देवपूजा करताना हे 6 संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहेत.

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देव पूजा भगवंतांची पूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की, मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते. देव आपल्यावर प्र स न्न होतात. आज आपण देवपुजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आपल्याला कळेल की, देव आपल्या सोबत आहेत. कधी कधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात.

पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण ते संकेत मानत नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही की, हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत. या संकेतांचा अर्थ असा असतो की, देव आपल्यावर प्र स न्न आहेत. देवाने आपली पूजा स्वीकारली आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत.

1) धूप किंवा अगरबत्ती : स्वामी भक्तहो आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच. देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धुपचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक स का रा त्म क आणि प्र स न्न वाटू लागते.

तेव्हा समजुन जा की, साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहेत आणि पैसा पैसा येणार आहे. ही स का रा त्म क ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते. आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्र स न्न वाटू लागते

2) भिकारी किंवा लहान बालक : स्वामी भक्तहो बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात. जर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की, आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत.

हे वाचा:   दही घरात घेऊन येताना ही 1 चूक करू नका…लक्ष्मी घर सोडून निघून जाईल ! घरात येईल दरिद्रता, गरिबी

भक्तहो त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचं पोट भरावं. लक्षात ठेवा अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते. त्यामुळे पूजेनंतर भुकेल्याला अन्न देणे हा देवाला प्र स न्न करण्याचा खूपच सोपा उपाय आहे.

3) दिव्याचा प्रकाश : स्वामी भक्तहो आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो. आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्यासमोर आहे. व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोहचली आहे.

आणि त्यांनी ती स्वीकारली आहे व त्यांचा आपल्यावर आ शी र्वा द आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे. अशा वेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर देवासमोर सांगाव्यात. आपल्या सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.

4) शुभ चिन्ह : आपण खूप वेळा पाहिलं असेल की, आपण लावलेल्या धूप अगरबत्तीचा धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात. तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम, स्वस्तिक किंवा इतर कोणत्या शुभचिन्ह दिसलं तर समजावं की, देव आपल्या पूजेने खूपच प्र स न्न झाले आहेत. आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत.

5) पाहुणे : स्वामी भक्तहो हिंदू धर्मात अतिथींना देव मानलं जातं. तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले व कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागावू नका. त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढे सेवा नक्की करा.

हे वाचा:   या सात गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, आणि बघत रहा तुमचेही चांगले.दिवस येतील ….!!

भक्तहो अशाने देव आपल्यावर प्र स न्न होऊन आपल्याला आ शी र्वा द देतात. पाहून येणे हा देवाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो. त्यामुळे देव प्र स न्न होऊन आपले सगळे संकट दूर होऊन घरी लक्ष्मीचा वास सदैव राहील लक्षात ठेवा. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये, त्यांचे मन दुखवू नये त्यांचा आदर करावा.

6) फुलाचा संकेत : स्वामीभक्त हो आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो. देवपूजा करताना जर अर्पण केलेले फुल आपल्यासमोर पडले तर समजा की, देव आपल्या पूजनाने खूप प्र स न्न झाले आहे. आणि त्यांनी आपल्याला आ शी र्वा द दिलेला आहे. फुलरूपी आ शी र्वा द देऊन भगवंत आपल्यावर प्र स न्न आहे.

हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर जातील. चांगले दिवस येतील हा संकेत देत असतात. स्वामी भक्तहो तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणते संकेत मिळाले तर समजून जा तुमच्या सोबत साक्षात देव आहे. मी तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरच दुर होणार आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *