बायकोला झाली भूत बाधा……. कुणी म्हणाले गाणगापूरला न्या… आणि पुढे जे भलतंच घडलं ते वाचून अंगावर काटा येईल …!!

अध्यात्म

मित्रांनो आपण 21व्या शतकात वावरत असताना आजही अशा काही गोष्टी समोर येतात की ते आपल्याला काही अंशी मान्यच करावे लागतात.. यामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा विषय बाजूला ठेवा… मात्र भूत बाधा किंवा वाईट शक्ती अजूनही कार्यरत असतात हे काहींच्या अनुभवावरून तर काही धार्मिक ठिकाणावरून स्पष्ट होते.

मित्रांनो असाच एक अनुभव आपले मित्र रोहित यांचा आपण आज येथे त्यांच्याच शब्दात जाणून घेणार आहोत. रोहित हे एका ऑफिसमध्ये नोकरी करतात आणि त्यांच्या घरी त्यांची बायको एकटीच असते. अशी त्यांची स्थिती असताना त्यांना याबाबत अनुभव कसा आला याचा पण जाणून घेऊ. या बाबत बोलताना त्यांनी सांगितले की…

मित्रांनो मी तसा विज्ञानवादी..! आत्ताच आपण चंद्रावर पोहोचून किती परिस्थितीची जाणीव करून घेतली आहे. जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात अगदी एका सेकंदाच्या आत काय स्थिती आहे हे आपण जाणून घेतो. फोन कॉल सोडा व्हिडिओ कॉल द्वारे काही वस्तू कुठे कधी ठेवले आहेत हे आपण दाखवून देतो. मग अशावेळी भूतबाधा करणी बाधा अशा गोष्टी मला पटत नव्हत्या. पण मला जेव्हा माझ्या बाबतीत हा अनुभव आला तेव्हा हे मला मान्य करावे लागले.

मित्रांनो फारसा विषयांतर न करता मी थोडक्यात माझा अनुभव येथे सांगतो. एक दिवशी ऑफिसमध्ये मला कामावरून यायला उशीर झाला. ऑफिसमध्ये उशीर झाल्यामुळे सर्वजण गेले होते माझे काम अजून बाकी असले नेहमी बराच वेळ थांबलो होतो. रामू काका म्हणजे आमच्या ऑफिसच्या शिपाई हे मी जाण्याची वाट पाहत होते. त्यादरम्यान ते झाले का साहेब जाऊ की लवकर हे वारंवार मला म्हणत होते.

साधारण साडेदहा वाजले असतील मी म्हटलं चला काका काम झाला आहे काकांनी कुलूप लावल ऑफिसला आणि आम्ही निघालो. काकांच घरी माझ्या रस्त्यावरच होतं. मी हेल्मेट घातलं काकांना बसा म्हटलं गाडी सुरू केली आमचा प्रवास सुरू झाला. काकांना मी म्हटलं काका आज खूप गडबड करत होता. यावर काका म्हटले अरे बाबा आज अमावस्या रात्र आहे. लवकर जाऊया.

यावर मी थोडा मिसकिलपणे हसलो.. माझे हे असले पाहून काकांनी मला उताऱ्यासाठी टाकण्यात येणाऱ्या लिंबूची एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट ऐकून मी चुकीच झालो आणि मी विचारात पडलो खरंच हे आता असे असू शकेल. भूत बाधा वाईट शक्ती सध्या कार्यरत असू शकतात.

हे वाचा:   वारूळातील हा किडा तुम्हाला बनवू शकतो करोडपती…करा फक्त हा उपाय

थोडा अंतरावर काकांचं घर आलं काका म्हटले सोडा मला इथे मी जातो पुढे जवळच घर आहे. मी त्यांना सोडलं आणि माझ्या घराकडे पुढे जायला निघालो वाट अंधाराची होती आणि प्रकार माझ्या गाडीचा हेडलाईट चा प्रकाश तो काळोख चिरत मला रस्ता दाखवत होता. इतक्यात मलाही एका ठिकाणी उताऱ्याचा टाकलेला लिंबू ज्याला हळदीकुंकू लावलेलं होतं असं दिसला.

तो पाहून मी थांबलो मी म्हटलं बघूया काय होतं आता. विचार करून तो लिंबू मी तिथून उचलला त्याला लावलेला हळदीकुंकू पुसलं आणि खिशात ठेवून घरी गेलो. घरात गेल्यानंतर तो लिंबू मी घरातील टेबलवर ठेवला आणि हात पाय धुवून फ्रेश होण्यासाठी गेलो. येऊन पाहतो तर काय त्या ठिकाणी तो लिंबू नव्हता.

मी बायकोला म्हटलं पूजा इथे ठेवलेला लिंबू काय झाला? यावर ती मला म्हणाली बरं झालं तुम्ही आज लिंबू आणला बराच विचारलं माझ्या पोटात खूप दुखत होतं म्हणून मी त्याची सर्वच करून आत्ताच प्यायली. मी म्हटलं काय? यावर ती म्हणली एवढं मोठं काय झालं. तिचं म्हणणं बरोबर होतं मी ही फारसं विषय न वाढता ठीक आहे म्हटलं सोडून दिलं.

त्यावेळी तर लगेच काय तिला झालं नाही दिवसांमध्ये दिवस दोन चार दिवस निघून गेले. एक दिवशी रात्री उशिरा कामावरून आलो गल्लीपर्यंत येऊन पाहतो तर काय माझ्या घराच्या बाजूने भरपूर लोक जमले आहेत आणि काही नाही काहीतरी बोलत आहेत. पुढे जाऊन मी विचारलं काय झाले. तेव्हा शेजारच्या काकू रागाने दात ओठ खात मला म्हणाल्या. तुझ्या बायकोचं डोकं वगैरे फिरलय काय बघ. ते बघ समोरच्या झाडावर बसली आहे.

मी पाहिलं तर पूजा झाडाच्या एका उंच ठिकाणावर जाऊन बसली होती. मी तिला हाक मारलं तेव्हा ती म्हणाली मला काही माहित नाही मी आता कसे ते पोहोचले मला उतरा. काहीतरी करून मी तुला खाली उतरलो माझ्या लक्षात माझी चूक आली होती. घरात गेल्यानंतर त्याला विचारलं असं कसं झालं तेव्हा ती म्हणाली मी भाकरी करत होते. आणि अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी चक्कर येऊन पडले. आणि मला जेव्हा जाग आली तेव्हा मी झाडाच्या फांदीवर बसले होते मला कोणी उतरत नव्हतं.

हे वाचा:   चुकूनही हिजड्याला कधीच देऊ नका ही वस्तू ; नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद .....!!

यावर तिला मी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेलो असता मी पाहिलं की तव्यावरती भाकरी करपलेली होती यावरून पूजा खरी बोलते आहे हे मला कळालं होतं. मला रामू काकांनी सांगितलेली गोष्ट पटली. मात्र त्यावर काय करायचं हे मला सूचना. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो पाहतो तर काय पूजा तापाने तापली होती. आता तर मला काय करायचं कळत नव्हतं.

यावर मी तात्काळ तिला दवाखान्यात नेऊन आणलं आणि थेट रामू काकांना गाठल. त्यांना सर्व खरखर सांगितलं. त्यांनी मला गाणगापूरला ताबडतोब घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मी घरी गेलो पूजाला घेऊन थेट गाणगापूर गाठलं. यादरम्यान तिच्या काही वेगवेगळ्या हालचाली ज्या मी कधीच पाहिल्या नव्हत्या अशा मला दिसत होत्या.

गाणगापूर येथे आम्ही पोहोचताच पूजेची तब्येत आणखीनच खालावली होती. कसेबसे मी मंदिरापर्यंत तिला नेलं. तिथे एका पुजाऱ्याने आम्हाला पाहिलं. काय झालं त्यांनी विचारलं. मी सर्व त्यांना सांगितलं. त्यांनी मला सांगितलं साडेअकरा वाजता आरती आहे तोपर्यंत थांबा. आम्ही तिथेच बाजूला थांबलो.

आरती झाल्यानंतर त्यांनी तेथील भस्म पूजाच्या माती लावलं. यानंतर ती निपचिप शांत पडली. थोड्यावेळाने उठली आणि मला म्हणाली आता मला खूप हलकं वाटतंय चांगलं बरं देखील वाटतय. आता आपण कुठे आहोत. यावर मी जरा शांत करत समजावून सांगत घरी नलो. यानंतर मात्र पुन्हा कधी तिला हा त्रास झाला नाही.

मित्रांनो तुम्ही माना अगर ना माना मी ही माझ्या आयुष्यातील खरी गोष्ट घटना येथे नमूद केली आहे. आणि तेव्हापासून मी विज्ञान मध्ये असून देखील अंधश्रद्धा सोडा मात्र अजूनही जगात काहीतरी वाईट शक्ती कार्यरत असू शकतात हे खात्रीशीर जाणू लागलो आहे.

मित्रांनो आजच्या लेखात आपण रोहित यांना आलेला अनुभव पाहिला. आपल्याला देखील अशा स्वरूपाची काही अनुभव आली असेल ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आम्ही आमच्या या पेजवर निवडक अनुभव शेअर करत असतो. आपल्या अनुभवाला देखील प्रसिद्धी देऊ.मित्रांनो अशाच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *