घरामधील किचनमधील नळ, वॉश बेसिन, बाथरूम मधील खराब झालेले नळ चमकवा आता फक्त मोजून पाच मिनिटांत …..!!

ट्रेंडिंग

मित्रांनो, आपल्यातील प्रत्येकाला आपले घर स्वच्छ व सुंदर हवे असते आणि यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही परिश्रम घेत असतो. घर म्हटलं की घरातली प्रत्येक वस्तू आलीच. घराची स्वच्छता म्हटली की घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ हवाच. परंतु बऱ्याच वेळा तुम्ही निरीक्षण केले असेल की आपल्या घरात असलेले पाण्याचे नळ स्वच्छ करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करूनही बाथरूम आणि स्वयंपाकघरातील नळांवर खाऱ्या पाण्याचे डाग तसेच राहतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे काही साधे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही नळावरील खारट पाण्याचे डाग सहज काढू शकता. यामुळे तुमचे बाथरूम आणि स्वयंपाकघरातील नळ काचासारखे स्वच्छ दिसायला लागतील.

तर मित्रांनो आपल्या वॉश बेसिन वर असणारा नळ किंवा त्याचबरोबर आपल्या बाथरूम मध्ये जो नळ असतो तो एक तर प्लॅस्टिकचा किंवा स्टीलचा असतो. तर मित्रांनो प्लॅस्टिकचा जो नळ असतो तो जास्त प्रमाणात खराब किंवा घाण होत नाही. परंतु मित्रांनो जो स्टीलचा नळ असतो तो वारंवार वापरामुळे आणि पाण्यामुळे खूप खराब होतो.

त्याचबरोबर त्या नळावर एक घर तयार होतो आणि यामुळे तो नळ लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर त्यावर पडलेले डाग बघितल्यानंतर आपल्यालाही ते लवकरात लवकर स्वच्छ करून घ्यावे असे वाटते. परंतु मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या वॉश बेसिनमधील तसेच बाथरूम मध्ये असणारे स्टीलचे नळ स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या संबंधित जे उपाय करतो त्यावेळी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते.

हे वाचा:   घरामधील हॉल, किचन, मधील स्विच बोर्ड साफ करा मोजून फक्त दोन मिनिटात एकदम स्वच्छ ……!!

त्याचबरोबर मित्रांनो स्वच्छ करण्यासाठी मार्केटमध्ये मिळणारे केमिकल किंवा इतर घटक हे खूप महाग असतात. त्याचबरोबर यांचा वापर केल्यामुळे आपल्याला हवे इतक्या प्रमाणात यावर असणारे काळे डाग निघत नाहीत आणि त्याचबरोबर इतकी महागडी केमिकल आणि पदार्थ वापरून सुद्धा आपल्या घरामध्ये जे स्टीलचे नळ आहे ते स्वच्छ होत नाहीत. त्यावर थोड्या प्रमाणात डाग हे शिल्लक राहतातच.

परंतु मित्रांनो अशावेळी जर आपण ही महागडे केमिकल्स घरामध्ये आणून त्यांचा वापर करणे ऐवजी आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही पदार्थांचा वापर करून घरामध्येच एखादे केमिकल जर आपण तयार केले तर यामुळे आपले घरामध्ये जे काही स्टीलचे नळ आहेत ते स्वच्छ होण्यास नक्कीच मदत होईल.

तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत. हा उपाय करत असताना मित्रांनो आपल्याला आपल्या घरामध्येच एक केमिकल तयार करायचा आहे. या केमिकलचा वापर आपण आपल्या घरामध्ये जे नळ आहेत स्टीलचे किंवा प्लॅस्टिकचे कोणत्याही नळ स्वच्छ करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यावर असणारे काळे काढून टाकण्यासाठी आपण या केमिकलचा वापर करू शकतो.

त्याचबरोबर मित्रांनो आपण हे जे केमिकल तयार करणार आहोत हे एक केमिकल तयार करण्यासाठी आपल्याला खर्च सुद्धा अगदी कमी येणार आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या काही वस्तूंचा वापर करून आपण एक केमिकल तयार करायचे आहे.

हे वाचा:   तोंडात विरघळणारी व महिनाभर टिकणारी नारळाची वडी/बर्फी कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत ..!!

मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला ब्लिचिंग पावडर घालायची आहे थोड्या प्रमाणात या ठिकाणी ब्लिचिंग पावडर घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ब्लिचिंग पावडर मध्ये कोलगेट घालायचे आहे कोलगेट देखील आपल्याला या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये वापरायचे आहे त्याच्यानंतर ना आपल्याला लागणार आहे ते म्हणजे रॉफ केरा क्लीन हे देखील आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये घालायचे आहे आणि याचा आता एका जुन्या ब्रशच्या म्हणजेच की जो वापरामध्ये ब्रश नाही.

आपण जो दात घासायला वापरतो त्या ब्रशच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे नळ काळे आहेत किंवा खूप घाण आहेत त्या नळांना या ब्रशच्या साह्याने घासायचे आहे ते मिश्रण थोडे थोडे लावून त्या ब्रशला ते घासायचे आहे आणि त्याच्यानंतर दोन ते तीन मिनिटं तसेच सोडून द्यायचे आहेत.

आणि त्याच्यानंतर ना आपल्या घरामध्ये असणारा भांडी घासायचा चोता घेऊन त्या नळाला थोड्यावेळ घासायचे आहे आणि त्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ नळ धुवून घ्यायचा आहे दोन-तीन वेळा तुम्हाला सलग असच करायचा आहे आणि त्याच्यानंतर न तुम्हाला तुमचा नळ स्वच्छ झालेला दिसणार आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *