत गुणकारी अशा वनस्पती बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबद्दल यामुळे आपल्या मानवी शरीरात कशा पद्धतीने फायदा होतो आणि त्याचा वापर कसा करायचा याचीही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो ही जी वनस्पती आहे ती म्हणजे कपाळफोडी. मित्रांनो कपाळफोडी या वनस्पतीस कानफुटी, कर्णस्फोटा अशीही स्थानिक नावे आहेत आणि याला भारतात काही ठिकाणी तिला तेजोवती या नावाने ओळखले जाते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या वनस्पतीचे इंग्रजी नाव हे याच्या बियांचा आकार हृदयासारखा असल्याने इंग्रजीमध्ये हार्ट पी असे म्हणतात. फळे फुग्यांसारखी दिसत असल्याने त्याला बलून वाईन असेही म्हणतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो कानफुटी ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचे वेल महाराष्ट्रातील जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते. ही वर्षायू वेल आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या वनस्पतीची पाने असतात ती पाने – संयुक्त, एकाआड एक, कडूलिंबाच्या पानासारखी दिसतात.

हे वाचा:   कसलेही जुनाट फंगल इन्फेक्शन, पावसाळ्यामधील दाद, खाज, खुजली मुळापासून गायब करा फक्त पाच मिनिटात : डॉक्टर स्वागत तोडकर उपाय !

आणि याची जी फुले असतात ती लहान, पांढरी, द्विलिंगी, अनियमित, पानांच्या बेचक्‍यातून येणाऱ्या नाजूक छत्राकार पुष्पमंजिरीत येतात. पुष्पमंजिऱ्यांच्या टोकापासून प्रताने तायर होतात. प्रताने आधारास गुंडाळतात व वेलीला वर चढण्यास मदत करतात आणि पुष्पमुकुट चार दलांचा, दोन दले लहान, तर दोन मोठी. पाकळ्या चार, दोन लहान, दोन मोठ्या आकाराच्या असतात. पाकळ्यांची टोके गोलाकार. पुंकेसर आठ, पाकळ्यांपेक्षा लांब. बीजांडकोश तीन कप्पी. फळे त्रिकोणी, फुंग्याप्रमाणे हवेने भरलेली आणि याच्या बिया तीन असतात आणि काळसर रंगाच्या. बियांच्यावर पांढरा ठिपका असतो.

आणि मित्रांनो या वनस्पतीला ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत फूल व फळे येतात. तर मित्रांनो अशा या वनस्पतीच्या प्रत्येक भागाची उपयोग मानवी शरीराला होतो आणि यामुळे आपल्या अनेक समस्या त्याचबरोबर आजार दूर होण्यासही खूप मदत होते तर आता मित्रांनो आपण यापासून आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात आणि याचा वापर करून आपण कोण कोणत्या आजारांवर मात करू शकतो याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेऊया.

कपाळफोडीच्या पानांची भाजी करतात. जीर्ण आमवातामध्ये पानांची भाजी खाण्याची प्रथा आहे. ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणे, मलाविरोध यामुळे अंग जखडल्यासारखे वाटणे अशा विकारात कपाळफोडीच्या भाजीने चांगला गुण येतो. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल, अंगावरून कमी प्रमाणात जात असेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो. परमा तसेच गुप्तरोगामध्ये या भाजीचा उपयोग होतो आणि त्याच बरोबर ही वनस्पती आमवातावरील उत्तम औषध आहे. औषधामध्ये वनस्पतीचे पंचांग वापरतात.

हे वाचा:   कुठे भेटल्या तर नक्की घेऊन या ह्या वनस्पतीच्या शेंगा आणि अश्या वापरा जे फायदे होतील त्या पुढे लाखो रुपयांची औषधे पण फेल होतील असे चमत्कारिक फायदे ...!!

आणि मित्रांनो आमवातामध्ये मुळांचा काढा करून देतात आणि पाने एरंडेल तेलात वाटून सुजलेल्या सांध्यावर बांधतात आणि काहीवेळा पाने वाटून एंरडेल तेलाबरोबर पोटात देतात. यामुळे घाम सुटतो व ताप उतरतो. जुलाब होतात. सांधेदुखी कमी होते आणि केशसंवर्धनासाठी पानांचा वापर करतात. स्त्रियांच्या विटाळपणात विटाळ वाढण्यासाठी पानांचा अंगरस देतात आणि सांधेसुजीवर पंचांग पाण्यात किंवा दुधात वाटतात व लेप करतात. यामुळे ठणका कमी होतो व सूज उतरते. कानदुखीत तसेच कानफुटीत कानात घालतात. यामुळे कानदुखी थांबते म्हणूनच या वनस्पतीला कानफुटी असेही नाव आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *