एका दिवसात टाचफुटी घालवा फक्त एक वेळा हे मिश्रन टाचेच्या भेगांना लावा परत कायमस्वरूपी टाच फुटी घालवा ! खूपच फायदेशीर असा घरगुती उपाय

आरोग्य

मित्रांनो, हिवाळ्यातील दिवसांमध्ये आपली त्वचा कोरडी पडत असते आणि त्याचबरोबर आपल्यातील बऱ्याच जणांच्या तासा देखील फुटतात म्हणजेच त्यांना भेगा पडत असतात. परंतु मित्रांनो आपली त्वचा कोरडी पडली किंवा आपल्या टाचांना भेगा पडल्या तर त्या लवकर बऱ्या होत नाहीत आणि त्याचा त्रासही आपल्याला होत असतो आणि म्हणूनच आपण लगेच डॉक्टरांकडे जातो परंतु डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा आणि मलमचा काही परिणाम त्याच्यावर होत नाही.

मित्रांनो आपल्या टाचांना पडलेल्या भेगांवर आयुर्वेदामध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहेत, त्यातीलच एक प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. हा उपाय आपण घरातल्या घरात अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे खोबरेल तेल,जे आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये अगदी सहजरित्या मिळते. हा उपाय करण्यासाठी एक चमचा खोबरेल तेल आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे.

हे वाचा:   रोज फक्त हे तीन नियम पाळा, ना व्यायाम न करता ना औषध खाता, आपोआप 27 किलो वजन 100% कमी झाले फक्त या तीन नियमाने ….!!

त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वॅसनील मिक्स करायचे आहे, मित्रांनो याचा उपयोग आपण हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात करत असतो त्यामुळे याचा उपयोग आपण त्याला सोबत केला तर खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा आपल्याला होत असतो.

जितक्या प्रमाणात आपण तेल घेतले आहे तितक्या प्रमाणात वॅसनील आपल्याला त्यात मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये लिंबाचे चार ते पाच थेंब टाकायचे आहेत.मित्रांनो जर तुम्हाला लिंबाच्या रसाची ऍलर्जी असेल तर तुम्ही हा उपाय करत असताना त्यामध्ये लिंबाच्या रसाचा वापर करायचा नाही.

हे तयार झालेले मिश्रण आपल्याला आपल्या टाचांवर भेगा पडलेल्या ठिकाणी हळुवारपणे लावून घ्यायचे आहे.मित्रांनो शक्यतो हे मिश्रण तुम्हाला रात्रीच्या वेळी झोपण्याअगोदर लावायचे आहे यामुळे हे मिश्रण रात्रभर त्या भेगांमध्ये चांगल्या पद्धतीने मुरेल आणि त्याचा चांगला फायदा आपल्याला होईल. परंतु हे मिश्रण टाचांना लावण्याअगोदर तुम्हाला तुमचे पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे, जर तुमच्या भेगामध्ये घाण असेल आणि तुम्ही हे मिश्रण लावले तर त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते.

हे वाचा:   आयुर्वेदातील आपल्या घराशेजारील चमत्कारिक वनस्पती, मूळव्याधाचे मुळंच नाहीसे करते, मूळव्याध समूळ मुळापासून संपवा ; डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ....!!

मित्रांनो हे मिश्रण लावल्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी त्याच्यावर सॉक्स घालावे आणि मगच झोपावे यामुळे ते मिश्रण पुढच्या भागांमध्ये चांगल्या पद्धतीने मुरेल.सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचे पाय कोमट पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे आहेत, मित्रांनो एका दिवसांमध्ये तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल परंतु हा उपाय तुम्हाला सातत्याने तुमचा त्रास कमी होईपर्यंत आणि हिवाळा संपेपर्यंत सुरूच ठेवायचा आहे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *