मुलाने आईला आश्रमात सोडलं : वडिलांचे वीस वर्षापूर्वीच पत्र वाचून मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली …!!

ट्रेंडिंग

मित्रांनो आई वडिलांची किंमत कळण्यासाठी स्वतः आई-वडील व्हावे लागते. किंवा आईची किंमत त्यांना विचारावी ज्यांची आई लहानपणीच वारलेली असावी. वडिलांची किंमत त्यांनाच विचारावी ज्यांच्या खांद्यावर लहानपणीच जबाबदारीचे ओझ पडलेल असाव. मित्रांनो आजवर आपण आमच्या पेजवर आपण कधी धार्मिक, कधी आरोग्यविषयक तर कधी जनरल नॉलेजवर आधारित विविध प्रकारची माहिती जाणून घेत आहोत. पण आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय येथे जाणून घेणार आहोत.

होय मित्रांनो आज आपण एका हृदयस्पर्शी आणि आपणाला चांगला बोध देणारी मिराताई नामक एका महिलेची आयुष्याची कहाणी येथे पाहणार आहोत. मित्रांनो मीराताई तशा खूप कष्टाळू, धार्मिक प्रेमळ वृत्तीच्या. मात्र नियतीने त्यांच्या बाबतीत सर्व काही अवघड वाईट करून ठेवलं. मीराताईंचे पती लग्न झाल्यापासून अव्यय काही वर्षातच म्हणजे त्यांना असणारी दोन मुले अगदी लहान असतानाच अपघातामुळे त्यांना सोडून गेले.

त्यानंतर त्या दोन लहान मुलांची आणि संपूर्ण संसाराची सर्व जबाबदारी मीराताईंच्यावरच पडली. त्यादरम्यान त्यांनी कपडे शिवून, लोकांची भांडी घासून आपला उदरनिर्वाह चालवला. यादरम्यान त्यांनी कितीतरी रात्री जागून अनेकांची कपडे शिवली. या कामाची त्यांना पैसे कधी मिळत कधी उशिरा मिळत. तर काही बुडवे लोक बुडवून जात. असं करत कधी पोटभर अन्न खायला मिळाले कधी नाही मिळाले.

स्वतः उपाशी राहायचं आणि मुलांना पोटाला खायला घालायचं असं करत आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं. त्यानंतर मुलांनी आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं. आता दोन्ही मुलं त्यांच्या संसारात लागली. त्यांनाही लहान लहान मुले बाळे झाली. हे सर्व सुरू राहिलं मात्र या दरम्यान वय वाढत गेलं. त्यांना मधुमेहाचा आजार सुरू झाला.

त्या मोठ्या मुलाकडे राहायला होत्या. सर्व कारभार मोठ्या सुनेच्या हातात होता. तेव्हाही सून त्यांना घरातील मोलकर्णीप्रमाणे वागणूक देत होती. एके दिवशी त्या जेवत असताना त्यांच्या सुनेने आम्ही जेवल्याशिवाय तुम्ही जेवायचे नाही इथपर्यंत सुनावल. त्या थांबल्या त्यांचे जेवण झाल्यानंतर जेवायला गेल्या तेव्हा तिथे कोरभर भाकरी शिल्लक होती. ना भाजी ना सांबर, आणि मुळात त्या होत्या मधुमेहाच्या पेशंट. त्यामुळे त्यांना भूक सहन होत नव्हती.

तेव्हा त्यांनी ती कोरभर भाकर घेऊन आपल्या छोट्या मुलाकडे जवळच राहत असलेल्या घरात गेल्या त्यावेळी त्याचा छोटा मुलगा आणि लहान असून हे जेवतच होती. त्यांना आनंद झाला आता मला पोटभर जेवता येईल असे त्यांना वाटले मात्र त्यांना पाहून त्यांच्या लहान सुनेने भाजीचे भांडे झाकून ठेवले. आणि त्यांनी ज्यावेळी भाजी मागितली. त्यावेळी भाजी संपली आहे जेवण आत्ताच आमचं झालं आहे असं सांगितले. आणि दोन भाकरी हातात देऊन पाठवल्या.

हे वाचा:   अद्रक मध्ये मिक्स करा ही एक वस्तू आणि काळीकुट्ट झालेली कढई मोजून फक्त एका मिनिटांत चमकवा …!!

यानंतर त्यांनी त्या दोन भाकरी घेऊन अक्षरशः पाण्याबरोबर त्या भाकरी खाल्ल्या. तर दुसऱ्याच दिवशी सुनेने त्यांना लहान दिरा कडे जाऊन राहण्यास सांगितले. तेव्हा लहान दीर म्हणाला आम्ही संध्याकाळी तिकडे येतो सर्वजण मिळून चर्चा करू आणि मग आईला कुठे ठेवायचे ते पाहू.

संध्याकाळच्या वेळी मीराताईंचा लहान मुलगा घरी आला. जेवण झाली चांगली चर्चा झाली. आणि दुसऱ्या दिवशी मीराताईंच्या या लहान मुलाने आपल्या आईला म्हणजेच मीराताईंना थेट वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं. यावेळी मीराताई खूप दुःखी होत्या रडत होत्या. तुम्ही म्हणाल तसे मी राहते पण मला वृद्धाश्रमात सोडू नका. अशी विनंती करून त्या हात जोडत होत्या.

मात्र मुलांनी आपल्या आईला म्हणजेच मिराताईंना म्हटलं आई तू आता इथेच रहा या मॅडम तुला पाहतील. आणि मीराताई रडत होत्या त्रास करून घेत होत्या हे सर्व पाहून देखील त्या मुलाने मीराताईंना तेथेच सोडून तो गेला. त्यादरम्यान आश्रमच्या मॅडम तेथे आल्या. त्यांनी मिराताईंना समजावलं. तुम्ही या आत आमच्या सोबत राहा. इथे मी सर्वजण अशीच मंडळी आहोत. आपण एकमेकांना सांभाळून घेऊ.

मीराताईंना थोडा आधार आला. त्या आश्रमात गेल्या. तेव्हा त्या वाढवणे त्यांना विचारल्या हा स्वेटर तुम्ही कुठून घेतला. त्यावर मीराताई म्हणाल्या मी हा स्वतः विणला आहे. मॅडम आल्या तुम्हाला येतोय विणकाम. हो मॅडम मला येतं. यावर मॅडम म्हणाल्या आता तुम्ही येथील सर्व मंडळींना ही काम शिकवाल. मीराताई हो म्हणाल्या आता आश्रमातील मंडळी नाही रोजगार मिळाला मीराताईंची कला आणि सर्व मंडळींचे परिश्रम त्यामुळे विणकामाचे काम किती वाढले. आश्रमाची उत्पन्न देखील वाढले. दिवसा मागून दिवस जात होते.

एके दिवशी आश्रमच्या वॉचमनने मीराताईंना सांगितलं ताई तुम्हाला कोणीतरी भेटायला आला आहे. यावर ताईंच्या डोळ्यात आशीर्वाद त्यांना वाटलं आपली मुलं आली असतील भेटायला. त्यांनी बाहेर जाऊन पाहिलं तर एक वकील त्यांना भेटायला आले होते. त्या वकिलांनी मीरा ताईंना सांगितलं. तुमच्या मिस्टरांनी तुमच्या नावावर ही जागा घेतली आहे आणि येथे एक घर देखील आहे आणि आता ही संपूर्ण प्रॉपर्टी करोडो रुपयांच्या पुढे आहे.

हे वाचा:   काळे पडलेले चांदीचे पैंजण हातही न लावता फक्त दोन मिनिटांत चमकवा घरच्या घरी, नवीन पहिल्या सारखे करा या घरगुती उपायाने ….!!

यावर मीराताई विचारत पडल्या. त्या म्हणाल्या यांनी तर मला असं कधी सांगितलं नाही. यावर वकील म्हणाले हे पत्र आहे या पत्रामध्ये त्यांनी सर्व लिहिलं आहे आणि त्यामध्ये एक आंतरदेशीय पत्र होतं. मिस्टर ची पत्र हातात घेऊन ते पाहताच त्याच्या डोळ्यात अश्रू तराळले. पत्रात लिहिलं होतं. मीरा तुला जेव्हा हे पत्र मिळेल तेव्हा मी असेल की नाही हे मला माहीत नाही. मात्र ही प्रॉपर्टी आणि हे घर तुझ्या जवळ असेल. मुलं तुझ्याबरोबर असतील नसतील. पण तू या प्रॉपर्टीवर सुख राहू शकशील. यासाठी मी ही तरतूद करून ठेवत आहे. तुला माझ्याकडून हे छोटस गिफ्ट समज.

मीराताई खूपच गहिवरल्या होत्या. इतक्यात त्यांची दोन्ही मुले तिथे आली आणि त्यांना म्हणाले आई घरी चल आमचे चुकले. यावेळी मीराताई सुरुवातीला मुलांना डोळे भरून पाहिल्या. खूप दिवसांनी मुलांना पहिल्याच मनात त्यांना थोडा आनंद होता. मात्र आत्ता माझ्याजवळ प्रॉपर्टी आल्यानंतर हे मला बोलवायला आले आहेत याची त्यांना जाणीव होताच त्यांनी आपला पाय मागे घेतला.

यावर मीराताईंनी विचार केला. मीराताई म्हणाल्या माझ्याकडे प्रॉपर्टी आली आहे म्हणून हे माझ्याकडे आले आहेत. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा यांनी मला अतिशय वाईट वागणूक दिली. यावरून यांना प्रेम माया भावना या गोष्टी काहीच नाहीत हे लोक फक्त स्वार्थी झाले आहेत.

त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी मुलांच्या कडे जाण्यास नकार दिला आणि आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या अनाथ आश्रमात असलेल्या सर्व सोबतीसाठी तसेच नव्या येत असणाऱ्या मंडळींसाठी चांगली सोय कशी होईल काही आजारी मंडळी असतील तर त्यांचे उपचार कसे होतील यावर खर्च करण्याचे ठरविले. आणि मुलांकडे जाण्यास त्यांनी नकार दिला. मुलांनाही यावेळी आईची चांगली किंमत कळाली होती.

तर मित्रांनो यावरून आपण आई-बाबा असणं आणि होणं या गोष्टी किती महत्त्वाचे आहेत आणि या गोष्टीला आपल्या आयुष्यात किती अनमोल किंमत आहे हे लक्षात आलं असेल. मित्रांनो मीराताईंची ही कहाणी आपणाला आवडल्या असल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण लेख, आपल्या जीवनासाठी चांगले बोध घेण्यासाठी आमच्या पेजला सातत्याने भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *