मित्रांनो, हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामं आहेत जी ठराविक वेळी करावीत असं मानलं जातं. काही कामं संध्याकाळच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर न करण्याचा सल्ला दिला जातो. संध्याकाळी कोणती कामं करू नयेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. संध्याकाळच्या वेळेस काही गोष्टी केल्यामुळं घरामध्ये रोगराई, दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नाही तर ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी सुद्धा घरात राहत नाही, असे मानले जाते. त्या गोष्टी स्त्रियांनी झोपण्यापूर्वी हे 5 चुकून करू नये याची माहिती आपण जाणुन घेऊया.
आपल्या घरातील स्त्रिया या प्रत्येक काम करत असतात. परंतु या ज्या काम करत असतात त्यामुळे काही वेळेस घरामध्ये असलेली लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपला घरामध्ये नकारात्मकता पसरण्याचे देखील शक्यता असते. म्हणूनच आज आपण स्त्रियांनी रात्रीच्या वेळेस कोणती कामे करू नये त्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
त्यातील पहिले काम म्हणजे रात्रीच्या वेळेस कोणालाही दूध किंवा दही देऊ नये. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची शक्यता असते. दूध आणि दही मध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते आणि जर आपण हे रात्रीच्या वेळेस ही लक्ष्मी इतरांना दिली तर आपल्या घरातून लक्ष्मी निघुन जाण्याची शक्यता असते. म्हणून कधीही दूध किंवा दही संध्याकाळी कोणालाही उसने देऊ नये.
दुसरी गोष्ट म्हणजे खरकटी भांडी ठेवू नये. यामुळे आपल्या घरात नकारात्मकता पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपण्याआधी नक्कीच भांडी स्वच्छ करून मगच झोपावे. तीसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नये. यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी निघुन जाण्याची शक्यता असते. तिसरी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना महिलांनी केस मोकळे सोडून कधी झोपू नये.
याचे शास्त्रीय कारण म्हणजे तुमची केस गळती होऊ शकते. केसान ची समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर घरातील लक्ष्मी देखील निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून कधीही केस मोकळे सोडू नये. चौथी गोष्ट म्हणजे महिलांनी रात्रीच्या वेळेस कधी केस विसरू नये. यामुळे देखील घरातील लक्ष्मी निघून जाते. आणि पाचवी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना कधीही नखे कपू नये. त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची शक्यता असते.
कपडे धुणे आणि वाळवणे संध्याकाळी कपडे धुणे चांगले मानले जात नाही. एवढेच नाही तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे मानले जाते. असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्याने माणूस आजारी पडू शकतो, असे मानले जाते. अन्न उघडे ठेवणे सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये. ते नेहमी झाकून ठेवावे. या गोष्टी उघड्याच राहिल्यास नकारात्मक ऊर्जा त्यात शोषली जाते, ज्यामुळे ते खाल्ल्याने आजारी पडू शकते.
अशा प्रकारे ही काही कामे आहेत जी स्त्रियांनी झोपण्यापूर्वी चुकून करू नये.