जास्त भात जास्त खाणाऱ्यांनो जास्त भात खाण्याचे हे शरीराला होणारे नुकसान माहित नसेल तर एकदा नक्कीच वाचा महत्वपूर्ण माहिती आणि शेअर करायला विसरू नका !

आरोग्य

मित्रांनो, बहुतांश भारतीय लोकांचा भात हा नित्य आहारात असतोच. भाताचे वेगवेगळे प्रकार केले जातात. तरीही मसालेभात, बिर्याणी, व्हेज बिर्याणी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी अशा वेगळ्या पद्धतीने भात आवडीने खाल्ला जातो. भात खाण्याचे फायदे आहेत. परंतु अति प्रमाणात भात खाल्ल्याने त्याचे आपल्याला तोटेही होतात. काही लोकांना दररोज वरण-भात-तूप खायला आवडतं. असा भात नक्की खा तो आपल्या शरीरास फायदेशीर ठरतो. परंतु आपल्या पूर्वजांनी एक मुद्दा भात असा जो प्रघात घालून दिलेला आहे. तो मात्र पाळा.

मित्रांनो, तांदळामध्ये चरबी म्हणजे फॅट्सचे प्रमाण आणि नैसर्गिक स्वरुपातील साखर देखील कमी असते. तांदळाचे नियमित मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास शरीरात इन्सुलिनचा स्राव संतुलित प्रमाणात राहण्यास मदत मिळते.
तांदळामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते. यातील पोषक घटकांमुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

मित्रांनो, हे फायदे झाले प्रमाणात भात खाण्याचे. परंतु काही लोक अति प्रमाणात भात खातात ताट भरून भात खातात अशा लोकांना मात्र भात खाण्याने नुकसानच होतं. कारण अति तिथं माती ही म्हण काहीही खाताना लक्षात ठेवा. आपल्याला किती प्रमाणात काय खावे हे शिकवून ठेवले आहे जसे की चिमुट्भर मीठ, चमचाभर साखर, ओंजळभर चिरमुरे, ओंजळभर लाह्या, एक वाटी भात हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, तांदूळ दोन प्रकारचे असतात. एक पांढरा आणि दूसरा पिवळ्या रंगाचा असतो. ज्याला ब्राऊन राइस असे म्हणतात. पांढरा तांदूळ श-रीरास नुकसानकारक असतो. पांढर्‍या तांदुळावरचे टरफल काढून टाकले जाते. म्हणजेच हा पॉलिश केलेला तांदूळ असतो. परंतु पिवळ्या तांदुळावरील टरफल काढले जात नाही. कारण याला प्रथम हलके शिजवले जाते, ज्यामुळे त्याचे टरफल कडक होते.

हे वाचा:   कुटे भेटलीच तर तोडून घ्या ही फुले आणि घरात, आणि शेतात टाका १००% पुन्हा घरामध्ये आणि शेतात उंदीर नावालाही दिसणार नाहीत ....!!

मित्रांनो, पॉलिश केलेला भात लवकर शिजतो, लवकर तसा पचतोही. परंतु लवकर पोट भरले तरी रिकामेही लवकरच होते. तसेच त्यामुळे आपली पचनशक्ती कमजोर बनते. पोटाचे विका र वाढतात. पांढऱ्या तांदुळात विटामीन सी ची मात्रा अजिबात नसते. त्यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात. आणि मधुमेही लोकांसाठी हा भात नुकसानकारक  आहे त्यामुळे अशा लोकांनी भाताचे सेवन करू नये. भातात ग्लुकोजची मात्रा खूप असते. त्यामुळे मधुमेही लोकांनी याचे सेवन करू नये. तसेच मित्रांनो दमा आहे, धाप लागत असेल, अस्थमा झालेल्या लोकांनी त्रास होत असताना भात आजिबात खाऊ नये. अस्थमाच्या लोकांना पण भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. मित्रांनो तसेच काही करणारे शरीरावर कोठेही भाजले असेल मोठी जखम असेल जखम ओली असेपर्यंत भात खाऊ नका

सफेद तांदुळात विटामीन सी ची मात्रा अजिबात नसते. ज्यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात. म्हणून मधुमेह अस्थमा  असा रुग्णांनी भातापासून दूर राहावे. मित्रांनो पांढऱ्या भाताला पर्यायही आहे. तो म्हणजे ब्राऊन राईस. खूप लोक आता ब्राउन राईस चा पर्याय निवडत आहेत आणि ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे.

मित्रांनो, ब्राऊन भातामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. ब्राऊन भातामुळे त्वचा मुलायम राहते. तांदळाची पेजही श-रीरासाठी चांगली असते. भात मुळीच खाऊ नका असे नाही त्याचे प्रमाण कमी करा जर जास्त खात असाल तर तितका भरपूर व्यायाम करा. तसेच जेवणामध्ये सर्वप्रथम ज्वारी चा समावेश करा कोणताही आजार होणार नाही.

हे वाचा:   सोन्यापेक्षा मौल्यवान हे एक फुल, हे भयंकार ११ आजार मुळापासून बरे करते हे एक फुल सहित, अजून होणारे फायदे वाचून थक्क व्हाल …!!

मित्रांनो, रोजच्या आहारात गहू, मक्का, नाचणी, बाजरी तसेच मिक्स कडधान्य घालून तयार पिठ हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, कच्चा कांदा, कोथंबीर, कोबी, गाजर, काकडी असा यांचाही समावेश करा. तसेच रोज किमान वाटीभर ताक दुपारच्या जेवणात घ्या आणि शेवटी एक वाटी भाताची मुद हा पर्याय ठेवा. रोजच्या जेवणात पांढऱ्या भाताचं प्रमाण कमी करून ब्राऊन भात खा. म्हणजे तुमचं आ-रोग्य चांगलं राहील.

मित्रांनो, निरोगी व्यक्तींनी काहीही खा पण व्यायामाला पर्याय नाही मी रोज एक तास चालण्याचा पोहोण्याचा जिमला जाऊन व्यायाम करण्याचा असा कोणत्याही प्रकारचा एक व्यायाम नियमितपणे करा किंवा घरी योगासने सूर्यनमस्कार करा. परंतु एक तास व्यायाम हा केलाच पाहिजे. वेळेत झोपून वेळेत उठलं पाहिजे. किमान सहा ते आठ तास झोप शरीराला मिळाली पाहिजे. जेवणाच्या वेळा ठरवून घ्या आणि त्याच वेळी जेव्हा भरपूर पाणी प्या आणि निरोगी आयुष्य जगा.
 
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *