मध्यरात्री जंगलाच्या वाटेवर असं काय भयानक दिसलं की एसटी ड्रायव्हर सुद्धा…….. एक सत्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही …!!

अध्यात्म

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चढ-उतार हे येतच असतात. काही वेळेस आपणाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर काही वेळेस आपल्याला खूपच सुखाचे दिवस देखील येत असतात. म्हणजेच आपणाला जीवनामध्ये अनेक चढ-उतार हे येतच राहतात. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात या गोष्टी आपल्या मनामध्ये घर करून राहतात. म्हणजेच ते विसरणे शक्य नसते तर असाच एका एसटी ड्रायव्हर दादांचा आज आपण अनुभव पाहणार आहोत आणि हा एक सत्य अनुभव आहे आणि हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या देखील अंगावर शहारे येणार आहेत. तर आपण त्यांच्या शब्दांमध्ये त्यांचा हा अनुभव जाणून घेऊयात.

नमस्कार मित्रांनो मी गणू. नुकताच मी एसटी ड्रायव्हर म्हणून रुजू झालेलं होतो. मी सकाळच्या शिफ्टमध्ये कामाला होतो आणि मी कधीच नाईट शिफ्ट केली नव्हती. परंतु एक वेळ अशी आली की मला नाईट शिफ्ट करावी लागणार होती आणि त्यावेळेस आम्ही सर्वजण एसटी डेपो मध्ये गप्पा मारत आम्ही सर्वजण ड्रायव्हर कंडक्टर बसलेलो असतानाच अनेक कर्मचारी हे आपापले अनुभव सांगत होते. म्हणजेच नाईट शिफ्टला काय झाले कोणाच्यातरी गाडी पुढे एखाद्या व्यक्तीला मेलेले असे अनेक अनुभव ते सांगत होते व त्यावेळेस एका काकांनी मला विचारलं तुला काही अनुभव आलेला आहे का?

त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की माझी ही पहिली नाईट शिफ्ट आहे. त्यावेळेस मग सर्वजण मला म्हणाले की जरासं जपून नाईट शिफ्ट कर. कारण अनेक अनुभव आपल्याला येत राहतात. मग त्यावेळेस मला थोडंसं घाबरल्यासारखे देखील झालं. आमची त्यावेळेस नाईट शिफ्ट ही भिवंडी ते करमाळा अशी होती. आम्ही नाईट शिफ्ट साठी निघालो. म्हणजेच मी बस चालवत होतो आणि माझ्या बाजूला रम्या नावाचा कंडक्टर होता. तो देखील माझ्यासोबतच होता.

हे वाचा:   ज्या घरात स्वामींचे 11 गुरुवार चालू आहेत त्या प्रत्येक स्वामीभक्ताने हा लेख नक्की वाचा प्रत्येक स्वामी भक्तासाठी अतिशय महत्वाची माहिती …..!!

रात्रीच्या वेळी जरी एखाद्या व्यक्तीने हात केला तर त्या व्यक्तीला आपल्या बसमध्ये बसवून घेणे ही आमची जबाबदारीच होती. त्यावेळेस आम्हाला भिवंडी सोडून दोन तास झाले होते आणि आम्ही मेन हायवेवर प्रवास करत होतो आणि तो एकदम जंगलाचा रस्ता होता. त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते म्हणजेच जुलै महिना चालू होता आणि सर्वत्र खूपच गारवा होता. थंडी देखील वाजत होती आणि खिडकीतून एखादी वाऱ्याची झुळूक देखील येत होती.

कधी पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाची सळक देखील आमच्या अंगावर येत होती. रम्या मात्र आपल्या हातामध्ये तंबाखू घेऊन चोळत बसला होता आणि मनातल्या मनात गाणं देखील गुणगुणत होता. नंतर आम्हाला त्या जंगलाच्या वाटेवरती अचानकपणे मला एक व्यक्ती पळत गेल्यासारखा दिसला आणि नंतर रोड वरती आम्हाला खूपच रक्ताचे थेंब दिसत होते.

त्यावेळेस एकदमच आमच्या अंगावरती शहारे आली आणि आम्ही दोघेही घाबरलो आणि मी रम्याला देखील सांगितले की रस्त्यावरती खूपच रक्त पडलेल आहे. आम्हाला काही कळत नव्हतं. त्यावेळेस रम्या मला म्हणाला की तू बस फास्ट मध्ये ने. आपण लवकर करमाळ्यामध्ये जाऊ. त्यावेळेस खूपच काळोख होता आणि फक्त बसच्या लाईटने आम्हाला थोडाफार रस्ता हा दिसत होता आणि एकदम अचानकच मला थोड्या अंतरावरती एक प्रेत रोडवरती आडवे असलेले दिसले.

आणि एकदमच मी बसचा ब्रेक दाबला आणि मी रम्याला देखील सांगितले की कोणीतरी प्रेत त्या रोडवरती पडलेला आहे आणि त्या प्रेतावरती एक पांढरे कापड देखील होते आणि त्याचे पाय हे वेगळ्याच आकाराचे होते आणि पाय मात्र त्याचे उघडे होते. हे बघून तर आम्हाला खूपच भीती वाटली. त्यावेळेस रम्या म्हणाला की, बाजूच्या साईटने तू बस पुढे काढ आणि आपण थांबायला नको.

त्यावेळेस मी बस बाजूने घेत असतानाच एकदमच अचानक त्याचे पाय हालु लागले आणि प्रेत जणू उठूनच बसत आहे असा भास देखील आम्हाला झाला आणि बस काढत असतानाच ते प्रेत हळूहळू उठायला देखील लागलेलं होतं. त्यावेळेस एकदमच रम्या मला म्हणाला की बस फास्ट चालव. त्यावेळेस मी एकदम बस फास्टने घेतली.मी कशीबशी मी बस चालवत होतो.

हे वाचा:   त्या घरात काय घडते ज्या घरामधे कुत्रे पाळले जातात ९९% लोकांना माहीत नसलेली माहिती? तुमच्याही घरी कुत्रा असेल तर नक्की वाचा….!!

त्यावेळेस एवढी थंडी असताना देखील आम्हा दोघांना इतका घाम फुटला होता की तो हा अनुभव मी सांगत असताना आता देखील माझ्या अंगावरती शहरे येत आहेत. नंतर आम्ही पहाटेच्या वेळी करमाळ्याला पोहोचलो आणि हा अनुभव माझा अजूनही डोक्यातून जात नाही. त्यावेळेस नंतर काही दिवसांनी परत आम्ही डेपो मध्ये सर्व कर्मचारी गप्पा मारत बसलो होतो आणि त्यावेळेस मी माझा अनुभव हा सांगितला.

त्यावेळेस एक काका म्हणाले की ते प्रेतच असणार आहे तू बस फास्ट नेलीस म्हणून बरे झाले. तर दुसरे काका म्हणत होते की हे प्रेत नसून एखादी चोऱ्यांची टोळी असणार आहे आणि त्यांनी नाटक केले असणार आहे. त्यांची गॅंग ही आजूबाजूलाच असणार आणि तुम्ही बस थांबवल्यानंतर त्यांनी तुम्हाला तसेच तुमच्या बसमधील प्रवाशांना लुटले देखील असते.

त्यावेळेस कोणाचे म्हणणे खरे धरायचे हे कळत नव्हते. परंतु तो माझा हा अनुभव मी कधीही न विसरणार नाही. कारण पहिल्याच नाईट शिफ्टला मला असा हा अनुभव आलेला होता. ते प्रेत होते की चोऱ्यांची टोळी होती हे मला माहित नाही. परंतु हा अनुभव आजही माझ्या डोक्यातून जात नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *