घराबाहेर कोहळा नेमका का लावला जातो..? कोहळा लावण्याची नक्की योग्य वेळ कोणती..? ९९% लोकांना माहिती नसेल याचे कारण..

अध्यात्म

आपल्या आधुनिक तंत्रज्ञान किती ही विकसीत झाले असले तरी ही अनेक अश्या गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात. आपले व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक अश्या काही गोष्टी करत असत ज्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घराच्या बाहेरच राहील. अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोहळा बांधतात. कोहळा हा एक फळ आहे. प्राचीन काळी या फळाचा उपयोग यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी व्हायचा.

अशी मान्यता आहे की हा कोहळा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या मध्ये शोषून घेतो. आपल्या घराला, घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागली असेल, नजर लागली असेल किंवा एखादी बादा उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता कोहळयामध्ये आहे. हा कोहळा घरापुढे, दुकानापुढे किंवा ऑफिसपुढे देखील बांधला जातो. मात्र हा कोहळा बांधण्याची एक विशिष्ठ रीत आहे, विधी आहे. जर त्या विधीचा पालन केल गेला नाही तर मात्र या कोहळ्याचा कोणताही लाभ प्राप्त होत नाही.

अनेक जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही कोहळा बांधला होता तर तो काही दिवसातच सडून गेला त्यातून पानी पडू लागले, तर हा अपशगुन तर नाही. तर मित्रांनो या लेखात तुम्हाला या सर्व प्रश्नांचं उत्तर मिळेल त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

कोहळा खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोहळा देठ असणारा असावा. कोहळा आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यावा आणि आपल्या देवघरासामोर पाठावरती एखादा वस्त्र ठेवून त्यावर हा कोहळा ठेवावा. आणि त्याच्या एका बाजूवर अष्ट गंधाने ओम आणि दुसऱ्या बाजूला कुंकवाच्या मदतीने स्वस्तिक काढायचा आहे. आणि त्यानंतर देठापासून ते बुडापर्यंत काजलच्या मदतीने एक काळी रेग ओढायची आहे.

हे वाचा:   स्वयंपाक घरातील या तीन चुका नवऱ्याला करतील बरबाद… महिलांनो एकदा नक्की बघा …!!

त्यानंतर हा कोहळा पूजा करण्यासाठी तयार आहे. हळद-कुंकू अक्षता वाहून, दिवा लावून, अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवीदेवतांना, आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की या कोहळयाच्या मदतीने आमच्या घराचे वाईट शक्तींपासून, नजर आणि दृष्ट लागण्यापासून रक्षण व्हाव.

त्यानंतर हा कोहळा घराबाहेर टांगायचा आहे. आता टांगताना लक्षात ठेवा की कोहळा टांगल्या नंतर अगदी एका आठवड्यात सुद्धा खराब होतो. अश्यावेळी घाबरून जावू नका तुमच्या वास्तू मध्ये जी काही अशुभ किंवा नकारात्मक ऊर्जा नजर किंवा बाधा आहे ती सामावून घेण्याची क्षमता या कोहळयाची संपलेली आहे. आणि म्हणून कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळायला लागते. तेव्हा कोहळा फेकून द्या, वाहत्या पाण्यामध्ये किंवा काचऱ्यामध्ये टाकून द्या.

आणि पुन्हा नवीन कोहळा आनून घराबाहेर लावायचा आहे. लक्षात ठेवा असा खराब झालेला कोहळा चुकूनही घरामध्ये आणण्याची चूक करू नका. कारण यामध्ये मोठ्याप्रमाणात नकारात्मक गोष्टी साठलेल्या आहेत. जर कोहळा अश्याप्रकारे सुरुवातीला खूप लवकर खराब झाला तर समजून जा की त्याचा योग्य तो वापर चालू आहे. त्याने त्याचे काम उत्तमरित्या केले आहे.

ही अशुभ ऊर्जा कुठेतरी लांब घराबाहेर फेकून द्यायची आहे. आता नवीन कोहळा जो तुम्ही आणाल तो जास्त दिवस टिकलेला दिसेल. किंवा जर खूप जास्त नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल तर तो देखील खराब होईल. तेव्हा नव्याने कोहळा टांगन्याची तसदी तुम्ही घेतली पाहिजे. एकदा का घरातील वातावरण नीट झाला सकारात्मक ऊर्जा वाढीस लागली तर हा कोहळा वर्षवर्ष भर टिकून राहतो.

हे वाचा:   महिलांनी लावा या रंगाची टिकली नशीब साथ देऊ लागेल घरात येईल पैसा, सुख-समृद्धी

कोहळा शक्यतो शनिवारी लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे. शनिवारीच कोहळा टांगायचा आहे, त्याची पूजा करायची आहे आणि ते सुद्धा सूर्यास्त झाल्यानंतर. जर कोहळा खराब झाला आणि नवीन लावायचा आहे तर तो सुध्दा शनिवारीच लावायचा आहे. परंतु एकदा कोहळा लावल्यानंतर पुढील शनिवारी अमावस्या आली, दिवाळी अमावस्या आली किंवा सोमवती अमावस्या आली तर या दिवशी तुम्ही कोहळा बदलू शकता.

बदलणे गरजेचे नाही परंतु इच्छा असेल तर बदलू शकता.आता कोहळा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तो नेहमी घराच्या किंवा व्यवसायाच्या बाहेर लावायचा आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडली पाहिजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या कोहळयाच्या खालून आली पाहिजे अश्याप्रकरे तो लावायचा आहे. आणि त्याची जागा निश्चित करायची आहे.

आता असे का करायचे तर बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याला काही बाधा करणार असेल, तिची नजर जर आपल्याला लागणार असेल तर त्या सर्वांना घरामध्ये येण्याच्या आधी शोषून घेण्याचे काम हा कोहळा करतो. तुम्हाला माहित आहे का कोहळा कधी लावावा..? जर तुमच्या घरातील लोकांची सारखी चिडचिड होत असेल, उद्योगंद्यांनमध्ये अडचणी येत असतील, कसलीच प्रगती होत नाही आहे, ही सगळी बाहेरची बाधा असू शकते किंवा नजर दोष असू शकतो तर अश्यावेळी या कोहळयाचा वापर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *