मित्रांनो, काही लोक खूप देव देव करतात, खूप सारे कष्ट, पूजा करतात. पण त्यांना यश येत नाही आणि ते कधीही श्रीमंत बनत नाहीत. याची कारणेही तशीच आहेत. या व्यक्तींना त्यांच्या कामात खूप पैसा, सुख मिळत नाही. कारण त्यांच्या काही चुका असतात ज्यामुळे या गोष्टी घडत असतात. जरी पैसे आले तरी ते टिकत नाहीत आणि मळकट कपडे घालणाऱ्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी माता कधीच टिकत नाही. कामामुळे जर कपडे अस्वच्छ होत असतील तर ठीक आहे, पण जर कुणी मुद्दाम आळशीपणे अस्वच्छ कपडे परिधान करत असेल तर मात्र हे चुकीचे आहे. त्यामुळे ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही.
जो व्यक्ती अतिशय कठोर वाणीचा असतो, ज्या व्यक्तीचे शब्द हे अपशब्द असतात, सतत शिवीगाळ, श्राप, नकारात्मक बोलणे अशा व्यक्तीच्या घरी लक्ष्मी वास करत नाही. ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही आणि जी व्यक्ती सूर्योदयानंतर सुद्धा आणि सूर्यास्तानंतर सुद्धा झोपलेले असते अशी व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. हिंदू धर्मातील शास्त्रा नुसार आपण ब्रम्ह मुहूर्तावर उठावे तसे जमले नाही तर सूर्योदयापूर्वी उठावे ज्यामुळे लक्ष्मी कृपा सदैव राहते. ज्या व्यक्ती अस्वच्छ पायांनी झोपतात अशा व्यक्तींच्या घरात नेहमी आजारपण वाढते. सदैव आजारपण पसरलेले असते. त्यामुळे आलेला सर्व पैसा आजारपणासाठी खर्च होतो आणि त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्यावेळी झोपून राहू नये.
मित्रांनो सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या दोन वेळी माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वीतलावर विचरण करत असतात आणि आपल्या घरात प्रवेश करणार असतात. म्हणून ह्यावेळी आपण जर झोपलेलो असू तर त्यांचं आगमन आपल्या घरात होत नाही. कितीही मेहनत केली तरीही घरात पैसा येत नाही आणि मित्रांनो त्यामुळे धन संचय होत नाही व ती व्यक्ती श्रीमंत बनत नाही. तसेच जरी पाय धुतले व ओल्या पावलांनी झोपल्यास देखील लक्ष्मी माता घरी वास करत नाही. त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्यक्ती डोक्याला तेल लावून तेच पुन्हा शरीराच्या अन्य भागांना लावतात. त्या व्यक्तींच्या आयुष्यात माता लक्ष्मी वास करत नाही परिणामी त्या व्यक्ती श्रीमंत बनत नाहीत.
तसेच जय व्यक्ती चालताना नखाने गवत तोडतात किंवा जमीन नखाने उकरतात त्यांच्यावरही माता लक्ष्मी दृष्टी ठेवत नाही. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी सण समारंभाला पाहुणे हे येतच असतात. काही लोक पाहुणे आले की आनंदी होतात. तर काहीजण नाराज होतात. मित्रांनो ज्या ज्या वेळी आपण अतिथी आल्यावर नाराज होतो त्या त्या वेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी , परमेश्वर आपल्या वर नाराज होतो. कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरी आलेले असतात. म्हणून अतिथी घरी आल्यावर नाराज न होता त्यांचे स्वागत करावे. त्यांना योग्य तो मान द्यावा.
मित्रांनो, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा कधीही अपमान करू नका. त्यामुळे परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्या घरात नेहमी लक्ष्मी नांदते. त्याचबरोबर मित्रांनो देवपूजा करताना बरेच लोक आपल्या इष्टदेवतेचं पूजन करत नाही. देवघरात आपल्या इष्टदेवतेचा फोटो अथवा मूर्ती असावी. शक्य नसल्यास देवपूजा करताना आपल्या इष्टदेवतेचं स्मरण तरी करावे. कारण इष्टदेव हे आपले प्रथमदेव असतात आणि आपल्या कुटुंबाचे, वंशाची देवता असते. म्हणून इष्टदेवतेची पूजा दररोजच्या देवपूजेसोबत होणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या घरात इष्टदेवतेची स्मरण होत नाही. त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही. तुम्ही घरात कितीही पैसा आणा तो पैसा टिकणार नाही.
तर मित्रांनो अशा स्वभावाच्या असणाऱ्या व्यक्तीच्या घरात पैसा कधीच टिकत नाही. कितीही मेहनत घेतली तरीही पैशाची कमतरता भासतच राहते.