आपण या दिशेला पाय करून झोपलो की माता लक्ष्मी घर सोडून जाते…आजच जाणून घ्या

अध्यात्म

आज आपण जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या दिशेने पाय करून अजिबात झोपू नये. जर तुम्ही या दिशेला पाय करून झोपलात तर पैसा निघून जातो तुमच्या घरात पैशाची तंगी निर्माण होते. वास्तुशास्त्रा असं मानत की प्रमुख चार दिशा आहेत आणि चार उपदिशा आहेत. त्यापैकी पैसा नष्ट करणारी दक्षिण दिशा आहे. म्हणूनच आपण रात्री झोपताना दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये.

या दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने आपल्या घरातील लोक वारंवार आजारी पडतात. आणि आजारावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो परिणामी घरामध्ये तंगी निर्माण होते. तसेच त्या घरात नवीन उद्योग व शुभ कार्य पार पडत नाहीत या कामात सतत अडथळे निर्माण होतात. तसेच दक्षिण दिशा ही यम देवाची दिशा आहे.

म्हणून या दिशेला पाय करून झोपलं की आपण मृत्यूकडे वाटचाल करतो असा अर्थ होतो. माता लक्ष्मी आणि कुबेर यांना ही दक्षिण दिशा अशुभ असते. म्हणून या दिशेला पाय करून झोपलेल्या व्यक्तीला माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना अप्रसन्न करून मृत्यूच्या दिशेला वाटचाल करत आहे असा अर्थ होतो. म्हणून दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये. याचा आरोग्यदृष्ट्या तसेच धन संपत्तीच्या बाबतीत देखील तोटे होतात.

हे वाचा:   घराजवळील पिंपळाचे झाड तोडल्यावर काय होते ? काय असतात संकेत “शुभ की अशुभ” नक्की वाचा महत्वपूर्ण माहिती …..!!

दक्षिण दिशेला पाय करून झोपण्याचा आणखीन एक तोटा म्हणजे घरातील लोकांची उंची वाढण्यास भरपूर समस्या येतात. तुम्ही निरीक्षण करा की तुमच्या आसपास जे लोक दक्षिण दिशेकडे पाय करून झोपतात त्यांची उंची लवकर वाढत नाही. आणि वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर दक्षिण दिशेला पाय करून झोपणे हे चुकीचे आहे. या मागे अनेक शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत.

दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने झोप नीट लागत नाही. तसेच रात्रभर वाईट स्वप्न पडत राहतात आणि आपल्या हृदयावर सुद्धा दाब निर्माण होतो आणि यामुळे जीव घाबरुन जाणे, दजकुन उठणे आशा समस्यांना सामोरं जाव लागतं. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीची जागा ठरवली आहे. आणि त्याच प्रमाणे प्रत्येक दिशेला वेगळ महत्व आहे.

हे वाचा:   A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो बघा.. A नावाच्या व्यक्तींचे जीवन, प्रेम, करीयर कसे असते..सर्व माहिती

उदा : देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात राहावे. तसेच स्वयंपाक घर अग्निय कोपऱ्यात असावं अस म्हंटलं जातं. या नियमांचे पालन करणं शक्य नसतं आणि हे प्रभावीक आहे. मात्र कमीतकमी आपण झोपण्याचे नियम पाळू शकतो.

आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपणं आपण टाळू शकतो. कारण निवांत झोप घेणं हे प्रत्येकाची गरज असते. आणि म्हणून झोपण्यासाठीचे काही नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. त्या नियमाचे पालन करून आपण निवांत झोप अनुभवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *