मित्रांनो, अगदी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या कमालीच्या वनस्पतीचे एक चमचाभर चूर्ण फक्त सात दिवस तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा. तुमच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या चरबीच्या गाठी असतील त्या पूर्णपणे वितळून जातील. कुठल्याही प्रकारचा त्वचारोग असेल, उष्णतेचा तुम्हाला त्रास असेल, अंगावर पित्त उठत असेल त्याच बरोबर तुम्हाला वातेचा त्रास असेल, सांधेदुखी होत असेल, काही जणांना अर्धे डोके दुखण्याची समस्या असते अशा अनेक प्रकारच्या समस्या या चमत्कारिक वनस्पतीने पूर्णपणे मुळापासून निघून जातात. ती वनस्पती कोणती आहे? याचा वापर कसा करायचा? हे सर्व आपण पाहुया.
ही वनस्पती कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळते. याशिवाय तुमच्या घराच्या आजूबाजूला सर्वत्र उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्वचारोग असेल, अंगावर तुमच्या फंगल इन्फेक्शनमुळे खाज येत असेल अशा प्रकारचा कुठलाही त्वचारोग अंगावर असेल किंवा अंगावर पित्तामुळे पुरळ येत असेल, फोड येत असेल, घामोळ्या येत असतील, उष्णतेचा त्रास असेल अशा प्रकारचा कुठलाही त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा ही वनस्पती अत्यंत महत्वाची आहे. हे चूर्ण आहे ते नागरमोथा या वनस्पतीचे चूर्ण आहे. नागरमोथा याला मराठीमध्ये लव्हाळा म्हणतो.
मित्रांनो लव्हाळा ही सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे. संस्कृत मध्ये याला नागर मुस्तक म्हटले जाते. आजही तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेला तर तुम्हाला माहिती असेल. ज्या व्यक्तींना अंगावरती पुरळ येते, पित्त येते, अंगावरती चरबीच्या गाठी आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा त्वचारोग आहे अशा व्यक्तीला लव्हाळाच्या बुडाची माती अंगाला लावून आंघोळ घातली जाते. त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या चरबीच्या गाठी वितळून जातात. पूर्वीपासून हा उपाय आयुर्वेदात आहे. तुम्हाला वातीचा त्रास असेल अशा व्यक्तींना सुद्धा या वनस्पतीचा खूप फायदा होतो.
जर तुम्ही खेडेगावमध्ये राहत असाल तर नागर मोथा उपडल्यानंतर त्याच्या बुडामध्ये जी एक गाठ निघते, कंद निघतो छोटासा असे दोन कंद आणायचे आहेत. ते कुटून घ्यायचे आहे. ओले टाकले तरी चालतील. वाळवून त्याचा वापर केला तरी चालेल. जर पावडर असेल तर एक चमचा अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे.
आंघोळीचे पाणी गरम करत असताना त्याच्यामध्ये हे बारीक केलेली पावडर टाकायचे आहे. हे पाणी तोंडामध्ये जरी गेलं तरी याचा साईड इफेक्ट नाही. पोटामध्ये गेलं तरी याचा साईड इफेक्ट नाही. नागरमोथा चूर्णाचा वापर खाण्यासाठी सुद्धा केला जातो.
लहान असो मोठा असो सर्वांना वापरता येतो. अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि सहा ते सात दिवस या पाण्याने अंघोळ करायची आहे. तुमच्या अंगावर पुरळ येत असेल, चरबीच्या गाठी असतील असा कुठलाही त्रास होत असेल तर या उपायाने निघून जातो. त्याचबरोबर अनेक व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास असतो. अर्धे डोके दुखते तर अशा व्यक्तींना या सहा सात दिवसाच्या वापराने निघून जातो.
बऱ्याच जणांना चक्कर येण्याची समस्या असते. तीसुद्धा या उपायाने निघून जाते. शरीर तुमचे पूर्णपणे शुद्ध होत. या वनस्पतीचा वापर तुम्ही ताजी आणून करा किंवा चूर्ण मिळत असेल तर चूर्ण आणून करा. या वनस्पतीचा केसांना सुद्धा चांगला फायदा होतो. तर असा हा घरगुती आयुर्वेदिक उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.