मित्रांनो, प्रत्येक जण अंगदुखी, गुडघेदुखीने त्रस्त झालेले आहेत. थोडेसे जरी काम केले किंवा चालून आल्यास अनेकाचे गुडघे दुखायला लागतात. तसेच अंगदुखी मुळे देखील काही जण त्रस्त झालेले आहेत. या अंगदुखी, गुडघेदुखीवर अनेक प्रकारचे घरगुती उपाय जर आपण केले तर आपली ही अंगदुखी, गुडघेदुखी गायब होईल. अनेक जण डॉक्टरांचा सल्ला घेतात परंतु काही वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील आपणाला काहीच फरक जाणवत नाही.
मित्रांनो, कंबरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे, व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली, कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे यांसारख्या गोष्टींमुळे अगदी तरुण वर्गात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. एकाच जागी खूप वेळ बसून काम करणे सुद्धा याला कारणीभूत आहे. सुरुवातीला या वेदना अतिशय कमी असतात आणि त्यामुळे आपण त्याकडे फार लक्ष देत नाही. पण जस जसा काळ लोटतो आणि आपण यावर काहीच उपाय करत नाही तेव्हा या वेदना अतिशय वाढतात.
इतक्या वाढतात की त्या कधीही त्रास देऊ शकतात. अशावेळी मग वैद्यकीय सल्ला घेण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यामध्ये खर्च सुद्धा खूप येतो. म्हणून आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत वेळीच कंबरेच्या वेदनेवर आपण जर घरगुती उपचार आपण करू शकतो, जेणेकरून तुम्ही या आजारातून लवकर सुटका मिळवू शकाल.
मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामधील असाच एक प्रभावी उपाय पाहणार आहोत उपाय जर आपण घरामध्ये केला तर यामुळे आपल्याला असणारा गुडघेदुखी कंबरदुखी आणि मणक्यातील दुखणे यांसारख्या त्रासापासून आपल्याला त्वरित सुटका मिळेल आणि त्याचबरोबर जर आपल्याला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यासाठीही हा उपाय खूप गुणकारी आहे, मित्रांनो हा उपाय आहे तीळाच्या तेला संबंधीत. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला तिळाचे तेल आणि एक आयुर्वेदिक वनस्पती लागणार आहे आणि ती वनस्पती म्हणजे अस्तीसंधी किंवा
याला कांडवेल असेसुद्धा म्हणतात.
मित्रांनो या दोन गोष्टींचा वापर करून आपल्याला गुडघेदुखी आणि सांधे दुखी साठी उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला थोडेसे तिळाचे तेल घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्या वनस्पतीचे छोटे-छोटे तुकडे करून त्याला खलबत्त्यामध्ये व्यवस्थितपणे चेचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सर्वात आधी तिळाचे तेल गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या वनस्पतीची तयार झालेली पेस्ट त्यामध्ये टाकून ते तेल आपल्याला उकळून घ्यायचे आहे आणि तेल उकळल्यानंतर ते थंड करून गाळून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत आहे त्या ठिकाणी रात्री झोपताना आहे तेल लावायचे आहे.
रात्रीच्या वेळी या तेलाने तुम्हाला ज्या ठिकाणी सांधेदुखीचा त्रास होत आहे किंवा जर तुम्हाला गुडघेदुखीचा आणि मणक्यामध्ये वेदना होत असतील तर त्या ठिकाणी या तेलाने मसाज करून घ्यायचे आहे आणि त्याठिकाणी मसाज केल्यानंतर तुम्हाला गरम कापडाच्या साह्याने त्या ठिकाणी शेक द्यायचा आहे मित्रांनो हा छोटासा उपाय जर तुम्ही तुमच्या घरा मध्ये केला तर आठ ते पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल आणि जर तुम्ही सातत्याने हा उपाय करत राहिला तर यामुळे तुमच्या सांधेदुखीचा त्रास कायमचा दूर होईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.