मित्र मैत्रिणींनो नेहमी तरुण दिसण्यासाठी फक्त रोज खा हे पाच पदार्थ आणि पहा नेहमी तरूनच दिसाल …..!!

आरोग्य

मित्रांनो, आपले तरुणपण जपण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. शिवाय, याबाबतीत महिला अधिक जागृत असतात. मात्र, तारूण्य टिकवण्यासाठी विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. चेहरा आणि शरीर तजेलदार दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग होत नाही. त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. आपले केस काळे भोर असावेत, आपली स्किन तजीलदार असावी, त्यावरती सुरतुक्या नसाव्यात, असे जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही तरुण राहावं, म्हातारपण आपल्यामध्ये ज्यास्त प्रमाणात दिसू नये.

मित्रांनो अशी जर तुमची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला त्या बाबतीतच्या आहाराबद्दल सांगणार आहे. मित्रांनो जसा ज्याचा आहार तसे त्याचे तारुण्य अगदी बरोबर आहे. जितका तुमचा आहार योग्य असेल तितकेच तुम्ही चिरतरुण राहणार आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदांनी सांगितलेले असे काही पदार्थ सांगणार आहोत. जे पदार्थ दररोज खाल्ले म्हणजे उन्हाळा, पावसाळा, किंवा हिवाळा असो ह्या तिन्ही ऋतूंमध्ये जर हे पदार्थ तुम्ही प्रमाणामध्ये खाल्ले तर तुम्ही सदा सर्वकाळ तरुण रहाल.

तुमच्या चेहऱ्यावरती सुरतुक्या पडणार नाहीत आणि तुमची त्वचाही तजीलदार राहील. तुम्ही तरुण दिसाल. तर मित्रांनो आज आपण अशाच काही पदार्थांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या पदार्थांचे सेवन जर आपण दररोज केले तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील त्या कमी होतील.

त्याचबरोबर आपला चेहरा तरुण आणि तेजस्वी दिसू लागेल. तर जाणून घेऊया कोणकोणते पदार्थ आपल्याला तरुण राहण्यासाठी खूप मदत करतात याबद्दलची माहिती. तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे नारळ. पाणी मित्रांनो नारळ पाणी आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि यापासून आपल्या शरीराला किती प्रमाणात फायदे होतात हेही सर्वांना माहीत आहे. परंतु मित्रांनो यामुळे सर्वात जास्त फायदा हा आपल्या चेहऱ्याला आणि केसांना होत असतो.

मित्रांनो यामध्ये असणारे पौष्टिक घटक हे आपल्या शरीरामध्ये असणारी पाण्याची कमतरता भरून काढतातच. त्याचबरोबर यांचा सर्वात जास्त फायदा हा आपल्याला तरुण दिसण्यासाठी किंवा आपली जी त्वचा आहे तिला तरुण ठेवण्याचे काम हे नारळ पाणी करत असते.

हे वाचा:   रोजच्या चहा मध्ये दोन थेंब टाका; वजन दुप्पट कमी सहित सांधेदुखी, गुडघेदुखी, अशक्तपणा, थकवा गायब, सकाळी पोट एका मिनिटांत साफ ….!!

त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर चेहरा संबंधित काही व्यायाम केले तर यामुळेही आपला चेहरा तरुण दिसतो आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आहेत त्या कमी होतात. तर मित्रांनो या व्यायामांमध्ये सर्वात पहिला व्यायाम म्हणजे मित्रांनो आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये असणारे e आणि o हे दोन शब्द किमान 20 ते 30 वेळा सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी म्हणायचे आहे. कारण मित्रांनो तुम्ही ज्यावेळी e असे म्हणतात तेव्हा तुमचा चेहरा पसरतो.

त्याचबरोबर जेव्हा तुम्ही o म्हणता तेव्हा तुमचा चेहरा आकारतो आणि मित्रांनो ज्यावेळी तुम्ही हे दोन्ही शब्द वारंवार उच्चार तेव्हा तुमच्या चेहऱ्याचा व्यवस्थितपणे व्यायाम होतो. अशा पद्धतीने तुम्ही हा व्यायाम सकाळी किमान दहा ते पंधरा मिनिटं करू शकता.

त्याचबरोबर मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्ही शिट्टी मारता किंवा शिट्टी वाजवता त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे ओठ करायचे आहेत. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं करायचा आहे म्हणजेच तुम्हाला शिट्टी वाजवल्यासारखा चेहरा करायचा आहे आणि त्यानंतर थोडा वेळ ब्रेक घेऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीने करायचा आहे. अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला हवा व्यायाम करायचा आहे. यामुळे चेहऱ्यावर असणारे सुरकुत्या कमी होण्यासाठी आणि तरुण चेहरा दिसण्यासाठी खूप मदत होते.

त्यानंतर मित्रांनो पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे पालक. मित्रांनो पालक मध्ये हे असणारे पोषक घटक हे आपला चेहरा तरुण ठेवण्यासाठी खूपच मदत करतात. त्याचबरोबर मित्रांनो पालक हे आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी खूप मदत करतो.

म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर जर काळे डाग किंवा पिंपल्स वारंवार येत असतील तर अशावेळी तुम्ही पालकचे सेवन नक्की करावे. त्यामुळे या सर्व समस्या दूर होतात. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे दही. मित्रांनो दही ही आपल्या चेहऱ्यासंबंधीत अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप मदत करतो आणि मित्रांनो यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या नवीन पेशी तयार करण्यासाठी हे दही खूप मदत करतो.

हे वाचा:   कोणताही व्यायाम न करता दहा दिवसात दहा किलो वजन हमखास कमी या घरगुती उपायाने, पोटाची चरबी मेनासारखी वितळेल ….!!

त्याचबरोबर मित्रांनो आपले पाचनशक्ती मजबूत होते आणि त्याचबरोबर पोटासंबंधी सर्व समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की आपले पोट चांगले असेल तर यामुळे आपण खाल्लेले अन्न आपल्याला लगेचच पचते आणि त्यामुळे आपल्या केसांना आणि आपल्या त्वचेला चांगले पोषक घटक मिळतात.

मित्रांनो त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी. पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराला किती प्रमाणात फायदे होतात आपल्या सर्वांना माहित आहे आणि मित्रांनो जर तुम्ही योग्यरीत्या पाण्याचे सेवन केले तर यामुळे आपला चेहरा खूपच चमकदार दिसतो आणि त्याचबरोबर योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे आपली पाचन शक्ती मजबूत होते आणि त्यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्वे मिळतात.

त्यानंतर मित्रांनो जर आपली झोप व्यवस्थितपणे होत नसेल तर यामुळे याचा लगेचच परिणाम आपल्या चेहऱ्यावर आणि त्याचबरोबर आपल्या वागण्यावर होत असतो. म्हणजेच मित्रांनो जर आपली झोप रात्री व्यवस्थित झाली नसेल तर यामुळे आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस घडून येतात. याचा डायरेक्ट परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

त्याचबरोबर डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्याही तयार होतात आणि म्हणूनच मित्रांनो रात्रीच्या वेळी व्यवस्थित झोप जर आपण घेतले तर यामुळे आपल्याला चेहऱ्यासंबंधी जे काही त्रास आहेत ते दूर होतात.

तर मित्रांनो असे होते हे काही पदार्थ आणि काही व्यायाम. जर तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर केला तर आपला चेहरा हा कायमच तरुण दिसेल. कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट किंवा काळी वर्तुळे, काळपटपणा याचा कोणताही त्रास होणार नाही. तसेच आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसणार नाहीत. कायम आपला चेहरा हा आकर्षक दिसेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *