मित्रांनो, माणसांच्या आयुष्यात सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक महत्वाचा घटक असेल तर तो आहे “नाती”….!! म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की, जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती किंवा मित्र आपले मन दुखावतात किंवा आपल्याला त्रास देते तेव्हा आपण काय करायचे. आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवला पाहिजे. याची माहिती आजच्या या लेखातून आपण घेणार आहोत.
आपल्याला समोरच्या व्यक्तीचा त्यावेळेस त्रास होत असतो. ज्यावेळी आपण त्या व्यक्तीच्या वागण्याला प्रतिसाद देत असतो. जर आपण त्याच्या वागण्याला प्रतिसाद दिला नाही तर भविष्यामध्ये आपल्याला त्या व्यक्तीपासून कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. यासाठीच आज आपण काही तीन गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्यामुळे त्याला त्या व्यक्तीच्या वागण्याला आपण प्रतिसाद देऊ शकणार नाही.
पहिला मुद्दा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही सुख व दुःख येत आहेत ते आपल्यामुळे होत आहे. हे समजून घेतल्या तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होणार नाही. तो दुःख असो किंवा अपयश असो अशी फळ असतात हे माझ्या कर्माचे फळ आहे. ज्यावेळेस आपल्याला हे समजते हे माझ्या आयुष्यात घडते ते माझ्याच कर्मामुळे आहे. तेव्हा आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती येते. आपले 50% दुःख तिथेच कमी होते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही समोरच्याची मागणी सहन करत राहिले पाहिजे.तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल तर समोरच्याला प्रतिकार जरूर करा. कोणाचा पाठिंबा नसेल किंवा तुम्ही प्रतिकार करू शकत नसाल किंवा स्वतःला समजून सांगा की माझ्याच कर्माची फळे आहेत आणि मला ती भोगावीच लागणार.
दुसरा मुद्दा आपण बऱ्याच वेळा दुःखी अशामुळे सुद्धा होतो कारण आपण समोरच्यांकडून अनावश्यक अपेक्षा ठेवत असतो. समोरच्याने हेच केलं पाहिजे, समोरच्याने तेच केलं पाहिजे, समोरचा असाच वागला पाहिजे, समोरचा तसाच वागला पाहिजे आणि ज्या वेळेस आपली एखादी अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपण दुःखी होतो. महाभारतामध्ये भीष्मपिता सांगतात अपेक्षा हे सर्व दुःखाचे मूळ आहे. आपण समोरच्यांकडून अनावश्यक अपेक्षा ठेवल्या तर आपल्याला दुःख हे येणारच. म्हणून स्वतःला प्रश्न विचारून बघा मी समोरच्यांकडून अनावश्यक अपेक्षा तर ठेवत नाही ना.
तिसरा मुद्दा तुम्हाला जर छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रास होत असेल तर समजून जा तुमच्या मध्ये खूप अहंकार आहे. एवढा मोठा तुमचा अहंकार असेल तेवढ्या लवकर तुम्ही दुःखी व्हाल. या लोकांमध्ये अहंकार जास्त असतो. ते खूप संवेदनशील असतात. अशी लोक छोट्या छोट्या गोष्टी मनाला लगेच लावून घेतात. संत असतात तो होत नाही कारण त्यांच्याकडे अहंकार नसतो. कोणी त्यांना शिव्या दिल्या किंवा त्यांना कोणी काही वाईट बोलले तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. कारण त्यांचा अहंकार खूप पातळ असतो किंवा त्यांच्यामध्ये अहंकारच नसतो. तुमची जर कोणी साधी मस्करी झाली केली आणि तुम्ही दुःखी होत असाल तर समजून जा तुमच्याकडे खूप अहंकार आहे आणि या अहंकाराला पातळ केलं पाहिजे. मग हे या अहंकाराला कमी करण्यासाठीच बंदी आहे.
अशा प्रकारे जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला दुःख देते, त्रास देते, तेव्हा ह्या ३ गोष्टी नेहमी लक्ष्यात ठेवा.