पायाचे दुसरे बोट मोठे असण्याचे संकेत काय? काय आहे रहस्य ! शुभ की अशुभ..जाणून घ्या

अध्यात्म

आपल्या पायाची बोटं आणि त्यांची ठेवण अनेकदा आपल्या नशीबाचे काही संकेत देत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायाची बोटंच नाही तर आपल्या श-रीरातील अवयवांची ठेवण आपलं भविष्य सांगत असतात. समुद्र शास्त्रानुसार आपल्या पायाची बोटे आपलं व्यक्तित्व , स्वभाव, जीवनात घडणाऱ्या गोष्टी यांबद्दल बरेच गुण दर्शवत असतात.

जर तुमच्या पायाच्या अंगठ्यानंतरचे प्रत्येक बोट जर क्रमानुसार लहान असेल तर त्याची एक रांग तयार होते. अशा व्यक्तींना विस्तृत ज्ञान हवे असते. तसेच एकदा सुरू केलेले काम मध्येच सोडत नाहीत, ते पूर्ण करूनच श्वास घेतात. तुम्ही अत्यंत प्रामाणिक असून धोका देणे हा तुमचा स्वभाव नाही; परंतु तुमच्यात एक कमकुवत बाजूसुद्धा आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी नसते, त्यामुळे अनेकवेळा तुम्हाला धो’का खावा लागतो.

तुमच्या पायाचा अंगठा इतर बोटांच्या तुलनेत लांब असेल तर तुम्ही अत्यंत चतुर आहात आणि तुमचे विचार रचनात्मक आहेत. प्रत्येक समस्या तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणात सोडवता. तुम्ही प्रत्येक प्रकरणातील विविध पैलू पाहू शकता आणि कोणत्याही एका गोष्टीवर अडून राहणे ही तुमची सवय नाही, हेच तुमचे वैशिष्ट्य आहे. याउलट जर तुमचा अंगठा लहान असेल तर तुम्ही मल्टिटास्किंग आहात. तसेच तुमच्यात प्रतिनिधित्व करण्याचा गुणही आहे. तुम्ही तुमचे विचार आणि शब्दांद्वारे इतरांना प्रभावीत करू शकता.

हे वाचा:   घरामधे या ठिकाणी काढावे स्वस्तिक, कधीही घरावर मोठे संकट येणार नाही..घरात, सुख, शांती, तसेच धन पैसाच पैसा येत राहील ….!!

जर तुमच्या पायाचे दुसरे बोट लांब असेल तर तुमच्यात लीडरशिपसाठी लागणारे आवश्यक गुण ठासून भरलेले आहेत. तुम्ही प्रत्येक काम तुमच्या पातळीवरच पूर्ण करण्याची क्षमता बाळगता. याउलट कोणतेही काम तुम्ही तुमच्या पद्धतीनेच करता किंवा करीत नाही, हा तुमच्यातील वाईट गुण आहे. यामुळे अनेकवेळा तुम्हाला नुकसान सोसावे लागते. तसेच ज्यांच्या पायाचे दुसरे बोट लहान आहे ते आपल्या पद्धतीने जीवन जगतात. कोणत्याही विपरीत परिस्थितीत अडकून राहणे किंवा विचार करत बसणे ही तुमची सवय नाही.

पायाचे तिसरे बोट ऊर्जा, कर्मशीलता आणि इच्छाशक्तीशी सं-बंधित असल्याचे चीनमध्ये मानले जाते. जर हे बोट इतर बोटांच्या तुलनेत लांब असेल तर तुम्ही ऊर्जावान आहात आणि स्वत:चे कोणतेही काम तुम्ही जबाबदारीने पूर्ण करता. तुम्ही तुमच्या करिअरबाबत अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहात. तुमच्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दृढनिश्चयी स्वभावाचे आहात.

जे ठरवले ते पूर्ण केल्यावरच श्वास घेता. या सवयीमुळे तुम्ही तुमच्या जवळच्यांसाठी आणि कुटुंबीयांसाठी सोडाच; पण स्वत:साठीही वेळ काढू शकत नाही. याउलट जर तुमचे तिसरे बोट लहान असेल तर तुम्हाला आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने, मजेने जगावासा वाटतो. तुमच्या पायाचे चौथे बोट जर लांब आणि सरळ असेल तर तुमच्यासाठी तुमचे कुटुंब सर्वांत महत्त्वाचे आहे.

हे वाचा:   A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो बघा.. A नावाच्या व्यक्तींचे जीवन, प्रेम, करीयर कसे असते..सर्व माहिती

याउलट ज्या लोकांचे हे बोट वाकलेले असते त्यांना जवळच्या नातेसं-बंधांमध्ये चढउतार बघायला मिळतात. असे लोक चांगले श्रोते असतात; परंतु कुटूंब/जवळच्या नातेवाइकांबाबत उदासीन राहतात. याच कारणामुळे इतरांच्या समस्या त्यांना स्वत:च्या वाटतात. असे लोक अत्यंत स्वच्छ मनाचे असतात.

पायाचे सर्वांत लहान बोट अत्यंत सरळ असेल तर तुम्ही तुमची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करता. हा स्वभावच तुमच्यासाठी घातक ठरतो. त्यामुळे जबाबदारी पार पाडणेच तुमच्यासाठी योग्य राहील. याउलट ज्यांचे हे बोट सहजपणे वाकते किंवा पायाच्या उर्वरित बोटांपासून वेगळे होते ते लोक साहसी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात.

पायाच्या बोटांमधील तर्जनी जर अंगठ्यापेक्षा लांब असेल तर असे लोक खूप भाग्यवान मानले जातात. असं बोट असणारी व्यक्ती सौभाग्य सूचक मानली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *