स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची आपल्याकडे दुर्लक्ष करणारी व्यक्ती पण तुमच्याकडे बघतच राहतील ..!!

मनोरंजन

मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळावा. आपल्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये. आपल्याला योग्य तो मान, सन्मान, आदर मिळावा. त्यासाठी आपण काय करावे? असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. त्याबद्दलची काही माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. कशाप्रकारे आपल्याला समाजामध्ये मानसन्मान मिळवता येईल?.

1. गबाळ्यासारखे राहाणाऱ्या व्यक्तीला लोक कधीच इज्जत देत नाहीत. जे लोक स्वतः ला स्वच्छ आणि फिट ठेवतात त्यांच्याकडे लोक वेगळ्याच नजरेने बघतात. म्हणून सगळ्यात आधी आपल्या व्यक्तीमत्वात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करा. नेहमी चांगले कपडे घालून स्वतः ला प्रेझेंट ठेवा. तुम्ही कितीही ज्ञानी असले तरीही सगळ्यात आधी लोक तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत बघत असतात आणि जर आपला पेहरावच चांगला नसेल तर लोक दुर्लक्षच करतात. आणि मग कोणीच तुमची रिस्पेक्ट करत नाही.

2. कोणालाच घाबरु नका. जर तुम्हाला लोकांमध्ये स्वतःची इज्जत वाढवून घ्यायची असेल लोकांनी रिस्पेक्ट द्यावा असे वाटत असेल तर कधीच कोणाला घाबरु नका. अशावेळी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेले शब्द लक्षात ठेवायचे आहेत. की कोणीच तुम्हाला मारु शकत नाही. कोणीच तुमचे काहीच वाकडे करु शकत नाही. फक्त तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ नका. व चुकीचे कार्य करु नका.

हे लक्षात ठेवून तुम्ही जगाला दाखवून द्यायचे की तुमच्या मनात कोणत्याच गोष्टीविषयी भीती नाही. व तुम्ही नेहमीच सत्य आणि न्यायासाठी, खरे बोलण्यासाठी तयार आहात. स्वतः ला मजबूत दाखवल तरच लोक तुम्हांला मान देतील. कोणत्याही गोष्टीला न घाबरणाऱ्या लोकांना समाजात नेहमीच इज्जत दिली जाते.

3. प्रत्येक वेळी सर्वांसाठी अव्हेलेबल राहू नका. तुम्ही ती गोष्ट ऐकलीच असेल की एकाच ठिकाणी सारखं सारखं गेल्यामुळे आणि दुसऱ्यासाठी लगेच हजर राहिल्यामुळे माणूस स्वतःची इज्जत कमी करून घेतो. असे असल्यावर लोक तुम्हांला काहीच महत्त्व देत नाहीत. ते असे समजतात कि याला पाहिजे तेव्हा बोलवून घ्या. नाहीतर त्याला बोलवायची गरज नाहीये तो तर कायमच येतो. म्हणजे तुम्हाला कोणीच सिरीयसली घेत नाही.आजच्या जमान्यात लोकांना थोडी वाट बघायला लावणे गरजेचे आहे. तरच ते तुमची किंमत समजतात. आणि तुम्हाला मानसन्मान देतात.

4. दिलेला शब्द मोडू नका.आजच्या जमान्यात खूप कमी लोक असे आहेत जे स्वतः दिलेला शब्द पूर्ण करतात. जर तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू वाढवायची असेल तर स्वतःला असे बनवा की लोक लगेच तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार होतील. म्हणजे तुम्ही लोकांना दिलेला शब्द नेहमी पूर्ण करा. तुम्ही जर एखाद्याला शब्द दिला असेल तर ती गोष्ट तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे. अशा व्यक्तींना लोक खुपच महत्त्व देतात. व त्यांची इज्जत करतात.

हे वाचा:   पुरूषांच्या ‘या’ 5 सवयींवर एका मिनिटात आकर्षित होतात महिला…!!

5. वेळेचा सदुपयोग करा. जर तुम्हाला एक शानदार व्यक्तिमत्व बनायचे असेल तर वेळ वाया घालवणे बंद करा. आपण आपल्या आजूबाजूला अनेक असे लोक बघतो की जे खूपच कडक शिस्तीचे जीवन जगत असतात. त्यांची बरोबरी करणं मुश्कील आहे.पण तुम्ही तुमचा वेळ कशातही वाया घालवत असाल तर कोणीच तुम्हाला पसंत करणार नाही. सगळेजण तुम्हाला टोमणेच मारतील. म्हणून रिकाम्या वेळेत असे काहीतरी काम करा की ज्यामुळे निदान दुसऱ्याला तरी काहीतरी फायदा होईल.

6. सक्सेसफुल बना. जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती केली तर लोक स्वतःहूनच तुमची इज्जत करतात. मग तुम्हाला कोणाकडूनच जाणून घ्यायची गरज नाही की आपली इज्जत कशी वाढवायची. कारण आजच्या जमान्यात लोक फक्त सक्सेसफुल लोकांचीच कदर करतात.

तुम्ही आयुष्यात कितीही शिकलेले असले तरीही जोपर्यंत तुमच्याकडे एखादा चांगला जॉब नाही, किंवा तुमचा बिजनेस चांगला चालत नाही, तुम्ही सफल होत नाही, तोपर्यंत लोक तुम्हाला विचारणार पण नाही. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने आपल्या करिअर कडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही जर यशस्वी असाल तरच लोक तुम्हाला इज्जत देतील.

7. सडेतोड उत्तर द्यायला शिका.आज कालचा जमाना असा आहे की कमजोर व्यक्तीला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. आणि एकदा का आपण समोरच्याला घाबरून राहिलो, तर ती व्यक्ती मुद्दम तुम्हाला नेहमीच दाबून टाकण्याचा प्रयत्न करते. आणि मग त्यांना बघून लोक पण तुमची मजा घ्यायला लागतात.

असे झाल्यास आपण लगेच याला विरोध केला पाहिजे. जर कोणी भांडण्याच्या आवेशामध्ये तमच्याशी बोलत असेल तर तम्ही पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे. त्यामुळे आणि त्यामुळे आपल्या वाट्याला कोणी जात नाही. आणि लोकांमध्ये आपल्याविषयी भीतीयुक्त दरारा आणि इज्जत राहाते.

8. आपली कमजोरी कोणालाच सांगू नका.एक मजबूत माणूस तोच असतो जो आपल्या आयुष्यात आलेले दुःख एकटाच सहन करत असतो. पण आपल्या आयुष्यातले सुख इतरांसोबत वाटून त्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतो. अशी व्यक्ती खरोखरच मान सन्मान देण्याच्या लायक असते. कारण हा एक खास गुण आहे जो सगळ्यांमध्येच नसतो.

हे वाचा:   गोड गोड बोलून शेवटी धोका देणारी माणसे कशी ओळखावी? विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींची ही ११ लक्षणे….!!

आजकालचे लोक दुसऱ्यांमध्ये फक्त एखादी कमजोरी शोधत असतात. की आपण त्याची कमजोरी पकडून आणि सगळ्यांसमोर त्याला बेइज्जत करु. त्याची खिल्ली उडवू त्याला खूप त्रास देत असतात.आपल्या आजूबाजूला असेच लोक असतात. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपली जी काही कमजोरी आहे ती कधीच कोणालाच कळता कामा नये.नाहीतर लोक तुमच्या त्याच कमजोरीचा फायदा घेतील.

9. सगळ्यांसोबत प्रेमाने राहा. मानसन्मान त्याच व्यक्तीला मिळतो, इज्जत त्याच व्यक्तीला मिळते, जी व्यक्ती इतरांना इज्जत देते. जर तुम्ही सगळ्यांबरोबरच भांडण तंटे करत बसलात तर समाजात तुमची प्रतिमा खराब होईल. आणि कोणीच तुम्हाला मानसन्मान देणार नाही. ही एक खूप मोठी गोष्ट आहे जी एका अज्ञानी किंवा गरीब व्यक्तीला सुद्धा सगळ्यांकडून इज्जत मिळते.

जरी कोणी लहान असेल किंवा मोठे सगळ्यांसोबत प्रेमाने राहा. सगळ्यांशी बोलताना हसत हसतमुखाने आणि मनमिळाऊपणे बोला. त्यामुळे सगळ्यांच्या मनावर तुमचा सकारात्मक प्रभाव पडेल. प्रत्येक जण तुम्हाला चांगल्या हेतूने लक्षात ठेवेल. व त्यांच्या मनात तुमच्याविषयी खूपच इज्जत वाढेल.

10. आपला टॅलेंट जगाला दाखवून द्या.काही लोक नेहमी विचार करत असतात की काय केल्याने सगळे जण माझे नाव काढतील. पण त्यासाठी योग्य ते प्रयत्न कोणीच करत नाही. हो हे खर आहे. लोक इज्जत करतात ते फक्त माणसांमध्ये असलेल्या टॅलेंटची. माणसाची नाही. तो जमाना कधीच गेला ज्यावेळी माणसांची इज्जत केली जात होती. आत्ताच्या जमान्यात फक्त माणसा मधल्या टॅलेंट ची कदर केली जाते.

आजच्या जमान्यात लोकांकडून इज्जत मिळवायची असेल तर तुमच्यामध्ये असलेला टॅलेंट तुम्ही लोकांना दाखवूनच दिला पाहिजे. तरच लोक तुम्हाला इज्जत देतील.त्यामुळे तुमच्या मध्ये जेवढे पण चांगले गुण आहेत आणि काही करुन दाखवण्याची क्षमता आहे तर तुम्ही लोकांना दाखवून द्या. मगच लोक तुमची कदर करतील.

अशा प्रकारे हे काही उपाय आहेत की जे आपण केल्यामुळे समाजामध्ये आपल्याबद्दलची लोकांच्या मनामध्ये तिची भावना निर्माण होईल व समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *