आयुर्वेदातील सर्वात मोठी चमत्कारिक वनस्पती कुटे भेटली तर जरूर घेऊन या फायदे एवढे की वाचून पायाखलची जमीन सरकून जाईल …..!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आयुर्वेदामध्ये आणि त्याचबरोबर शास्त्रामध्ये अनेक औषधी वनस्पतीचा अभ्यास करण्यात आलेला आहे. तसेच अनेक संशोधन सुद्धा करण्यात आलेले आहे. आयुर्वेदिक शास्त्र हे अतिशय जुने शास्त्र आहे.या शास्त्रामध्ये अनेक वनस्पती बद्दल व फळांबद्दल आयुर्वेदिक गुणधर्म सांगण्यात आलेले आहेत. परंतु वैज्ञानिक बदल यामुळे अनेकदा आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतो आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो. परंतु सध्याचे जीवन हे अतिशय धकाधकीचे असल्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याकडे वेळ देण्याकरिता फारसा वेळ नाही.

म्हणूनच आपण मेडिकल औषधांचा समावेश आपल्या जीवनामध्ये करत असतो.आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना सर्दी, खोकला, कफ मूत्राशय संदर्भातील समस्या, लघवी करताना होणारी जळजळ ,हृदयविकार ,यकृत समस्या अशा विविध समस्या होत असतात.

या सगळ्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आज आपण एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी एक वनस्पती लागणार आहे ती वनस्पती आपल्याला अनेकदा रस्ताच्या कडेला दिसणारी आहे. ही वनस्पती आहे आघाडा. ही वनस्पती गणपतीच्या पूजेसाठी या वनस्पतीच्या पानांचा वापर केला जातो.

या आघाड्याला हिंदीमध्ये अपामार्ग , लटजीरा या नावाने ओळखले जाते . या वनस्पतीची पाने, फुले विविध आजारावर उपयुक्त आहेत. तुमचा दात दुखत असेल ,दाता मध्ये कीड असेल अशावेळी याच्या पानांचा रस लावल्याने सुद्धा आपल्याला आराम मिळतो.

हे वाचा:   अंघोळी नंतर ही एक सवय कायमस्वरूपी बदला, आणी चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, कायमचे घालवून चेहरा गोरा बनवा ......!!

काविळ, विंचु चावल्यावर, बहिरेपणा, प्रदररोग अशा अनेक विकारावर याच्या पानांचा रस उपयोगी ठरत असतो. याशिवाय आघाड्याचा जो तुरा आहे तो सुद्धा अत्यंत उपयोगी आणि औषधी गुणांचा आहे. मित्रांनो या लेखामध्ये आघाड्याचे तुरे यांचे फायदे आणि आघाड्याच्या पानांचा काढा कसा करावा याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आघाडा वनस्पती तुराच्या वापराने आपण आपल्या शरीरातील ज्या काही लघवीच्या समस्या आहेत, पित्ताच्या समस्या आहेत त्या दूर करू शकतो. तसेच अनेकांना लघवी करताना जळजळ होत असते. आग मारणे किंवा लघवी थांबून होणे अशा विविध समस्या दूर करण्याचे कार्य आघाडा चा तुरा करत असतो.

आपल्यापैकी अनेकांना पित्ताची समस्या उद्भवते. पित्त झाल्यावर अनेकांच्या समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या एलर्जी सुद्धा होत असतात. म्हणूनच आपल्या शरीरातील अनेक समस्या व पित्ताच्या समस्या दूर करण्यासाठी आघाडा या वनस्पतीचा तुरा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हा तुरा अत्यंत उपयोगी आहे.यामुळे कफ, खोकला पातळ करतो.

मित्रांनो शरीरात वाढलेली चरबी सुद्धा कमी करायला उपयुक्त ठरतो. हा तुरा आपल्या शरिरातील कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही त्यामुळे हृदय हे निरोगी राहते. अंगाला खाज सुटत असेल किंवा रक्तविकार असतील, रक्त शरीरामध्ये अशुद्ध झालेले असेल ते सुद्धा शुद्ध होते.

हे वाचा:   कोणताही विषारी साप चावला तर सर्वात अगोदर करा हा इलाज; एका मिनिटात विष उतरेल जीव वाचेल महत्वपूर्ण माहिती ....!!

शरीरावरील खाज थांबते, रक्त विकार दूर होतात. या तूरामध्ये म्हणजे मुत्रविकार दूर करणारे गुण असतात.या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात असे तुम्हाला असेल तर वर्षातून पंधरा दिवस आघाड्याच्या पानांचा काढा प्या. यामुळे आपला चेहरा तेजस्वी दिसतो. अनेक आजार दूर राहतात. किडनीची सुद्धा स्वच्छता होते.

या वनस्पतीचे पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळत ठेवायचे. उकळून थंड झाल्यावर सेवन करायचे असे केल्याने आपला चेहरा तेजस्वी दिसतो.हा काढा जर आपण बनवला तर आपला चेहरा तर तेजस्वी दिसतो.

पण त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारचे त्वचा विकार देखील होत नाही. हृदयविकार सुद्धा होत नाही तसेच तुम्हाला खाज, खरूज, नायटा यासारख्या समस्या उद्भवणार नाही. तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालेल व त्याचबरोबर पित्ताची समस्यासुद्धा उद्भवणार नाही. म्हणून जर ही वनस्पती तुम्हाला आजूबाजूला कुठे सापडले तर या वनस्पतीचा अवश्य उपयोग करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *