अमावस्येची काळी रात्र आणि भुताटकी ! पण त्या रात्री स्वामी समर्थ महाराजांनी असे काय केले की….. पुढे वाचून अंगावर काटा येईल …!!

अध्यात्म

मित्रांनो आपण अनेकजण स्वामींच्या अनेक सेवा करीत असतो. मंत्रांचा जप करीत असतो. स्वामींचे अनुभव प्रचिती अनेकांना आलेले देखील आहेत. तर आज आपण असाच एक अनुभव एका दादांना आलेला पाहणार आहोत. तर हा अनुभव अमावस्येच्या काळी रात्रीचा आहे आणि त्यांचा हा अनुभव आपण त्यांच्या शब्दांमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार मी श्लोक. काही लोड कामामुळे मला ओव्हरटाईम करावा लागणार होता. त्यामुळे मी ऑफिसमध्ये खूप वेळ थांबलो होतो आणि माझ्याबरोबर जुई देखील माझ्या ऑफिसमध्ये थांबलेली होती.

तिचं काम झालेलं होतं परंतु मी ओव्हरटाईम साठी थांबलो त्यामुळे तिने ती देखील माझ्याबरोबर थांबली होती. नंतर काही वेळाने माझे काम आटोपले होते. परंतु खूपच रात्र झालेली होती. सर्वत्र काळोख झालेला होता. नंतर आम्ही दोघेही घराकडे जाण्यासाठी निघालो. वाटेत जाताना आम्हाला खूप काळोखात फार भीती वाटत होती. पण आम्ही बसची वाट पाहत होतो.

त्यावेळेस एका बाजूला एक लहान मुलगा रडत आहे असे जाणवले. त्यावेळेस मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु जुईने मात्र आपुलकीने त्या बाळाला विचारले तू का रडत आहेस असे म्हणून विचारू लागली. तर तो फक्त म्हणाला की मला आईकडे जायचं आहे. त्यानंतर तिथे अचानकपणे बस आली त्या बस मध्ये मग तो लहान मुलगा पटकन चढला. मग आम्ही देखील त्या बस मध्ये चढलो. नंतर आम्हाला लास्ट ची शीट मिळाली. त्यातील प्रवासी जे होते ते विचित्रच होते.

म्हणजे शांत बसलेले होते त्यांच्या कोणतेही प्रकारची हालचाल देखील नव्हती. त्यावेळेस कंडक्टर येऊन आम्हाला म्हणाला की बसा निवांत. मी थोडा वेळ जाऊन येतो. नंतर आम्ही बसलो तो मुलगा अगदी खिडकी शेजारी बसलेला होता. आम्हाला खूपच भीती देखील वाटत होती. कारण जे प्रवासी बसलेले होते ते कोणताही आवाज करत नव्हते किंवा कोणत्याही प्रकारचे हालचाल देखील करत नव्हते.

नंतर ते जे प्रवासी होते ते आमच्याकडे बघून हसायला लागले त्यावेळेस आम्हाला फारच भीती वाटू लागली. कारण त्यांचे हसणे खूपच वेगळे होते. नंतर एक प्रवासी आमच्या जवळ आला आणि तो म्हणाला की तुम्ही तर आमच्यातले नाहीत तुम्ही पुढच्या स्टॉपला उतरून उजव्या साईडला निघून जा. असे सांगितल्यानंतर आम्हाला तर खूपच भीती वाटू लागली. नंतर कंडक्टर आला आणि कंडक्टरने पैसे न घेताच तिकीट दिले आणि त्या तिकिटावरती जे लिहिले होते ते लिहिले होते की जुना आगार जुन्या आगार तर खूप दिवसांपासून बंद पडले होते. कारण ते आगीमुळे पूर्ण उध्वस्त झाले होते.

हे वाचा:   स्वामींच्या समोर रडल्याने काय होते? कोणता चमत्कार होतो? एकवेळेस नक्की वाचा ; श्री स्वामी.समर्थ ....!!

हे ऐकून तर आम्हाला खूपच भीती वाटू लागली आणि नंतर जुईचे लक्ष त्या लहान बाळाकडे गेलं. तर त्याचे पाय उलटे होते आणि बाकीच्या प्रवासांकडे देखील मी देखील पाहिलं तर सगळ्यांचे पाय उलटे होते. त्यानंतर आम्हाला दुसरा पर्यायच नव्हता बस मध्ये बसण्याशिवाय. नंतर पुढचा स्टॉप आला म्हणजे बस हळूहळू चालू लागली. त्यावेळेस लगेच जुईने मला खाली उतरण्यास सांगितले. आम्ही दोघे देखील लगेच पटकन खाली उतरलो आणि उजव्या दिशेने एकटक पळू लागलो.

ती वाट जंगलाची होती आणि त्या अमावस्येची काळ रात्री असल्यामुळेच आम्हाला खूपच भीती वाटत होती आणि त्या दिवशी अमावस्ये देखील होतील. नंतर थोड्यावेळाने आम्हाला पळणे देखील मुश्किलीचे झाले आणि चालणे देखील नकोसे वाटायला लागले. माझ्यामुळे जुई देखील माझ्याबरोबर या संकटात सापडलेली होती. नंतर आम्हाला तेथून एक झोपडी दिसली झोपडी दिसल्यानंतर आम्ही तिथे गेलो. परंतु जुही नकार देत होते की त्या झोपडी मध्ये आपण जायला नको. कारण बस मध्ये जो आपल्याला अनुभव आलाय तो देखील या झोपडी मध्ये येऊ शकतो.

नंतर तसेच मी जुईला चल म्हणालो आणि तिथे एक म्हातारी आजी होती. तिने दार उघडले आणि मग त्यांना आम्ही आश्रयासाठी मागणी केली त्यावेळेस ती या म्हणाली. आम्ही झोपडी मध्ये बसलो. परंतु जुईचे लक्ष मात्र इकडे तिकडे सगळे लक्ष होतं. भांडी वगैरे होती ती पूर्ण अशी खराब झालेली धूळ साचलेली होती. आम्हाला वाटले की आजीबाई म्हातारी आहे त्यामुळे यांना स्वच्छ करणे जमत नसेल. आम्हाला थोडं पाणी दिलं पाणी पिलो. नंतर आजीबाई आम्हाला म्हणाली की मी थोडसं जेवण करते. मग तुम्ही जेवा.

हे वाचा:   बघा स्वामी आपल्या भक्तांचे कसे नशीब बदलतात सौ जयश्री ताईंना आलेला हा अनुभव वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ; श्री स्वामी समर्थ ....!!

नंतर आजीबाई आत गेल्यानंतर आमचं लक्ष गेलं ते फोटोकडे म्हणजेच त्या फोटोमध्ये आजीबाईचा फोटो होता आणि त्याखाली लिहिलं होतं की कैलासवासी म्हणजेच त्या आजी वारलेले होत्या. हे बघितल्या बघितल्या आम्ही लगेचच त्या झोपडीतून बाहेर पडलो आणि पळत सुटलो. नंतर जुई देखील मला म्हणाली की तुला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की त्या झोपडी मध्ये जायला नको आणि ती आजीबाई परत आली तर काय करायचं आणि अचानकपणे आम्हाला आणखीनच भीती वाटू लागली आणि त्यावेळेस जुई देखील मला धीर देत म्हणाली की काही होणार नाही. कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत. अशक्य की ही स्वामी शक्य करतील.

असे ती म्हणाली तोपर्यंतच आजी म्हणजे ती एक चेटकीन होती आणि ती आमच्या समोर उभी राहिली. तिने माझ्यावर हल्ला केला आणि मला घायाळ केलं. नंतर त्या चिटकिणीच्या समोर जुई आली. चेटकीन हल्ला करणार परंतु चेटकीण जुईला स्पर्श करतात मागे फेकली गेली. म्हणजे जुईचा स्पर्श ती सहन करू शकत नव्हती. त्यावेळेस मी निरीक्षण केले आणि जुईला सांगितले की तुझ्या हातातील जी अंगठी आहे ती अंगठी खूपच प्रभावशाली आहे.

तिच्यामुळेच ती चेटकीण मागे फेकली जात आहे. त्यानंतर मग तिने अंगठीने त्या चिटकिणीला असं स्पर्श केला आणि चेटकिन तिथून गायब झाली. नंतर थोड्या अंतराने आम्ही चालत गेलो तर तिथे एक आम्हाला गणपती मंदिर दिसले आणि त्या गणपती मंदिरामध्ये आम्ही रात्र काढली आणि सकाळी उठल्यानंतर मात्र मग आम्ही आमच्या घरी गेलो आणि त्यावेळेस मला जुईने सांगितले की तिच्या हातातील जी अंगठी होती ती दत्तात्रयांची होती आणि स्वामी महाराजांची होती आणि स्वामींच्या कृपेमुळेच आम्हाला त्या अमावस्येच्या रात्रीतून स्वामींनी आम्हाला धीर दिला. स्वामीनी त्यातून आम्हाला बाहेर काढलं. तेव्हाचा हा अनुभव मी न विसरणारा आहे आणि तेव्हापासून मी मात्र स्वामी सेवेमध्ये आलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *