फक्त 2 चमचे खोबरेल असे वापरा आणि ; गजकरण, जांघेतील खाज, फंगल इन्फेक्शन, नायटा, कायमचा घालावा तसेच चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, नावालाही राहणार नाही ….!!!

आरोग्य

 

मित्रांनो, आजकाल साथीचे अनेक रोग डोके वर काढत आहेत. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजाराला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे दवाखान्यात पैसा खर्च करावा लागतो. पण मित्रानो काही घरच्या घरी जर तुम्ही उपाय केल्यास तुमचा एकही पैसा खर्च होणार नाही. आज आपण गजकर्ण, खरूज, नायटा अशा त्वचारोगासाठीचा घरगुती उपाय जाणून घेऊया. त्वचारोगाचे पहिले लक्षण म्हणजे खूप खाज येते. जखम होते व त्याचे रुपांतर त्वचारोगात होते. त्वचारोग जर होऊ नये असे वाटत असेल तर आधीच काही घरगुती उपाय करायला हवेत. हा उपाय केल्याने तुम्हाला गजकर्ण होणार नाही. त्वचेवर कोणत्याही प्रकारची खाज असेल तर ती नष्ट होईल.

मित्रांनो, खूप घाम येत असेल स्वच्छता ठेवली नाही तर अंगावर साठतो. अवघड ठिकाणी घाम साठतो. त्या ठिकाणी इन्फेक्शन होते. तसेच आंघोळीनंतर अवघड भाग जर स्वच्छ पुसले नाहीत किंवा ओलसर अंतर्वस्त्र घातले तर त्या ठिकाणी ओलावा निर्माण होतो बॅक्टेरिया निर्माण होता यातूनच इन्फेक्शन्स होतात

त्याचबरोबर मेहनतीची कामे करत असाल व्यायाम करत असाल तर घाम आल्यानंतर तो घाम स्वच्छ पुसायला हव नाहीतर बॅक्टेरिया निर्माण होतात. जांघेत, काखेत, कमरेवर अशा ठिकाणी गजकर्ण, खरूज, नायटा असे विविध त्वचारोग होतात. चेहऱ्यावर वांग येते अशा निरनिराळ्या समस्या येतात. ते दूर करण्यासाठी उपाय पाहणार आहोत. या उपायासाठी आपल्याला तीन पदार्थ लागणार आहे.

हे वाचा:   केस धुण्यापूर्वी फक्त अर्धा तास हे मिश्रण केसांना लावा ; नावाला एकही केस पांढरा राहणार नाही असा चमत्कारिक घरगुती उपाय १००% गॅरंटी सहित .....!!

आपण या उपायासाठी खोबरेल तेल, तुळस आणि भीमसेनी कापूर लागणार आहेत.

मित्रांनो, भीमसेनी कापूर नसेल तर आपण पूजेसाठी घरामध्ये वापरतो. तो कापूर वापरला तरी चालेल. या कापरामध्ये सुद्धा अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे त्वचारोगासाठी अत्यंत उपयोगी आहेत. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा फंगल इन्फेक्शन असेल त्यासाठी आपण या कापूरवडीचा उपयोग करू शकतो. एका वेळचा उपायासाठी एक कापूर लागणार आहे. तो कुस्करुन याच्या मध्ये टाकायचा आहे.

मित्रांनो, या पदार्थात आणखी एक गोष्ट आपल्याला घालायचा आहे ती म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेल अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-मायक्रोब आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्स, हायड्रेटिंग, फॅटी अ‍ॅसिड्सने समृद्ध असते.
मित्रांनो दुसरा पदार्थ आहे तुळस. तुळस ही अतिशय आरोग्यदायी अशी वनस्पती आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तुळसी असतेच. परजीवी जंतू तुळस तेवढ्याच ताकदीने मारते. त्यामुळे या उपायासाठी आपण तुळस वापरणार आहोत.

मित्रांनो तुळशीचे पान आठ ते दहा स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यानंतर तुळशीच्या पानाचा कुस्करा करुन घ्यावा. त्यामध्ये एक चमचा खोबऱ्याचे तेल टाकावे. त्यानंतर त्यामध्ये भीमसेनी कापूरची पावडर करून टाकावी. हे मिश्रण आपण चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण ज्या ठिकाणी आपल्याला गजकर्ण, खरूज, नायटा किंवा जखम झाली असेल त्या ठिकाणी लावावे.

हे वाचा:   कितीही जुनाट चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, मेलास्मा घालावा कायमचा फक्त तीन दिवसात ; डॉ स्वागत तोडकर टिप्स ....!!

मित्रांनो, हे तिन्ही पदार्थ आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे दोन्ही एकत्र केल्यामुळे त्यांचे गुणधर्म कित्येक पटींनी वाढतात. असा हा तयार झालेला लेप आरोग्यासाठी अत्यंत शक्तिशाली आहे. कुठल्याही त्वचा रोगावर मात करू शकता. तुम्हाला देखील खरुज, नायटा, गजकर्ण आहे किंवा साधी खाज देखील येत असेल तर त्या ठिकाणी तयार झालेला लेप लावायचा आहे.

मित्रांनो, हा लेप किमान दोन तास तुमच्या शरीरावर राहिल याची काळजी घ्या. शक्यतो रात्री झोपायच्या वेळेस लावा. सकाळी आंघोळीच्या वेळेस धुऊन टाका. सलग सात दिवस हा उपाय करा. तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये आराम मिळेल. कुठल्याही प्रकारचा त्वचारोगांमध्ये अत्यंत उपयोगी हा उपाय आहे. तुम्ही हजारो रुपये खर्च करता त्यापेक्षा हा एक घरगुती उपाय करून बघा. 100% तुम्हाला फायदा होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताचए लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *