समोरच्या व्यक्तीला न दुखवता नको असलेले नाते कसे तोडावे एकदा वाचा आणि या पद्धतीने ते नाते तोडा….!!

मनोरंजन

मित्रांनो, प्रत्येक माणसाची नाती असतात आणि तो प्रत्येक नाते जपण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही नाती अशी असतात की जी नात्यातील व्यक्तीचा आपल्याला खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीपासून दूरच राहणे आपल्याला चांगले वाटत असते. अशा नातांना न दुखवता त्या समोरच्या व्यक्तीला न दुखवता नको असलेली नाती आपल्याला जर तोडायचे असतील तर आजच्या लेखांमध्ये आपण याविषयीची पद्धत पाहणार आहोत. की कशाप्रकारे आपण त्या व्यक्तीला न दुखवता ते नाते तोडू शकतो.

आपल्याला जे नाते न दुखावता लांब ठेवायचं आहे म्हणजे त्या नात्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही येणे जाणे, देणे घेणे, बोलणे बसणे कोणतेही नाते ठेवायचे नाही मग त्याला तोडणे हा शब्द कशाला जोडायचा, त्या पेक्षा आपल्या मराठी भाषेचा वापर करून दुरावा निर्माण करायचा असे म्हणावे. त्या साठी जाणे येणे बंद, फोन बंद, आमंत्रणे बंद, अगदी आपण खूप अडचणीत आहोत. कठीण काळात कसे बसे मार्ग शोधत आहोत याची बातमी त्या काना पर्यंत कशी पोहचेल तेवढी व्यवस्था करावी.

हे वाचा:   फक्त कष्ट करून कोणीही श्रीमंत होत नाही…. त्यासाठी हे पाच नियम नेहमी लक्षात ठेवा…!!

म्हणजे लोकं आपण हुन तोंड फिरवतात म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला. असा अनुभव येतो. बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. पण तसे खरच नाते तोडण्याइतपत लोक वाईट वागलेत का? अथवा आपल्या कठीण काळात हृदयाला बोचतील,असे शब्द दिले का? आपल्या परिस्थितीत आणखी भर टाकली असेल तर अशी मतलबी नाती काही कामाची नाही ती तोडलेली बरी या मताला मी सहमत आहे….

नाती अशी असावी जेथे सुख व दुःख वाटून घेणारी. माणसाच्या सुखात पाठीशी तर दुःखात बरोबर उभे रहाणारी. आठवण काढली तर नाव घेतल्या शिवाय उचकी न थांबणारी. नात्यात परकेपणा नको आपलेपणा हवा. नाहीतर सरळ म्हणावं पाहूणं तुम्ही उठा कडकडणं जावा. खरे पहाता नाती जोडायची असतात. पण ती लांब ठेवण्याची वेळ येते याची खन्त वाटते. मनाला पण लोक आपल्या नात्यातले असून ही परक्या सारखा व्यवहार करतात. मग वाईट वाटते. म्हणून माणूस निर्णयाला पोहचतो केवळ चुकीच्या कारणामुळे.

हे वाचा:   स्वार्थी मतलबी स्त्रीची 18 लक्षणे….. अश्या स्त्रियापासून सावध रहा?

अशाप्रकारे आपण समोरच्या व्यक्तीला न दुखवता नको असलेली नाती तोडू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *