महिलांनो नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी या पाच टिप्सचा घरगुती उपाय नक्की करून पहा ? महिलांसाठी उपयुक्त अशी माहिती …!!

आरोग्य

मित्रांनो, मातृत्वाचा अनुभव हा एक वेगळाच आनंद असतो. आई होणे हे प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आपल्याला एखादे गोंडस बाळ असावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. आई होण्यासाठी आईला अनेक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास सहन करून मातृत्वाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर आपण सर्वांनी पाहिलच असेल. मित्रांनो बाळ होणे ही जितकी आनंदाची गोष्ट आहे तितकेच बाळ होण्यासाठी डिलेव्हरी मध्ये स्त्रीला खूपच त्रास सहन करावा लागतो. अनेक वेदना सहन कराव्या लागतात. जेव्हा बाळ आपल्या आईच्या पोटामध्ये असते त्यावेळेस आईची विशेष काळजी घेणे देखील खूप गरजेचे असते. त्यामुळेच बाळ आणि आईला धोका होत नाही आणि आईची डिलेवरी देखील नॉर्मल होऊ शकते.

परंतु मित्रांनो आज कालच्या या बदलत्या वातावरणामुळे स्त्री ने कितीही व्यायाम, पोषक आहार घेतला तरी देखील काही नैसर्गिक अडचणीमुळे म्हणजेच कळा न येणे, पाणी कमी पडणे किंवा अनेक बाबतीत समस्या असतील तर या समस्यांमुळे सिजरिंग चा पर्याय निवडला जातो. परंतु मित्रांनो आज काही मी असे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची डिलिव्हरी ही नॉर्मल होऊ शकते.

मित्रांनो, प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी ॲक्टिव राहणे खूप गरजेचे असते. यामध्ये तिने एक्ससाइज, व्यायाम हा चालू ठेवला पाहिजे. एक ते नऊ महिन्यांपर्यंत तिने दहा मिनिटांपासून तीस मिनिटांपर्यंत असा व्यायाम चालू ठेवला पाहिजे. त्यामुळे स्त्री ॲक्टिव बनू शकते. मित्रांनो ॲक्टिव राहणे म्हणजे अति प्रमाणात व्यायाम करणे असा होत नाही. परंतु मित्रांनो जेव्हा महिला प्रेग्नेंट आहे असे समजल्यावर कुटुंबातील सर्वजण खूपच खुश होतात आणि महिलांची खूप काळजी घेत राहतात म्हणजेच घर कामासाठी बाई लावणे अश्या अनेक प्रकारच्या गोष्टी असतील.

फकत खायचं, प्यायचं आणि फक्त बसायचं असे न करता तुम्ही घरातील फरशी पुसणे म्हणा व वाकून झाडू मारणे असे काम तुम्ही करू शकता. ताणतणाव, टेन्शन प्रेग्नेंसी मध्ये अशा कोणत्याही गोष्टींचा प्रभाव त्या महिलेवर होता कामा नये. कारण अति ताणतणावामुळे तसेच टेन्शनमुळे देखील आपली नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनी कायम आनंदी राहायला पाहिजे आणि जो काही व्यायाम आहे. घरकाम वगैरे असेल ते करत राहिले पाहिजे.

हे वाचा:   ब्युटीपार्लरचे हजारो रुपये वाचवणारा उपाय, डार्क स्पॉट, वांग, डोळ्याखालील डार्क सर्कल, एका रात्रीत जाऊन चेहरा १००% गोरा आणी चमकदार होणार .....!!

घरातील कामांना बाई न लावता रेगुलर ची कामे महिलांनी करावीत. काही वेळेस मित्रांनो बाळ खाली न सरकल्यामुळे देखील नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो फरशी पुसल्याने बाळ खाली सरकण्यास मदत होते. तसेच मित्रांनो अनेक स्त्रिया पहिल्या महिन्यापासून आठव्या महिन्यापर्यंत आराम करतात आणि नंतर त्यांना टेन्शन यायला लागतं की माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल की सीजर करावा लागेल.

तर मित्रांनो आठव्या आणि नवव्या महिन्यात तुम्ही व्यायाम करायला सुरुवात केली तर हे खुप चुकीचे आहे. जर तुमचा स्नायूंचा व्यायाम आगोदरच झाला नसेल तर मात्र तुमची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्यामुळे स्नायूंचा व्यायाम हा अगोदरच्या महिन्यांपासूनच करायला सुरुवात करायला हवी. जर आठव्या महिन्यांपासून जर तुम्ही व्यायाम करायला सुरुवात केली तर हे खुप चुकीचे आ.हे त्यामुळे अनेक समस्या देखील होऊ शकतात. तर तुम्ही स्नायूंचा व्यायाम हा पहिल्या महिन्यापासून चालू करायचा आहे. तुम्ही व्यायाम तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यापासून चालू करायचा आहे.

तुम्ही योगासने देखील करू शकता. तसेच मित्रांनो प्रेग्नेंट आहे हे समजल्यानंतर तुम्हाला दररोज सकाळ, संध्याकाळी एक ग्लास कोमट दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायच आहे याने कॉन्स्टिपेशन चा जो काही त्रास आहे हा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी साठी बाळ खाली सरकणे गरजेचे असते याला मदत होईल. त्यामुळे तुम्ही दररोज सकाळ, संध्याकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये किंवा एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे.

हे वाचा:   कापूर मध्ये मिक्स करा घरामधील हे तीन पदार्थ चेहऱ्यावरील वांगाचे डाग, मुरूम, डोळ्याखालील काळी वर्तुळे, १००% गायब होणार? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ...!!

तसेच नॉर्मल डिलिव्हरी साठी स्टॅमिना खूप महत्त्वाचा आहे. अनेक वेळा मित्रांनो महिलांना नैसर्गिक कळा होऊ लागतात परंतु या नैसर्गिक कळांचा त्रास महिलांना सहन न झाल्याने या महिलांना सिजर करा असे बोलतात. तर मित्रांनो या नैसर्गिक कळांचा त्रास सहन करण्यासाठी आपणाकडे स्टॅमिना असणे गरजेचे आहे. या स्टॅमिनासाठी तुमचा एचबी नॉर्मल असणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी हिमोग्लोबिन युक्त आयर्न युक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लोहयुक्त देखील पदार्थांचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही कोणताही पदार्थ खात असाल त्या पदार्थावर लिंबू लिंबू पिळून खा.

शेंगदाण्याचे लाडू तुम्ही खाऊ शकता. तसेच बीट याचा वापर आहारात ठेवणे तुम्हाला रक्त वाढीसाठी फायदेशीर ठरेल. तसेच मित्रांनो डिलिव्हरीच्या वेळी महिलांना नैसर्गिक कळा सुटतात त्यावेळेस महिलांना व त्यांच्या बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा असणे खूप गरजेचे आहे. ऑक्सिजन हा खूप महत्त्वाचा घटक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर बाळ जन्मल्यानंतर अनेक समस्या निर्माण होतात त्या समस्या निर्माण होऊ नये तसेच जन्मल्यानंतर बाळाचा कलर निळसर दिसायला लागतो तो कलर दिसत नाही. तर मित्रांनो डिलिव्हरी होण्यासाठी या काही फायदेशीर आहेत या टीप्‍स तुम्ही नक्की करा. हे उपाय करा त्यामुळे तुमची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *