देवांना अंघोळ कशी घालावी? या चुका अजिबात करू नये? नाहीतर घराला लागतो दोष ….!!

अध्यात्म

मित्रांनो, आपल्या घरातील महत्त्वाचे जे स्थान आहे ते म्हणजे आपले देवघर आहे. आपल्या देवघरांमध्ये विविध देवी-देवतांच्या मुर्त्या असतात आणि घरातील व्यक्ती हा देवघरा मधील पूजा अर्चना मनोभावे करीत असतात. आपल्या काही अडचणी असतील किंवा आपले जीवन हे सुखा समाधानाचे राहावे यासाठी मनोभावे प्रार्थना करीत असतात. परंतु मित्रांनो काही वेळेस आपण देवपूजा म्हणजे दररोज देवपूजा करून देखील आपणाला इच्छित फळ प्राप्त होत नाही. त्यावेळेस आपल्या मनात येते की, आपण एवढे देवांचे करतो तरी देखील आपल्या घरामध्ये सुख शांती लाभत नाही आणि अडचणी येत असतात. परंतु मित्रांनो तुम्ही कधी याचा विचार केला आहात का? तर काही आपल्या चुकांमुळे देखील आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी येत असतात.

रोज सकाळी उठून देवाची देवपूजा, आराधना केली जाते. जास्तकरून लोकांना पूजेशी निगडित गोष्टी आणि विधीची योग्य माहिती नसते. तसेच धार्मिक मान्यतेनुसेार असे म्हटले जाते की देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. पण आपल्याला पूजेशी निगडित गोष्टींबद्दल माहिती असणे फारच गरजेचे आहे.

म्हणजेच आपण देवपूजा तर करतो परंतु ही देवपूजा करीत असताना आपण देवांना अंघोळ देखील घालत असतो. परंतु ही अंघोळ कशी घालायची आहे? अंघोळ घालत असताना आपल्या हातून अशा काही चुका होत असतात ज्यामुळे आपल्याला देवपूजेचे फळ प्राप्त होत नाही. तर मित्रांनो देवाना अंघोळ कशी घालायची याविषयी आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे.

तर मित्रांनो तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपल्या देवघरांमध्ये जायचे आहे. देवपूजा करीत असताना पहिल्यांदा आपणाला आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे म्हणजेच मित्रांनो बरेच जण हे देवपूजा झाल्यानंतर दिवा अगरबत्ती लावतात. परंतु असे न करता आपल्याला पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून उदबत्ती लावून घ्यायची आहे.

हे वाचा:   जर तुम्हाला श्रीमंत, धनवान व्हायचे असेल तर या झाडाचे मूळ घरात ठेवा…धनवान बनवते याचे मुळ

नंतर आपण देवघरातील ज्या मुर्ती असतात त्या आपण मुर्त्या घेऊन एका ताम्हनामध्ये सर्व मुर्त्या ठेवत असतो आणि वरून पाणी घालत असतो. परंतु हे एकदम चुकीचे आहे म्हणजेच ही आंघोळ घालण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे. कारण यामुळे आपण एका मूर्तीवर जर पाणी घालत असतो त्यावेळेस त्याचे शिंतोडे हे दुसऱ्या मूर्तीवर जातात. मग ते उष्टे पाण्याने अंघोळ घातल्यासारखे होते.

त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने देवांना आंघोळ अजिबात घालायची नाही. तर पहिल्यांदा तुम्हाला एक ताम्हण घ्यावं लागणार आहे किंवा स्टीलचे ताट तुम्ही घेऊ शकता आणि एक मूर्ती आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हाताने त्या मूर्ती वरती पाणी घालायचे आहे. मित्रांनो मूर्ती ती ताम्हणा मध्ये अजिबात ठेवायची नाही. ती आपल्या हातामध्येच घ्यायची आहे.

नंतर आपण मग एका मूर्तीला आंघोळ घातल्यानंतर दुसरी मूर्ती आपल्या डाव्या हातामध्ये घेऊन परत आपल्याला उजव्या हाताने त्यावर पाणी घालायचे आहे. तुम्ही हे पाणी जर थोडेसे कोमट देखील करू शकता. तर अशा प्रकारे प्रत्येक मूर्तीला आपण आंघोळ घालून घ्यायची आहे आणि नंतर एखादे स्वच्छ नॅपकिन किंवा एखादा स्वच्छ टॉवेलने आपण या मुर्त्या पुसून घ्यायच्या आहेत.

मित्रांनो कधीही आपण देवांना आंघोळ घातल्यानंतर देवांसाठी आपल्याला एक स्वतंत्र नॅपकिन किंवा टॉवेल ठेवायचा आहे. ज्यामुळे आपल्याला त्या मुर्त्या पुसून घ्यायच्या आहेत. जर तुमच्या देवघरांमध्ये काही फोटो वगैरे असतील तर हे फोटो आपल्याला ते नॅपकिन थोडेसे ओले करून ते फोटोज वगैरे पुसून पुसून घ्यायचे आहेत.

तसेच आपले देवघरांमध्ये जर एखादे कापड असेल देवांचे कापड तर ते कापड तुम्ही व्यवस्थित स्वच्छ अंथरायचे आहे. मित्रांनो बरेच जण हे कापड आहे तसेच दररोज वापरत असतात .म्हणजे महिनाभर ते कापड स्वच्छ करत नाहीत. तर मित्रांनो आठवड्यातून दोन वेळा आपल्याला हे देवांचे कापड स्वच्छ करायचे आहे.

हे वाचा:   तुमच्याही घरात उंदीर आहेत का ? जाणून घ्या घरात उंदीर असणे शुभ आहे कि अशुभ……!!

देवघर नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे आणि नंतर आपणाला हे कापड अंथरून त्यावरती आपल्याला मग आपल्या देवी देवतांच्या मुर्त्या स्थापन करायचे आहेत. फोटो आपल्याला तिथे ठेवायचे आहेत तसेच मुर्त्या ठेवीत असताना आपल्याला तिरक्या अजिबात ठेवायच्या नाहीत. व्यवस्थित आपल्याला मुर्त्या ठेवून नंतर आपल्याला जे काही आपली विधिवत पूजा आहे ती पूजा करायची आहे.

अंघोळ घातल्यानंतर जे पाणी असते ते पाणी आपणाला तुळशीत अजिबात घालायचे नाही. तुळस ही खूपच पवित्र मानले गेलेली आहे. त्यामुळे हे पाणी तुम्ही आपल्या घरामध्ये जर मनी प्लांट चे झाड असेल तर त्या झाडाला घालू शकता किंवा इतर कोणतीही झाडे असतील तर त्यांना घालू शकता. मात्र तुळशीला हे पाणी अजिबात घालायचे नाही.

मित्रांनो कधीही देवपूजा करीत असताना मनात कोणतेही वाईट विचार येणार नाहीत याची अवश्य दक्षता घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व विधीवत आपल्या देवी देवतांची पूजा करायची आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर देवपूजा केली तर यामुळे तुम्हाला पूजेचे इच्छित फळ प्राप्त होईल. देवी देवता आपली पूजा स्वीकारतील. तसेच ते आपल्यावर प्रसन्न देखील होतील.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या देवघरामधील देवी देवतांना अंघोळ घालून देवपूजा करायचे आहे. जेणेकरून देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्यावर तसेच आपल्या कुटुंबीयांवर नक्कीच राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *