कितीही भांडणे झाली तरी बायकोची ही एक गोष्ट कुणालाही सांगू नये नाहीतर ……!!

मनोरंजन

मित्रांनो, आपण सर्वजण आज काल बघतो की घरात पती-पत्नीचे पटत नाही. सारखे घरात चिडचिड होत असते. भांडण होत असतात. कटकटी होत असतात. वादविवाद होत असतात आणि हे वादविवाद एवढे वाढतात की है नाते तोडायचा विचार होऊ लागतो. असे वाद-विवाद सारखे घरात होत असले की मग भरपूर समस्या, संकटे उद्भवतात. नवरा व्यसनाच्या आहारी जातो. बायको टेन्शन घेऊन घेऊन खचत असते. मुलांकडे लक्ष दिले जात नाही.

पती ही पत्नीची अर्धांगिनी असते ती त्याच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये एकत्र असते. कितीही भांडण झाले, कितीही वाद-विवाद आहे तरी पती-पत्नी आपली साथ कधीही सोडत नाही. असे म्हटले जाते की घर म्हंटले तर भांड्याला भांडे लागणार. आणि त्यामुळे पती-पत्नीचे सतत भांडण होत असतात. या भांडणांमध्ये जर आपण तिसऱ्या व्यक्तीला घेतले भांडण सोडवली तरीही पतीने एक गोष्ट मात्र पत्नीची कोणालाही सांगितले नाही पाहिजे. ती गोष्ट कोणती? याबद्दची माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोमध्ये ह्या ७ गोष्टी हव्या असतात…..अशी असावी बायको….!!!

पती-पत्नीचा संसार हा त्या दोघांनाही चालवायचा असतो आणि हा संसार संसाराचा गाडा चालवत असताना त्यांच्यामध्ये काही कटके होतात. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद-विवाद होतात. भांडणे होतात. घरामध्ये चिडचिड होऊ लागते, घरात आशांतता निर्माण होते, मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागते. परंतु कितीही काही झाले तरी पती-पत्नी आपली साथ कधीही सोडत नाही. ते प्रत्येक सुखदुःखात एकत्र उभे राहतात.

खूप भांडणे झाली तर काही वेळेला आपण इतरांना घेऊन ती भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे भांडणे सोडवत असताना चुकीने आपल्या पत्नी विषयीची एक गोष्ट कोणालाही सांगू नको. ती म्हणजे चारित्र्य. पतीने आपल्या पत्नीच्या चरित्रावर कधीही बोट ठेवला नसला पाहिजे. कारण आपण जर आपल्या पत्नी विषयी वाईट साईट बोलू लागले की, अशी आहे की! तशी आहे! ती अशीच करते! तर ती तशीच करते! तर इतर लोक काय आपली मजाच घेत असतात आणि त्यांना चर्चेचा विषयच पाहिजेल असतो.

हे वाचा:   पुरुषाचे स्त्रीबद्दलचे आकर्षण तेव्हा कमी होते, जेव्हा … याबद्दलची महत्वपूर्ण माहिती?

ज्यामुळे आपल्याला आपल्या समाजामध्ये बदनामी द्यावी लागते आणि आपल्या पत्नीची ही बदनामी व्हावी लागते. समाजात आपल्या पत्नी विषयीची मोठी चर्चा निर्माण होऊ शकते. म्हणून कधीही पतीने आपल्या पत्नी विषयीची माहिती इतरांना सांगू नये. जरी तुमची कितीही जवळची व्यक्ती असली तरी आपल्या पत्नी विषयी त्यांना काहीही बोलू नये. कारण लोक हे आपली मजा घ्यायला बसलेले असतात त्यामुळे त्यांना आपल्या भांडणांमध्ये तर अजिबातच आणू नये. त्यामुळे लोकात चर्चेचा विषय निर्माण होण्यास मदत मिळते. शक्यतो आपली भांडणे आपणच सोडण्याचा प्रयत्न करा.

अशा प्रकारे पतीने आपल्या पत्नी विषयीची ही गोष्ट कोणालाही सांगू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *