घरामधील पाण्याची मोटर जळू नये म्हणून ही १ गोष्ट कायम लक्षात ठेवा? महत्वपूर्ण माहिती

ट्रेंडिंग

मित्रांनो, सध्या राज्यभर चांगला पाऊस पडला असून शेतकऱ्यांची पेरणी उरकलेली आहे. आता पेरणीनंतर शेतकऱ्यांची पिके देखील उगवून आले असून शेतकरी पिकांना पाणी देण्याच्या तयारीत आहेत. कारण ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पाऊस पडलेला नाही यामुळे पिकांना पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देण्याच्या तयारीत आहेत.

शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना सर्वात जास्त मोट ची गरज भासते. मात्र मोटर बऱ्याच वेळा जळते यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा देखील सामना करावा लागतो. मात्र आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आम्ही असे काही उपाय सांगणार आहोत ते उपाय केल्यानंतर तुमची मोटर कधी जळणार नाही. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

अनेकदा आपल्याला जेव्हा गरज असते त्यावेळी आपला नेहमीचा प्लम्बर, वायरमन दुसरीकडे कमला गेलेला असतो. मग आपण आपलं काम पुढे ढकलतो. यामुळे आपला वेळही जातो अन नुकसानही होत. परंतु आता तुम्हाला यावर एक चांगला उपाय आज आम्ही सांगणार आहोत.आपण कितीही चांगल्या कंपनीची मोटर घ्या किंवा कितीही महागडी मोटर घ्या ती मोटर जळतेच त्यामुळे नंतर ही मोटर भरण्यासाठी देखील शेतकऱ्यांना मोठे कष्ट सहन करावे लागते. शेतीतील विहीर असेल बोर असेल यामधून ती मोटर उपसा त्यानंतर मोटर नीट करणाऱ्या व्यक्तीकडे त्या मोटरला न्या नंतर तिला पुन्हा बसवा यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही वायाला जातात. त्यामुळे तुम्हाला मोटर का जळते याचे कारण देखील माहित असली पाहिजे. जर ही करणे तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही त्यापासून वेळीच सावधान राहाल.

मोटार जळण्याची कारणे नेमकी कोणती?

1) स्टार्टर. आपण मोटर बसवताना योग्य स्टार्टर बसवला नाही तर 99 टक्के आपली मोटर जळण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य स्टार्टर बसवणे खूप गरजेचे असते. बऱ्याचदा आपण तीन एचपीच्या मोटरला पाच एचपीचा स्टार्टर बसवतो याचा थोडाफार प्रमाणात आपल्याला फायदाही होतो की, वोल्टेज कमी जास्त झालं तरी मोटर चालू व्हायला याचा फायदा होतो.मात्र आपण मोठ्या क्षमतेचे स्टार्टर घेतले तर त्यामध्ये येणारा रिले देखील मोठाच असतो त्यामुळे त्याला व्होल्टेज देखील जास्त असते. आणि रिले मोठा असल्यामुळे जर व्होल्टेज कमी जास्त झाले तर रिले मोटर बंद करत नाही परिणामी आपली मोटर जळते. त्यामुळे मोटरची जेवढी क्षमता आहे तेवढाच त्याला योग्य असे स्टार्टर बसवणे गरजेचे आहे. असे केल्यास तुमची मोटर कधीच जळणार नाही.

हे वाचा:   घरामधील किचनमधील नळ, वॉश बेसिन, बाथरूम मधील खराब झालेले नळ चमकवा आता फक्त मोजून पाच मिनिटांत …..!!

2) फ्युजमधील तार. बऱ्याचदा आपण फ्यूज कडे जास्त लक्ष देत नाही त्याला कोणती तरी तार गुंडाळतो आणि फ्युज टाकतो. मात्र फ्युज मध्ये वितळतार वापरणे खूप गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा आपल्याकडे लाईट कमी जास्त होत असते यावेळी जर लाईट कमी जास्त झाली तर फ्युज मधील तार वितळते आणि मोटार बंद पडते परिणामी पुढील होणारे नुकसान कळते. आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांना एक सवय असते शेतकरी फ्युज जाऊ नये म्हणून तांब्याच्या जाड तारा वापरत असतात. मात्र याचा खूप भयंकर परिणाम होतो. जास्त जाडीची तार वापरल्यामुळे ती तार वितळत नाही परिणामी जर सप्लाय खंडित न झाला तर त्यामुळे मोटर सुरूच राहते व जास्त होल्टेजमुळे मोटर जळण्याचे देखील प्रमाण वाढते. त्यामुळे फ्युज मध्ये तार वापरताना ती तार वितळतार वापरावी.

3) स्टार्टर मधील खालच्या बाजूचा गट्टू.

तुम्हाला तर माहीतच आहे की, आपल्या स्टार्टर मध्ये खालच्या बाजूला एक गट्टू असतो जो मोटर चालू केल्यानंतर स्टार्टर मधील वरच्या भागाला चिकटतो यामधून सप्लाय देखील योग्य रीतीने प्रभावित होत असतो आणि त्यानंतर आपली मोटर चालू होते. ज्यावेळी आपण आपली मोटार बंद करतो त्यावेळी हा गट्टू चिकटलेल्या भागापासून खाली येतो. हा गट्टू जेवढ्या सहजरित्याखाली आणि वर जाईल त्यावर आपल्या मोटरची चालू किंवा बंद होण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारची असते असे ठरवले जाते. यामध्ये काही पट्टया देखीलअसतात मात्र काही कारणास्तव या पट्ट्या खराब होतात जर ह्या पट्ट्या काही कालांतराने खराब झाल्या तर आपण मोटर चालू केल्यानंतर हा गट्टू वरती जातो मात्र तो त्या ठिकाणी चिकटत नाही किंवा बसत नाही. मात्र त्या गट्टूच्या ज्या पट्ट्या असतात त्या गंजल्यामुळे अशा प्रकारची समस्या निर्माण होते त्यामुळे जर या पट्ट्या व्यवस्थित चिकटल्या नाही तर सप्लाय व्यवस्थित जात नाही आणि मोटार जळण्याचा धोका वाढतो.

हे वाचा:   मोजून फक्त एक मिनिटात १००% या पाण्याने चमकवा कितीही जुनाट तांब्या आणि पितळेची भांडी घरच्या घरी …!!

4) ऑटो स्विच. आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांना काही गोष्टीचा खूप कंटाळा असतो जसे की ऑटो स्विच वापरणे अनेक शेतकरी याचा वापर करणे टाळत असल्याचे दिसत आहे. मात्र ऑटो स्विचचा वापर न केल्यामुळे डायरेक्ट करंट स्टार्टरला जातो व त्यामुळे एखाद्या वेळी जर जास्त होल्टेजमध्ये सप्लाय आला तर आपले मोटर जळण्याची शक्यता असते. त्यामुळे स्टार्टरला ऑटो स्विच कनेक्शन करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे जर एखाद्या वेळेस सप्लाय जास्त होल्टेजमध्ये आला किंवा कमी होल्टेज मध्ये आला तर मोटर आपोआप बंद पडते परिणामी आपले पुढचे होणारे नुकसान थांबते.

5) स्टार्टरची वायरिंग. स्टार्टर मध्ये बऱ्याच वायरिंग पॉईंट असतात. यामध्ये आपण वायरिंग करत असताना स्क्रूचा वापर करतो. स्क्रूने आपण त्या वायरिंग फिट बसवतो मात्र बरेच शेतकरी वायरिंग फिट करताना स्क्रू सैल ठेवतात मात्र स्क्रू सैल ठेवणे शेतकऱ्यांना चांगलेच महागात पडते कारण की, वायरिंग व्यवस्थित फिट न केल्यामुळे आवश्यक सप्लाय अपूर्ण जातो किंवा व्यवस्थित जात नाही त्यामुळे मोटर जळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे स्टार्टरच्या वायरी जोडताना त्याच स्क्रू फिट करून व्यवस्थित टाईट जोडला पाहिजे.

मोटार जळू नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी?

मोटार खरेदी करत असताना मोटरसाठी लागणारा रिले त्याच मोटर संबंधित खरेदी करावा.फ्युजला जोडण्यासाठी वितळतार वापरावी. स्टार्टरच्या पट्ट्या गंजविरहित ठेवल्या पाहिजेत. ऑटो स्विचचा वापर केला पाहिजे. स्टार्टरच्या वायरी फिट करताना एकदम टाईट फिट कराव्यात.

अशा प्रकारे मोटर जाऊ नये म्हणून कोणते कार्य करावे याबद्दलची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *