२० वर्षांपासून स्वामीं दर्शन द्या, हाच हट्ट होता आणि शेवटी गुरुवारी स्वामींनी असे दर्शन दिले की संपूर्ण लातूर हादरले या स्वामी चमत्काराने …!!

अध्यात्म

मित्रांनो स्वामी महाराज हे प्रत्येक भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. म्हणजेच प्रत्येक भक्ताला कोणतीही अडचण आली तर त्या अडचणीतून ते मार्ग देखील दाखवतात. परंतु भक्ताने मात्र अगदी विश्वास आणि श्रद्धेने मनोभावे स्वामींची सेवा स्वामींचे मंत्र जप करणे खूपच गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही जी कोणती स्वामींची सेवा करता ती सेवा तुम्ही अगदी मनापासून करणे खूपच गरजेचे आहे. अनेक स्वामी भक्तांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आपल्याला माहीतच असतील. तर असाच एक अनुभव एका स्वामीभक्ताला आलेला आज आपण पाहणार आहोत. हा स्वामीभक्त लातूरचे आहेत आणि त्यांना हा अनुभव आलेला आहे. हा अनुभव आपण त्यांच्या शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत.

नमस्कार मित्रांनो मी उदय हरन लातूर मध्ये राहतो. मी पहिल्यापासूनच स्वामींच्या सेवेमध्ये आहे. स्वामी अडचणीत तुम्हाला मार्ग दाखवतात आणि हाच विश्वास मी सदैव माझ्या मनी बाळगतो. माझी स्वामींवर देखील खूपच श्रद्धा आहे. मला स्वामींची सेवा करायला खूपच आवडते आणि मी अगदी मनोभावे आणि श्रद्धेने स्वामींची सेवा अनेक मंत्र जप देखील करीत असतो.

तर मी अगदी दहा वर्ष स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि मला कशाचीही कमतरता नाही. कारण स्वामी हे माझ्या पाठीशी आहेत. दहा वर्षे झाल्यानंतर अचानकच मला कॅन्सरचा त्रास सुरू झाला आणि त्यावेळेस माझ्या घरातील देखील खूपच निराश झाले होते. परंतु या कॅन्सरवर मात करण्याची ताकद देखील मला स्वामींनी दिली. म्हणजेच माझा कॅन्सर हा पूर्णपणे बरा झाला. परंतु मी मात्र माझ्या स्वामींची सेवा करणे सोडून दिले नाही. मी आजही स्वामींची सेवा करीत आहे.

हे वाचा:   घरामध्ये कासव असेल तर ही एक चुक अजिबात करू नका नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद उपयुक्त अशी माहिती …!!

फक्त मी स्वामींकडे एकच मागणी मागतो की स्वामी महाराज मला फक्त तुमचे दर्शन द्या आणि हे मी प्रत्येक सेवेमध्ये स्वामींना सांगत असतो. तर असेच स्वामींचे अनुभव अनेक भक्तांना आलेले आहेत. परंतु मला स्वामींचे दर्शन स्वामिनी द्यावी अशी माझी खूपच इच्छा होती. मी स्वामींचे मंत्र जप सेवा करीत होतो. तसेच गुरुचरित्र पारायण देखील करीत होतो.

अशाच एके दिवशी म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी माझे गुरुचरित्राचे उद्यापन देखील होते आणि त्या तयारीत मी होतो. परंतु काय माहित की त्या दिवशी मला वेगळेच वातावरण वाटत होते. पूर्ण अगरबत्ती धूपचा वास असा दरवळत होता अगदी मला वाटत होते की स्वामी आज मला दर्शन देणार आहेत असे मला मनोमन वाटत होते आणि त्यावेळेस उद्यापणाची तयारी चालू होती आणि नंतर मी पाहिले तर आमचा जो मूळ देव्हार होता म्हणजे आता सध्या माझा देव्हारा दुसऱ्या ठिकाणी आहे आणि जो मूळ देव्हार ज्या ठिकाणी मी स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती त्या ठिकाणी एक नाग अचानक तिथे आम्हाला सर्वांना दिसला आणि आम्ही सर्वजण एकदम चकित झालो.

त्यानंतर काही मिनिटातच आणखीन एक नाग तिथे उभा राहिला. त्यावेळेस मात्र सर्वजण आरडाओरडा करू लागले आणि सर्वजण अगदी थक्क होऊन पाहू लागले. अक्षरशः कोणालाच काही कळेना की दोन नाग कसे काय? त्यावेळेस सर्वजण म्हणाले की एक नाग आणि एक नागिन असे असणार आहेत. त्यावेळेस सर्वजण मला बाहेर जा म्हणून सांगत होते परंतु मी तिथून बाहेर गेलो नाही आणि दोनच मिनिटांमध्ये आणखीन दोन नाग त्या ठिकाणी उभे राहिले आणि हे आश्चर्य पाहून तर सर्वजण थक्क झाले.

हे वाचा:   शरीरावर या अकरा जाग्यावरील तीळ सांगतात तुमचे भाग्य, पहा काय असतात याचे अर्थ …!!

आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही कारण हे फक्त दृश्य मी एकट्याने पाहिले असते तर कुणाला खरंही वाटलं नसतं. परंतु आजूबाजूच्या लोकांनी देखील तिथे चार नाग असलेले सर्वांनी पाहिले आहेत आणि त्यावेळेस मात्र मला जाणवले की हे स्वतः स्वामी आहेत आणि स्वामींनीच मला दर्शन दिले आहे. कोणतीही वेळ वाया न घालवता मी लगेचच लोटांगण तिथे घेतले आणि स्वामींना मुजरा देखील केला आणि काही नंतर दोन पाच मिनिटांमध्ये ते सर्व नाग अदृश्य झाले आणि हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले.

आणि त्यावेळेस मी सर्वांना सांगितले देखील की हे स्वामींनी मला दर्शन दिलेले आहे. साक्षात स्वामी माझ्या घरामध्ये प्रगट झाले होते. तेव्हापासून माझ्या घरामध्ये सर्व काही खूपच चांगले आहे. जी माझी अडकलेली कामे देखील होती ती सर्व पणे पूर्णपणे झालेली आहेत आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये धनसंपत्तीची कमतरता देखील अजिबात भासलेली नाही. हे सर्व काही स्वामींमुळेच घडलेले होते आणि आज देखील मी स्वामींवर अगदी निष्ठेने, श्रद्धेने, अगदी विश्वासाने स्वामींची सेवा करतो. स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामींची सेवा आज देखील मी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *