देवापुढे रडल्याने काय होते? देवपूजा करताना डोळ्यात पाणी येणे, अश्रू येणे काय असतात संकेत ? वाचा सविस्तर

अध्यात्म

मित्रांनो पांडुरंगाजवळ, विठू माऊली जवळ एकच मागण करा की हे विठू माऊली मला मुक्ती मिळावी असं ज्ञान दे, मुक्ती मिळावी असं कर्म माझ्या हातून घडू दे.
मित्रांनो देवापुढे रडल्या नक्की काय होतं याबाबत तुम्हाला काय माहित आहे का ?  फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की, देवा पुढे गेल्यानंतर त्याचे डोळे पाणावतात, आपोआपच डोळ्यातून पाणी वाहू लागते, हुंदके येतात, लोक रडतात देवापुढे नतमस्तक होतात.
मित्रांनो अशी परिस्थिती तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजतं. आपण ज्यांना आपल्या जवळच समजत असतो, आपल्या प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय होते, ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करत होतो, अशी आपली पत्नी, आपला पती, आपले आई-वडील, भाऊ-बहीण, आपली मुलं आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात.

म्हणजे आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तिच माणसं आपल्याशी संबंध तोडतात. आपल्याला दूर लोटतात, आपला द्वेष करतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्ची केल ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो  ते आपले कधीच आपले नव्हते. आपला फक्त तो परमेश्वर आहे ती विठू माऊली आहे. आपण सर्वांना विसरून देवापुढे जेव्हा आपण रडतो नतमस्तक होतो आणि देवाला म्हणतो की हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. हे विठू माऊली तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही.

हे वाचा:   महिलांनी लावा या रंगाची टिकली नशीब साथ देऊ लागेल घरात येईल पैसा, सुख-समृद्धी

मित्रांनो तुमची ज्याचा देवावर श्रद्धा आहे मग  महादेव,   स्वामी समर्थ, गजानन महाराज असो, श्री अंबाबाई असो, दुर्गा माता असो ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे  श्रीहरी विष्णू म्हणजेच नारायण असते विठ्ठल म्हणजेच विठू माउली असतील त्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो. त्या बोलण्यामध्ये त्या प्रत्येक शब्दांमध्ये फक्त सत्य असतं. खरेपणा असतो. हृदयातून बाहेर पडलेले शब्द खरे असतात.

मित्रांनो असा अनुभव त्याला येतो तो त्या विठू माऊलीशी, त्या परमेश्वराशी, त्या देवतेशी एकरूप होतो. जणूकाही विठू माऊली आई म्हणून आपल्याकडे पाहते आहे आणि प्रेमभावनेने पाहत आपल्याला शांत करते आहे ती म्हणते आहे की, ‘ बाळा रडू नकोस तू माझाच आहेस. ही मोहमाया आहे हे तुला समजलं. त्यामुळे काळजी करू नकोस. तर तू माझा लाडका आहेस.’

मित्रांनो ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशीबवान असतात त्या परमेश्वराशी त्या परमशक्तीशी एकरूप होतात आणि ती माऊली जेव्हा तुम्हाला प्रेमाने  कुरवाळत असते. तुम्हाला जवळ घेते. तुमची आई तुम्ही लहान असताना तुम्हाला जवळ घ्यायची. तुम्हाला कुरवाळायची तुमच्यावर निस्सीम प्रेम करायची. अगदी तेच प्रेम ती विठू माऊली आपल्यावर करते. स्वामी समर्थ आपल्यावर करतात आणि आणि ही माऊली आपल्याला कधीच अंतर देत नाही.

हे वाचा:   देवांना अंघोळ कशी घालावी? या चुका अजिबात करू नये? नाहीतर घराला लागतो दोष ….!!

मित्रांनो हा अनुभव आल्यानंतर आपण उतू नका मातू कारण हा अनुभव जेव्हा येतो आपण आपल्या मागण्या त्या विठू माऊली पुढे मांडतो ते मागणं नक्की पूर्ण होत. नक्की पूर्ण मला तुम्ही जे काही त्याठिकाणी बोलता जे विश्वास श्रद्धा ठेवा. हा अनुभव आल्यानंतर तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढल्यानंतर त्या माऊलीला, देवाला  विसरू नका.

मित्रांनो तुमच्या आजूबाजूचे लोक मी तुमचे कधीच नव्हते कधीच होणार नाहीत मात्र माऊली सांगते की, आजूबाजूच्या प्रत्येकावर प्रेम करा मात्र त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा  करू नकोस. तू लोकांची सेवा कर, जनसेवा करा, सर्वांचं भलं कसं होईल याचा विचार करून कोणाबद्दल ही वाईट चिंतू नकोस. तुझे आई-वडील, तुझी पत्नी, पती, तुझी मुलं भावंडं सर्वांवर प्रेम कर.

मित्रांनो गोरगरिबांची सेवा करा. आपल्या सभोवती ज्यांना आधार हवा,  मदत हवी आहे त्या प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करा. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हे संपूर्ण जग मिथ्या आहे फक्त विठू माऊलीच आपली आई आहे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *