हजारो रुपये वाचवणारा उपाय, घरातील ही एक वस्तू वापरून कमी चालत असलेली गॅसच्या फ्लेम घरच्या घरी ठीक करा मोजून फक्त पाच मिनिटात ….!!

ट्रेंडिंग

मित्रांनो, स्त्रियांची रोज सकाळी फारच घाई असते. अशावेळी आपण एका हाताने स्वयंपाक, एका हाताने इतर साफसफाईची किंवा बाकी कामं करत असतो. डोक्यात ऑफीसचे किंवा घरगुती विचार चालू असतात. खूपच घाईगडबडीने त्या कामे उरकत असतात. अशावेळी आपल्याला एका गॅसवर चहा, एकीकडे नाश्ता आणि एकीकडे जेवणाच्या डब्यातील पोळीभाजी असे सगळेच करायचे असते. अशावेळी गॅसची फ्लेम चांगली मोठी असेल तर सगळ्या गोष्टी झटपट होतात.

पण अनेकदा ही फ्लेम काही ना काही कारणाने लहान झालेली असते. त्यामुळे आपला स्वयंपाकात आणि ओट्यापाशी खूप वेळ जातो. सणावाराच्या वेळी तर एकावेळी जास्त पदार्थ करायचे असल्यावर आपली पुरती तारांबळ उडते.

तर गॅस बर्नरची फ्लेम अचानक कमी का होते? गॅस फडफडून बंद का होतो? य़ामध्ये कोणते बिघाड झाल्याने असे घडते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा सिलिंडर भरलेला असूनही अचानकपणे गॅस फडफडतो किंवा जातो. अशावेळी सतत गॅस लावावा लागतो. यामध्ये बराच वेळ जातो आणि स्वयंपाकाला आणि पुढच्या सगळ्या गोष्टींना उशीर होतो.काही वेळा तर गॅसची फ्लेम इतकी लो असते की एखादा पदार्थ व्हायला अर्धा किंवा पाऊण तास वेळ जातो. काही सोप्या युक्त्या वापरल्या तर ही फ्लेम मोठी करता येऊ शकते. या य़ुक्त्या कोणत्या आणि त्या कशा करायच्या हे समजून घेऊया.

हे वाचा:   मोजून फक्त एक मिनिटात १००% या पाण्याने चमकवा कितीही जुनाट तांब्या आणि पितळेची भांडी घरच्या घरी …!!

गॅसच्या बर्नरला बरीच छिद्रे असतात. ही छिद्रे त्यामध्ये घाण किंवा अन्नाचे कण अडकल्याने बंद होतात. त्यामुळे गॅसचे बटण मोठे असूनही गॅस अतिशय बारीक चालतो किंवा काही वेळा फडफडतो.

तर तुमच्याही मित्रांनो घरातील गॅस हा खूपच कमी असेल म्हणजेच त्याची फ्लेम खूपच लहान असेल तर अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी काही पद्धतीने आपल्या गॅस रिपेरी करू शकता. म्हणजेच त्याची फ्लेम ही वाढवू शकता. तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही आपल्या गॅसचे बर्नर आहे ते गॅसचे बर्नर बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि गॅस उलटा करायचा आहे.

आणि तुम्हाला त्यावेळेस दिसेल की दोन्ही साईडला पाईप असतात आणि त्या पाईपच्या वरच्या साईडला छिद्रे असतात म्हणजे होल असतात. तर तुम्ही आपण जो स्टोला पिन करतो अशा प्रकारची पिन तुम्ही घ्यायची आहे आणि त्या होलमध्ये तुम्ही पिन करायचे आहे. मित्रांनो स्टोव्हसाठी तुम्ही दोन नंबरची पिन वापरता. तर तुम्ही गॅस साठी चार नंबरची पिन घेऊन यायचे आहे.

हे वाचा:   घरामधील हॉल, किचन, मधील स्विच बोर्ड साफ करा मोजून फक्त दोन मिनिटात एकदम स्वच्छ ……!!

तुम्हाला कुठेही किराणा स्टोअर्स मध्ये चार नंबरची पिन दिली जाईल आणि ती पिन तुम्ही घरी घेऊन यायचं आहे आणि चार नंबरच्या त्या पीनने तुम्ही त्या होलमध्ये पिन करत राहायचं आहे आणि दोन्ही साईडला म्हणजे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला दोन्ही साईडला होल असतात त्या ठिकाणी तुम्हीही पिन करायचे आहे आणि नंतर परत गॅस सरळ करून बर्नल घालून तुम्ही गॅसची फ्लेम मोठी झाली आहे का हे पाहू शकता.

मित्रांनो जर फ्लेम अजूनही कमी असेल तर तुम्ही परत बर्नर काढून ठेवायचे आहेत बाजूला आणि गॅस उलटा करून त्या होलमध्ये थोडेसे खोबरेल तेल नकळतपणे सोडायचे आहे आणि नंतर तुम्ही त्या चार नंबरच्या पिनने थोडीशी पीन करत राहायचे आहे आणि नंतर परत व्यवस्थित गॅस करून घ्या. सरळ ठेवून बर्नर घालून तुम्ही फ्लेम बघू शकता.

तुमची गॅसची फ्लेम जेव्हा तुम्ही गॅस नवीन आणला होता त्यावेळेस अशी मोठी प्रेम होती तशीच तुम्हाला फ्लेम दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आपल्या गॅसची फ्लेम वाढवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *