स्वयंपाक करण्यापूर्वी तव्याला लावा या 2 वस्तू; घरात कायम लक्ष्मी नांदू लागेल.!

अध्यात्म

आपल्या घरी पैसा नियमितपणे यावा, घरातील पैसा टिकावा, घरामध्ये सुख शांती वैभव नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक जण यासाठी प्रयत्न करत असतात मेहनत करत असतात परंतु बहुतेक वेळा मेहनत प्रयत्न करून देखील आपल्याला हवा तितका पैसा प्राप्त होत नाही. आलेला पैसा या ना त्या कारणाने वारंवार बाहेर निघून जातो. महिनाभर कमावलेला पैसा काही वेळ न थांबता आजारपण अडचणी यांच्यामध्ये निघून जातो ,अशा वेळी आपली सारखी चिडचिड होत जाते.आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो. भाग्य ला दोष देण्यात येतो .जर तुमच्या बाबतीत सुद्धा या काही घटना घडत असतील तर तुम्हाला काही उपाय करणे गरजेचे आहे.

आपण खूप सारा पैसा कमावतो परंतु पैसे ची काळजी व्यवस्थित घेत नाही. आपण घरगुती काही उपाय करून देखील आपल्या घरातील पैसा कायमस्वरूपी टिकवू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याबद्दलची फारशी माहिती नसते.आपल्या अनेक शास्त्रांमध्ये घरातील पैसा कसा टिकवावा, कसा वाढवावा याचे अनेक फायदे देखील सांगण्यात आलेले आहेत किंवा विवेचन देखील करण्यात आलेले आहे.आजच्या लेखामध्ये आपण घरच्या घरी करता येणारे एक छोटासा व महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.

आपल्या प्रत्येकाच्या घरी तवा हमखास पाहायला मिळतो. तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये तवाला खूप सारे महत्त्व देण्यात आलेले आहे, याचा वापर करून आपण अनेक टोटके उपाय करू शकतो. आपल्या घरामध्ये जो तवा असतो, ज्या तवावर आपण चपाती भाकरी बनवत असतो, तो तवा कधीच कुणाला देऊ नका त्याचबरोबर हा तवा कधीच उष्टा व खरगटा अस्वच्छ देखील ठेवू नका यामुळे घरामध्ये नेहमी पीडा नांदत असते. आपल्या घरातील सर्व शक्यतो घरातील महिलेने कृपेने दूर व्हायला हवा. हा तवा बाहेरच्या लोकांना नजरेस पडणार नाही याची काळजी देखील घ्यायला पाहिजे.

हे वाचा:   जर तुम्हाला श्रीमंत, धनवान व्हायचे असेल तर या झाडाचे मूळ घरात ठेवा…धनवान बनवते याचे मुळ

तवा हा कधीच उलटा ठेवू नये. तवा नेहमी आपल्या गॅस शेगडी च्या उजव्या बाजूला ठेवायला पाहिजे डाव्या बाजूला ठेवल्याने घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही पदार्थ असतात, त्या पदार्थाच्या सहाय्याने आपण उपाय जाणून घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये हळद असते हळदीला माता महालक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे. माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव असायला हवी असे वाटत असेल तर आपल्या घरातील वस्तू अत्यंत महत्त्वाचे असतात, त्यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू.

दुसरी सुपडी ,तिसरी आहे पाटा-वरवंटा. असे म्हटले जाते की, माता महालक्ष्मी रात्री आपल्या घरी येऊन झाडांवर उभी राहते आणि सुपडी वर ती बसते आणि पाटा-वरवंटा वरती आराम करते आणि म्हणूनच आपल्या घरातील पाटा-वरवंटा हा कधीच उभा ठेवू नये. घरातील या तिन्ही वस्तू आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायला हव्यात, तसेच या तिन्ही वस्तूंना हळदीचा छोटासा टीका देखील आपल्याला लावायला हवा जेणेकरून त्यांना मानसन्मान दिल्याने माता महालक्ष्मी आपल्यावर खुश होते व आपल्या जीवनात नेहमी पैसा येऊ लागतो.

आता आपल्याला तवा संदर्भात उपाय करायचा आहे .आपल्या प्रत्येकाच्या घरी तूप असते तूप हे गाई म्हशी च्या दुधाचे बनवले असेल तरी चालेल त्यानंतर आपल्याला तुपामध्ये थोडेसे हळद मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण एकजीव करायचं आहे,ज्या घरांमध्ये नेहमी तूप असते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते व आपल्या घरातील गृहिणी जेव्हा स्वयंपाक बनवणार असेल तेव्हा अशावेळी तव्याला आपल्याला तीन टीक्के लावायचे आहेत तीन टक्के लावल्यानंतर आपल्याला तवा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जे काही पदार्थ बनवून त्या पदार्थांमध्ये तुपाचा स्वाद येईल पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

हे वाचा:   A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो बघा.. A नावाच्या व्यक्तींचे जीवन, प्रेम, करीयर कसे असते..सर्व माहिती

जर तुम्ही मांसाहार पदार्थ जर बनवत असेल तर अशावेळी हा उपाय करू नका. या उपायाचे चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील, अशा प्रकारे जर आपण हा उपाय नेहमी केला व आपल्या तव्याला हळद व तुपाचा टिक्का लावला तर यामुळे माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल व तुमच्या घरातील जे सदस्य अन्नपदार्थ सेवन करतील त्यांना नेहमी जीवनामध्ये सुख शांती लाभेल त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक वाढ होऊ लागेल म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *