मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की दररोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच इतर बरेच फायदे मिळतात. धार्मिक श्रद्धांच्या आधारे आपण हिंदू कुटुंबात तुळशीच्या झाडाची पूजा केली जाते आणि तिला दररोज श्रद्धेने पाणी घातले जाते. पण तुळशीच्या पानांचा वापर भारत सोडून इतर देशांमध्येही सर्रास केला जातो. आयुर्वेदात तुळशीची पाने औषधी गुणधर्मांमुळे वापरली जातात. तुळशीच्या वापराने सर्दी-पडसं, खोकला व कमजोर रोगप्रतिकारक शक्ती व्यतिरिक्त शरीरातील कोणत्याही भागामध्ये जमलेल्या रक्ताच्या गाठींपासून आराम मिळतो. तर मित्रांनो अशा अनेक समस्यांवर हे तुळशीचे पान खूपच फायदेशीर आहे.
तर मित्रांनो आपण आज आपल्या ला होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर आणि आजारांवर कशा पद्धतीने या तुळशीच्या पानांचा वापर करून ते आजार दूर करू शकतो किंवा त्या समस्या दूर करू शकतो याबद्दलची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो जर तुम्हाला आपल्या मेंदूची शक्ती वाढवायची असेल म्हणजेच जर घरामध्ये लहान मुले असतील आणि त्यांच्या मेंदूचा विकास करायचा असेल किंवा तुम्हालाही जर विसरण्याची समस्या असेल तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही तुमचे दुपारचे किंवा संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर दोन पाने तुळशीची चावून खायचे आहेत. मित्रांनो यामुळे आपल्या मेंदूचा विकास होण्यास खूप मदत होते आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, कफ यांसारख्या समस्या आहेत अशा लोकांनी या तुळशीच्या पानांचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे. हे आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो ज्यांनाही सर्दी, खोकला यांसारख्या समस्या वारंवार निर्माण होतात आणि त्याचबरोबर त्यांच्या छातीमध्ये वारंवार कफ तयार होतो अशा लोकांनी या पानांचा वापर करत असताना दोन ते तीन पाने चावून खायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यावर एक चमचा मध घ्यायचे आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने सलग दोन ते तीन दिवस तुम्ही हा उपाय दिवसातून एक वेळा किंवा दोन वेळा करायला सुरुवात केली तर मित्रांनो यामुळे तुमचा छातीमध्ये कफ आहे तो बाहेर निघून जाईल. त्याचबरोबर तुमच्या सर्दी, खोकला यांसारख्या समस्या ही लवकरात लवकर दूर होण्यास मदत होईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील ज्या व्यक्तींना रात आंधळेपणा हा डोळ्या संबंधित आजार आहे त्या लोकांनी या तुळशीच्या पानांची दोन थेंब दिवसभरात कधीही आपल्या डोळ्यांमध्ये टाकायचे आहेत. यामुळे तुमची रात आंधळेपणा ही समस्या दूर होईल.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला अनेक वेळा कामावर असताना किंवा इतर कुठेही गेल्यानंतर अचानकपणे उचकी लागते. तर मित्रांनो अशा वेळी आपण दोन तुळशीच्या पानांचा रस आणि थोडासा लिंबूचा रस एकत्र करून घ्यायचा आहे. मित्रांनो यामुळे तुम्हाला जे उचकीची समस्या आहे ती दूर होईल.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल किंवा डोके दुखत असेल तर अशावेळी मित्रांनो काळीमिरी, आलं आणि तुळशीच्या पानांचा रस या तिन्ही पदार्थांचा काढा तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्यानंतर याचे सेवन आपल्याला करायचे आहे. मित्रांनो यामुळे आपल्याला आलेल्या ताप लगेच निघून जाईल.
त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या घरामध्ये वारंवार घास येत असतील किंवा त्याचबरोबर जर तुमच्या अंगणात ढास ढेकूण यांसारखी घटक येत असतील तर मित्रांनो अशावेळी तुम्ही तुमच्या दारामध्ये नक्की तुळशीचे झाड लावा. मित्रांनो ज्या ठिकाणी तुळशीचे झाड असते त्या ठिकाणी डास आणि इतर कीटक कधीही येत नाहीत.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील किंवा वांग यासारख्या समस्या जर तुम्हाला असतील तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही गुलाब जल आणि तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून तुमच्या चेहऱ्यावर मालिश करून नंतर थोड्या वेळाने गार पाण्याने चेहरा धुतला तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय थोड्या दिवसांपर्यंत केला तर तुमचे चेहऱ्यावर असणारे काळे डाग नक्की निघून जातील.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला जखम झाली असेल किंवा कोणता तरी किडा चावलेला असेल तर अशावेळी तुम्ही मित्रांनो तुळशीच्या पानांचा रस त्या जखमेवर टाका. त्यानंतर तुळशीच्या पानांची पेस्ट त्या जखमेवर लावा आणि त्याला कापडाच्या सहाय्याने घट्ट बांधा. मित्रांनो या उपायामुळे तुमची जखम लवकर भरून येण्यास नक्की मदत होईल.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल किंवा उष्णतेचा त्रास होत असेल तर मित्रांनो अशावेळी तुम्ही तुळशीच्या ज्या बिया असतात त्या रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत घालू शकता. सकाळी उठल्यानंतर त्या पाण्याचे सेवन तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या शरीरामध्ये असणारे उष्णता आणि पित्त यांसारख्या समस्या दूर होतील.
तर मित्रांनो असे हे तुळशीचे फायदे पाहिल्यानंतर असा प्रश्न निर्माण होतो की, कोणत्या प्रकारचे तुळस आपण या सर्व उपायांसाठी वापरायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारचे तुळस हे उपाय करण्यासाठी वापरू शकतात. परंतु शक्यतो काळ्या रंगाची जी तुळस असते तिचा उपयोग करून आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहेत.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही या तुळशीच्या पानांचे दररोज सेवन केले म्हणजेच दररोज किमान एक किंवा दोन तरी तुळशीचे पाणी सेवन केले तर यामुळे तुम्हाला तुमच्या पोटा संबंधित सर्व अडचणी दूर होतील. तुमची उष्णता पित्त या समस्या ही लवकरात लवकर दूर होण्यास मदत होईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो या तुळशीचे पानांचा वापर करून हे उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी ही पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याचा वापर उपायासाठी करायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.