आयुर्वेदातील चमत्कारिक या वनस्पतीची दोन फळे दिसताक्षणी तोंडात टाका ; फायदे इतके की या पुढे संजीवनी बुटी सुद्धा फेल होईल असे जबरदस्त फायदे …!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आसपास असलेल्या वनस्पतीचा आपणाला आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला फायदा होतो. पण त्यांचा वापर कशासाठी उपयोगी ठरेल? हेच माहित नसल्याकारणाने आपण घरगुती उपाय करत नाही. आज आपण पोपटी या औषधी वनस्पतीचे गुणधर्म माहित करून घेणार आहोत. पोपटी वनस्पतीला इंग्रजीत केप गुजबेरी या नावाने ओळखतात हिंदीत या वनस्पतीला रसबेरी तंकारी किंवा टिपरी या नावाने ओळखतात. संस्कृत भाषेमध्ये तंकसी या नावाने या वनस्पतीचा उल्लेख आढळतो.

मित्रांनो पोपटी ही बहुवर्षायू आणि एक मीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. त्यावर एक अंडाकृती जाड टोकदार व लवदार पाने आढळतात. फुले मध्यम आकाराचे घंटाकृती व फिकट पिवळी असून फुलाच्या तळाशी मोठा जांभळा ठिपका असतो. फळे सुरुवातीला हिरवी असतात. पिकल्यावर ती पिवळी नारंगी होतात. त्याच्या पिकलेल्या फळात अनेक चपट्या बिया असतात. या फळांमध्ये कॅरोटीन व एस्कॉर्बिक आम्ल असल्याने ते आंबट गोड लागते.

ही फळे कच्ची किंवा पिकल्यावर खातात. त्यांचा मुरंबा घालतात किंवा मिठाई त्याचा वापर केला जातो. उत्तर प्रदेश, राजस्थान, कन्नूर, पुणे, आंध्रप्रदेश या ठिकाणी या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. ही वनस्पती आपल्या परिसरात पावसाळ्याच्या दिवसात अनेक वेळा अनेक ठिकाणी बहरलेली आपण पाहतो. परंतु या पोपटीचे औषधी गुणधर्म आपल्याला माहीत नसतात.

हे वाचा:   सुकलेली तुळस फक्त दोन दिवसांमध्ये १००% हिरवीगार होणार असा उपाय .....!!

मित्रांनो शेतात गवत म्हणून वाढणाऱ्या या वनस्पतीच्या पंचांगांचा म्हणजेच पान, फुल, फळ,खोड आणि मुळ्या यांचा आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर केला जातो. पोपटीच्या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, विटामिन ए आणि विटामिन सी हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय यामध्ये कॅरोटीन नावाचे तत्व असते. जे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवते. यकृत म्हणजे लिव्हरचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी या वनस्पतीचा फार उपयोग होतो. ही वनस्पती पित्त विकार नष्ट करून पचनक्रिया सुरळीत करते. याशिवाय सांधेदुखी व सूज कमी करण्यासाठी देखील ही वनस्पती उपयोगी आहे.

मित्रांनो ज्या व्यक्तींना भूक लागत नाही. ज्यांची पचनशक्ती कमजोर झालेली आहे अशा व्यक्तींनी पोपटीच्या पानांचा काढा बनवून 20 मिली सकाळ संध्याकाळ पिल्याने भूक वाढते. शिवाय याचे नियमित काही दिवस सेवन केल्याने पित्ताची समस्या दूर होऊन पोटातील सूज कमी होते. सूज कुठलीही असो शरीराच्या आतील किंवा बाहेरील याच्या पानांचा लेप बनवून त्यावर लावल्यास सूज उतरते. यामध्ये अँटिबॅक्टरियल व अंटी फंगल गुणधर्म असतात. ज्याने सर्व प्रकारचे त्वचा विकार दूर होऊ शकतात.

मित्रांनो सफेद चट्टे झालेले असल्यास याच्या पानांचा लेप बनवून त्यावर दिवसातून तीन वेळा लावावा. चट्ट्यांचा आकार दिवसागणित कमी व्हायला लागतो. या पानांचा काढा नियमित पिल्याने मुळव्याध बरा होतो. रक्तातील साखर कमी करण्यासाठी ही याच्या पानांचा 20 मिली रस दररोज सेवन करावा. शिवाय याची ताजी फळे खाल्ल्यावर सुद्धा डायबिटीस नियंत्रणात राहतो. या फळामुळे डायबिटीज मुळे होणारे शरीराचे कमजोरी देखील कमी होते. सांधेदुखीवर याच्या पानांचा लेप बनवून सांध्यांवर लावावा. सोबतच याच्या पानांचा दहा मिली रस नियमित पिल्याने सांधेदुखी बरी होण्यास मदत होते.

हे वाचा:   अवघ्या आठ दिवसात किडनी स्वच्छ व साफ करा ; या घरगुती उपायाने किडनी धुतल्यासारखी साफ होणार डॉ; स्वागत तोडकर यांचा घरगुती उपाय !

मित्रांनो पोपटीची ताजी पाने नेहमीच उपलब्ध होत नसतात. यासाठी त्याच्या पंचांगांची पावडर बनवून अवश्य ठेवा या पंचांगाचा काढा करून दहा मिली या प्रमाणात सेवन केल्यास खोकला उचकी आणि श्वास विकारांपासून आपला बचाव होतो. कधी कधी यकृताला सूज येते. अशावेळी पोपटीच्या पंचांगाचा काढा बनवून दहा मिली या प्रमाणात पिल्याने सूज उतरते. तसेच उच्च रक्तदाब असल्यास याची फळे खावीत. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

मित्रांनो या फळांमध्ये विटामिन ए मुबलक असल्याने ही पिकलेली फळे खाल्ल्याने डोळी डोळे निरोगी राहतात. या फळामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व हाडे मजबूत होतात. तर मित्रांनो अशी ही बहुउपयोगी पोपटी-ढोलांबाची फळे नक्की खा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *