सुविचार……कोणत्याही परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही अशीच असावीच? सुंदर सुविचार ..!!

मनोरंजन

मित्रांनो, आजकाल प्रत्येक जण आयुष्यामध्ये एक गोष्ट मिळवण्यासाठी त्याच्या मागे धावत असतात. परंतु या गोष्टीच्या मागे धावण्यात ते त्यांना वेळ वाया घालवतात की त्यांना ते गोष्ट साध्याच होत नाही. जर आपल्याला ती गोष्ट मिळवायचे असेल तर त्याच्या मागे न धावता त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि योग्य ते प्रयत्न आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असतात. आयुष्य खूप अनमोल आहे आणि या अनमोल आयुष्यामध्ये आपल्याला योग्य ते प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन करणारे काही सुंदर विचार आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे “आभार” माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना “हसून” माफ करा.

खरं तर आपलं कोण आणि परकं कोण हे ठरवण तसं कठीणच असतं, मतलब संपला की आपली असणारी अगदी जवळची माणसं परकी होतात, आणि श्वास थांबला की, ज्या शरीरावर माणूस खूप प्रेम करतो ते शरीर ही..

स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही.

नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच.

कित्येक पांढऱ्या शुभ्र कडक कपड्यात बेइमानी लपलेली असते पण मळलेल्या इमानदारी मेहनतीच्या कपड्याचा रंगच रुबाबदार असतो.

धान्य पाकडायला सुपाचा उपयोग केला असता खडे पुढे येतात आणि निघून जातात विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे.

जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नाहीत.

आयुष्यात माणसे कमवा पैसे तर भिकारी पण कमवतो.

आपण आपले गुण ओळखावे दोष सांगण्यासाठी लोक आहेतच पाऊल टाकायचे असेल तर पुढे टाकावे मागे ओढायला लोक आहेतच स्वप्न पाहायचे असतील तर मोठेपणाचे पाहावे कमीपणा दाखवायला लोक आहेतच.

आजकाल सगळेच अनोळखी वाटतात कितीही आपले असले तरी अर्ध्या चेहऱ्याने परकेच वाटतात डोळ्यांना ओळख पटते ही कधी, पण आतला तो, तोच आहे का..? की तोही बदललेल आपल्याला आतून असे प्रश्न भांबावत राहतात.

हे वाचा:   चल पळून जाऊ अन लग्न करू…..Marathi Love Story…. Heart Touching Love Story… ही Love स्टोरी वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ..!!

मग अंतराचे नियम पाळून न दिसणारे हसू दाखवत काहीही न बोलता जातो निघून आपण लांबूनच आणि तो बघतच राहतो, बदललेल्या आपल्याकडे !!

पानगळीची जाणीव ठेवून जगण्यातील बहर ओसरू न देता आयुष्याची परिपूर्णतेकडे वाटचाल, हे जर अनुभवायचं असेल, शिकायचं असेल, तर निसर्गाकडे गुरू म्हणून बघायला हवं. वैचारिक, भावनिक आणि मानसिक संवेदनशीलता आणि प्रगल्भता जपली की जगणे खऱ्या श्रीमंतीचा अनुभव घेत जातं… तृप्ती म्हणजे तरी शेवटी काय.

गरजेची चौकट यथाशक्ती आखून आयुष्याला त्याच्या हक्काचा मोकळा श्वास घेऊ देणं आनंद आणि जीवन क्षणांना एकमेकांना प्रतिसाद देत भरभरून जगू देणं… एक साक्षीदार म्हणत ही हिरवाई नजरेत जपत… कृतार्थ होणे म्हणजे तृप्ती.

माणसाच्या जीवनात जेव्हा चांगले घडते तेव्हा ती परमेश्वराची कृपा नसून तो पुण्याचा प्रभाव असतो, त्याप्रमाणे त्याच्या जीवनात जेव्हा वाईट घडते, तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो आपल्या सुखदुःखाला कारण देव किंवा दैवी नसून आपणच असतो, अशी ज्यांची धारणा असते तो प्रगतीच्या मार्गाला लागतो.

माणसातील माणुसकी जागृत करणे हाच खरा धर्म, हेच आहे शिक्षण आणि तोच आहे माणसाच्या सर्व समस्यावरील रामबाण उपाय.

ज्याचे जसे चरित्र असते तसे त्याचे मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते, माणूस कुठे पवित्र असतो फुलात सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात वाईट सोडून चांगलं बघा, माणसात सुद्धा देव दिसेल.

प्रेम बालपणी फुकट मिळते तरुणपणी कमवावे लागते आणि म्हातारपणी मागावे लागते हीच जीवनाची वस्तूस्थिती आहे.

माणसानं प्रामाणिक असावं स्वतःसोबत स्वतःच्या विचारासोबत… स्वतःच्या मनासोबत आणि स्वतःच्या तत्वासोबत.

सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडं आहेत आपण ज्याला जास्त खतपाणी घालू तेच जोरात वाढणार.

जीवनात अडचणी त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमीच जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत ते जिंकतात किंवा शिकतात.

हे वाचा:   कटू आहे पण सत्य आहे…मराठी सुविचार…. प्रत्येकवेळी जाऊदे म्हणून आपण समोरच्याचं बोलण मनावर घेत नाही पण ……!!

कधीकधी जिंकायचं असं की लोकांनी आपलं जिंकणं पाहून तोंडातच बोटं घातली पाहिजेत.

मनात काही धरून जगू नका नाहीतर मन भरून जगता येणार नाही.

चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे. इथं खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं.

आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता भासत नाही.

आयुष्यात तेवढ्या सुखाची अपेक्षा करावी जेवढे दुःख तुमची पचवण्याची क्षमता आहे कारण सुखाचे नातेवाईक असतात पण दुःख अनाथ असतं आणि आजकाल तर काहीजण सुखात तर सोडाच दुःखात पण त्यांचा फायदा बघून सामील होत असतात.

पहिले स्वप्न भंग झाल्यावरही दुसरे स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे “जीवन”.

कायम तोट्याचा विचार करणारे कधीच नफ्यात येत नसतात.

एखाद्या नव्या सुखाचा समावेश जिवनात व्हायचा असेल तर कुंपणाच्या मर्यादा बदलायला हव्यात.

अडचणीत असताना अडचणीत वाढ करणारा खरा मित्र नसून अडचणीतून मार्ग काढायला मदत करणारा खरा मित्र असतो, अशा दोलायमान परिस्थितीमध्येच चांगल्या वाईटाची, जवळच्या आणि दूरच्या लोकांची पारख होत असते, हीच खरी वेळ असते.

खरा माणूस, सच्चा मित्र पारखून घ्यायची, अन्यथा चांगल्या काळात हितशत्रू सुद्धा आपल्यासमोर घोळत असतात.

गरजेचे नाही की प्रत्येक वेळी वाईट कामाची शिक्षा भेटेल कधीकधी जास्त चांगलं वागण्याची सुद्धा शिक्षा मिळते.

नुसता बापाच्या नावावर सातबारा असून उपयोग नाही त्यासाठी बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे संस्कार लहानपणापासूनच असावे लागतात.

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल.

स्वप्न सांगायची नसतात ती खरी करून दाखवायची असतात.

वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणे हीच आपली ओळख असावी.

आयुष्यात कोणाला कितीही जीव लावा पण लोकांना आपल्या चुका दिसतात आपण लावलेला जीव नाही दिसत.

अशा प्रकारे आजच्या या लेखांमध्ये आपण सुंदर सुविचार जाणून घेतलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *