खरं प्रेम कसे ओळखायचे ? तुमच्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडचे तुमच्यावर खरं प्रेम आहे का …!!

मनोरंजन

मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, मग ती व्यक्ती मुलगा असेल किंवा मुलगी. ती जेव्हा तुम्हाला मनापासून आवडते, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडता. यावेळी तुमची मैत्री ही होते. तुम्ही त्या व्यक्तीत गुंतत जाता. परंतु या वेळी तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे ती ही व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल का? यासाठीच आजच्या या लेखात आपण सात गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्यामुळे ती व्यक्ती तुमच्यावर खरी प्रेम करते आहे का ते तुम्हाला ओळखते.

१. ते सारखे सारखे तुमच्याकडे बघत असतात. मान्य आहे, कि अनेक कारणांमुळे सुद्धा काहीजण आपल्याकडे बघतात. पण सारखे सारखे बघणे म्हणजे समोरच्याला तुमच्यामध्ये Interest आहे, हे दर्शविते. मानसंशास्त्रज्ञ मार्क हेक्टर सुद्धा हेच म्हणतात, सारखे बघणे म्हणजे समोरचा तुमच्या प्रेमात आहे, ह्याचे लक्षण आहे. ह्या लोकांच्या तुम्ही नजरेला नजर द्यायला जाल, तर हि लोक हिकडे तिकडे बघण्याची Acting करतात. आणि ती व्यक्ती तुमच्याकडे बघत नाही असे तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करते.

२. ते तुमच्याकडे जास्त लक्ष देतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडते, तेव्हा ती बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवते, कारण तिला तुमच्या सोबत वेळ घालवायचा असतो. माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे, जी व्यक्ती त्याला आवडते, तिच्या सोबत तो जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला असे आढळून आले, कि एखादी व्यक्ती अचानक जास्तीत जास्त वेळ तुमच्या बरोबर Spend करत आहे. शक्यता आहे कि ती व्यक्ती तुमच्या प्रेमात असावी.

हे वाचा:   त्रास देणाऱ्या, आणि अपमान करणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं? एकदा नक्की वाचा ..!!

३. ते चांगल्या आणि वाईट काळात नेहमी तुमच्याबरोबर असतात. जेव्हा तुमच्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडतात, तेव्हा ह्या व्यक्ती फक्त शब्दाने सहानभूती देत नाही. तर ते तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात, त्यांच्या कृतीमधून दाखवून देतात. “वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे, तुमचे सुख त्यांचे सुख, तुमचे दुःख त्यांचे दुःख.. अशा व्यक्ती तुमच्या सुखदुःखामध्ये नेहमी तुमच्या सोबतच असतात. तुमची साथ कधी सोडत नाही.

४. त्यांना तुमच्या बद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात असतात. तुमच्या प्रेमात पडलेल्याला तुमचा वाढदिवस, तुमचा आवडता रंग, तुमचे आवडते पदार्थ लक्षात असतात. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ते आपल्यासाठी मन लावून करतात. आपल्याला काय आवडते काय नाही त्याबद्दल किती माहिती करून घेत असतात. हे त्याप्रमाणे वागत देखील असतात.

हे वाचा:   पगार कितीही कमी असुद्या, हे पाच नियम तुम्हांला बनवतील करोडपती पहा कोणते आहे हे नियम?

५. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या लोकांशी ते तुमची ओळख करून देतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडते, तेव्हा त्यांची इच्छा असते कि, तुम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना भेटावे. आणि त्यांना हि भेट करून देताना, फार अभिमान वाटतो.

६. तुमच्याशी बोलताना ते अनेकदा तुमच्या दोघांच्या भविष्याबद्दल बोलत असतात. भविष्याबद्दल बोलत असताना, ते तुम्हालासुद्धा त्यांच्या Planning मध्ये समाविष्ट करून घेत असतात. म्हणजे तुमच्याशिवाय ते भविष्याची कल्पना करू शकत नाही. असे होत असेल, तर मानशास्त्रानुसार, ते तुमच्या प्रेमात आहे.

७. ते तुमच्या दुर्गुणांचा स्वीकार करतात. सुरुवातीला प्रत्येक नात्यामध्ये, सगळे छान छानच चालू असते.पण काही कालावधी गेल्यानंतर एकमेकांचे दोष दिसायला सुरुवात होते, दुर्गुण दिसायला सुरुवात होते. जे तुम्हाला दोषासकट, तुमच्या दुर्गुणांसकट तुमचा स्वीकार करतात, ते खऱ्या अर्थाने तुमच्यावर प्रेम करतात.

अशाप्रकारे ह्या सात गोष्टींवरून आपल्याला कळू शकते की समोरच्या गोष्टी आपल्यावर खरे प्रेम करतो आहे का!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *