फक्त तीन दिवसात चेहऱ्यावरील कितीही जुनाट वांग घालवा ; या घरगुती उपायाने वांग घालवण्यासाठी खास घरगुती आयुर्वेदीक उपाय …..!!!

आरोग्य

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा एक भाग आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण आता याची चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. .ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेचा काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे येतात. मित्रांनो अशा प्रकारचे काळे डाग किंवा चट्टे ज्यावेळी आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर येतात त्यावेळी आपण खूप घाबरून जातो. ज्यावेळी आपण ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स आणि महागडी औषधे लिहून देतात.

मित्रांनो महागडी औषधे किंवा क्रीम्स घेऊन देखील आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग कमी होत नाहीत. याउलट आपल्या चेहऱ्यावर त्या औषधांचा साईड इफेक्ट होण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो जर तुम्हालाही अशा पद्धतीने चेहऱ्यावर काळे डाग किंवा चट्टे उठले असतील आणि तुम्हीही डॉक्टरांकडे जाण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो थांबा. याआधी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले सोपे घरगुती उपाय करून पहा. हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या समस्या लवकरात लवकर दूर होतात. कारण हे उपाय आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले असतात आणि त्याचबरोबर हे उपाय आपण नैसर्गिकरित्या आपल्या घरामध्ये सहज करू शकतो. तर मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या काळे डाग, वांग यांवरच काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत.

हे वाचा:   कसलेही जुनाट फंगल इन्फेक्शन, पावसाळ्यामधील दाद, खाज, खुजली मुळापासून गायब करा फक्त पाच मिनिटात : डॉक्टर स्वागत तोडकर उपाय !

तर मित्रांनो सर्वात पहिला आणि सोपा उपाय जो आपण आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग, वांग किंवा चट्टे घालवण्यासाठी करू शकतो तो म्हणजे हा उपाय करत असताना आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. तो मधून आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर थोडेसे पाणी आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर तो बटाटा आपल्याला आपल्या चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने फिरवायचा आहे. मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काळे डाग उठले आहेत त्या ठिकाणी तर तुम्हाला हा बटाटा फिरवायचाच आहे. पण त्यासोबतच आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरही आपल्याला हा बटाटा गोलाकार फिरवायचा आहे. मित्रांनो या बटाट्यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग लवकरात लवकर दूर होण्यास मदत होत असते.

मित्रांनो वांगच्या समस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या. तो मिक्स करा. हे मिश्रण प्रभावित जागांवर लावा. किमान 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत रहा. एक कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या बटाट्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि प्रभावित त्वचेवर लावा. ते 10 मिनिटं सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका. असे महिन्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा करा.

हे वाचा:   रोज सकाळी बदाम खाण्याचे हे असतात चमत्कारिक सात फायदे : वाचून आज पासूनच खायला सुरवात कराल असे जबरदस्त फायदे .....!!!

मित्रांनो, कोरफड ही देखील आपल्या चेहऱ्यावर खूपच फायदेशीर ठरते. चेहऱ्यावर कोरफड लावताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा. मिश्रण 10 मिनिटं सेट होऊ द्या आणि मित्रांनो हे मिश्रण जेव्हा सेट झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटं तसंच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. त्याचबरोबर मित्रांनो एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील प्रभावित जागी लावा. 20 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या. जोपर्यंत ते सुकत नाही तोपर्यंत तसच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या.

मित्रांनो, त्यानंतरचा आणखीन एक उपाय जो आपण आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग घालवण्यासाठी करू शकतो. तो करत असताना सर्वात आधी एक केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. चांगलं मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण वांग प्रभावित भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. हे उपाय करा आणि आपला चेहरा फ्रेश आणि चमकदार बनवा.

तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमचा चेहरा चारचौघात उठून दिसावा, कोणत्याही प्रकारचे डाग असू नये असे जर वाटत असेल तर हे खास घरगुती उपाय नक्की करून बघा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *