तोंडात विरघळणारी व महिनाभर टिकणारी नारळाची वडी/बर्फी कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत ..!!

ट्रेंडिंग

मित्रांनो, काही खवय्यांना जेवणासोबत तसंच जेवणानंतरही स्वीट डिश खाण्याची सवय असते. काहींना मिठाईच्या दुकानातील तर काहींना घरगुती मिठाई खायला आवडते, पण ताटात गोड पदार्थ लागतोच. या लोकांसाठी खोबऱ्याची वडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. अगदी कमीत कमी जिन्नस वापरुन झटपट होणारी ही वडी खायलाही सोपी आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी होईल. ही खोबऱ्याची वडी किंवा बर्फी कशाप्रकारे बनवायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

नारळाची बर्फी करण्यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा नारळ लागेल. तो नारळ आधी फोडून घ्यावा. त्यातील खोबरे काढून घ्यावे. खोबरे काढल्यानंतर त्याच्या वरची साल काढून घ्यावी व पांढरा भाग आहे तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे. हा पांढरा भागाचे बारीक बारीक तुकडे करावे. तुकडे केल्यानंतर ज्याप्रमाणे आपण मोदकासाठी खीस तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला मिक्सरमध्ये घालून याचे किस बनवायचे आहे.

दोन वाटी किस साठी आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला जर जास्त गोड खाण्याची सवय असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता. ही एक वाटी साखर आपल्याला पिठीसाखर बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला वेलची पूड अर्धा चमचा लागणार आहे व अर्धा वाटी मिल्क पावडर लागणार आहे आणि दोन चमचे साजूक तूप या पदार्थासाठी आपल्याला लागणार आहेत.

हे वाचा:   मुलाने आईला आश्रमात सोडलं : वडिलांचे वीस वर्षापूर्वीच पत्र वाचून मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली …!!

प्रथम आपल्याला एक कढई गरम करून त्या कढईमध्ये बारीक केलेल्या नारळाचा कीस त्यामध्ये घालायचा आहे व मंद आचेवर तो परतत राहायचा आहे. नारळाचे पाणी थोडे सुकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखरेची केलेली पिठीसाखर त्यामध्ये घालायचे आहे. पिठीसाखर यासाठी करावी की साखर विरघळण्याची वेळ पहावी लागत नाही व आपले नारळाचे बेटर करपत नाही. मंद आचेवरच हे सर्व मिक्स करून व्यवस्थित रित्या परतून घ्यावे. त्यातील पाणी थोडे सुकल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालावे व एक चमचा साजूक तूप यामध्ये घालावे.

हे व्यवस्थित रित्या परतत राहावे. एक पाच ते दहा मिनिटे हे सर्व कृती आपल्याला करायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायचे आहे. वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित रित्या परतत राहायचे आहे आणि थोडे बेटर काढून गोळा होतो की नाही हे पाहायचे आहे. जर आपला बॅटरी गोळा झाला तर आपल्याला हे गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर एका ताटामध्ये तूप लावून त्यामध्ये हे नारळाचे बेटर आपल्याला घालायचे आहे.

हे वाचा:   हे पाच संकेत दिसले तर समजून जा कुणीतरी तुमची खुप आठवण काढत आहे…..!!

हे बेटर गरम असतानाच आपल्याला त्याचे वड्या करण्यासाठी पसरवायचे आहे. पसरवल्यानंतर उलतानाच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत. काप करताना सुरीला किंवा उलतानाला थोडेसे तूप लावावे. जेणेकरून त्याला ते बेटर चिटकणार नाहीत. त्यानंतर आपण हे बेटर अर्धा तास थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. थंड झाल्यानंतरच आपण त्याच्या वड्या बाजूला कराव्यात. अशाप्रकारे आपण मस्त अशा नारळाच्या वड्या घरच्या घरीच काही वेळातच करू शकतो.

तुम्हाला देखील नारळाच्या वडा करायचे असतील तर नक्कीच तुम्ही या कृतीचा वापर करून करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *