आपली सासू कचरा गोळा करणारी आहे असे समजल्यावर सुनेने केले असं काही की …की वाचून डोळ्यातून पाणी येईल..!!

मनोरंजन

मित्रांनो, आपण कितीही मोठे झालो तर त्यामागे मोठा वाटा हा आपला आई-बाबांचा असतो. आई-बाबाच आपल्याला जन्माला घालतात. तेच आपल्याला चालाया बोलायला शिकवतात. त्याचबरोबर सर्व शिक्षण हे आपल्याला तेच देत असतात. म्हणून त्यांच्या उपकारांची जाणीव हे आपल्याला मोठेपणीही मुले खूप गरजेचे आहे. अशीच एक सुंदर कथा आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

ज्ञानेश्वर आणि प्रगती या दोघांनी आपल्या नवीन घरात आजचं गृहप्रवेश केला होता. घरात पाहुण्याची रेलचेल होती. परंतु सगळे नातेवाईक प्रगतीचेचं होते. ज्ञानेश्वरचे फक्त मित्रचं आले होते. त्याचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता. ज्ञानेश्वरने एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये जवळपास एक कोटी रुपयांचा नवा फ्लॅट खरेदी केला होता दोन महिन्यांपूर्वीचं त्याने एक नवी कोरी लक्झरीअस गाडी सुद्धा खरेदी केली होती. ज्ञानेश्वरची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते. गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपचं उत्साहात पार पडते सगळेजण एन्जॉय करतात आणि ज्ञानेश्वर प्रगतीला शुभेच्छा देऊन जातात. थोड्यावेळ नंतर ज्ञानेश्वर खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. प्रगती तेथे येते आणि म्हणते, “आज खूप थकलेय मी, चल आता झोपूया.” ज्ञानेश्वर लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, “हो मलाही थकल्यासारखं होतंय, हे दोघेही बेडवर येऊन झोपतात.” प्रगती ही ज्ञानेश्वरजवळ येते आणि म्हणते, “आई बाबा तुझं खूप कौतुक करत होते, म्हणत होते सोन्यासारखा जावई मिळालाय आम्हाला. इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवलंय. खरंच हुशार आणि मेहनती आहे तो.

ज्ञानेश्वर म्हणतो, “आता कौतुक करताय परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती, तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आईबापाचा पत्ता नाही नातेवाईकांचा पत्ता नाही. कोण कुठला, काय माहित. म्हणून लग्नाला विरोध करत होते.” प्रगती म्हणते, “मग आता कोणतेही आईबाप असाचं विचार करणार. उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारख्याचं कोणाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील ? ज्ञानेश्वर म्हणतो, “हो, खरं बोलतेय तू, पटलंय मला.” प्रगती त्याला विचारते, “यावरून एक आठवलं, तुझे आई बाबा कोण आहेत, कोठे राहतात, ते आहेत की नाहीत, हे सांग ना मला तुझं हे यश पाहून त्यांना किती आनंद होईल तू त्यांच्याबद्दल कधीचं काही सांगत नाहीसं.” ज्ञानेश्वर म्हणतो, “नाही प्रगती, मला या विषया बद्दल काही बोलायचं नाही. मी त्या लोकांना विसरलो. माझ्याकडे आता फक्त त्यांची एकचं गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझं नाव ज्ञानेश्वर हे नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण त्यांची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाहीये.

प्रगती ज्ञानेश्वरला म्हणते, “ओके शांत हो” नाही विचारणार मी काही चिडू नकोस आणि ती ज्ञानेश्वरला मिठी मारते. हे दोघेजण झोपी जातात. दुसऱ्या दिवशी रविवार असतो. ज्ञानेश्वर हा मस्तपैकी टीव्ही पाहत बसलेला असतो. तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते. प्रगती किचनमध्ये असते. तेव्हा ती ज्ञानेश्वर हाक मारून सांगते, “ज्ञानेश्वर कचरा घेणारी गोळा करणारी बाई आली असेल, दरवाजाजवळ बास्केट ठेवली आहे, देऊन टाक त्यांना.” ज्ञानेश्वर उठतो आणि दरवाजा उघडतो. तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो. तेव्हा या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काचं बसतो. कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून ज्ञानेश्वरची आई उमा असते. उमाही ज्ञानेश्वरला ओळखते आणि ज्ञानेश्वरला पाहून तिला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात.

परंतु ज्ञानेश्वर हा लगेचचं दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे उमाला खूप वाईट वाटतं आणि ती डोळे नुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते ज्ञानेश्वर दरवाजा टेकून डोळे बंद करून उभा असतो. प्रगती हॉलमध्ये येते आणि विचारते, “काय झालं रे ज्ञानेश्वर, दिला का कचरा ?” ज्ञानेश्वर म्हणतो, “हो दिला” आणि तो खोलीत निघून जातो. प्रगतीला तो त्याच्या आईबद्दल काहीही सांगत नाही. आज रविवार असल्यामुळे ज्ञानेश्वर आणि प्रगतीने दुपारी मस्तपैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो. ज्ञानेश्वर पार्किंगमधून गाडी काढतो प्रगती पार्किंगबाहेर उभी असते. ती गाडीत बसू लागते, तर एक वॉचमन सोसायटीचं गेट उघडतो या वॉचमनकडे पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीन सरकते कारण बिल्डिंगचा वॉचमन दुसरा तिसरा कोणी नसून ज्ञानेश्वरचा बाप शंकर असतो. शंकरसुद्धा त्याचा मुलाला ज्ञानेश्वराला ओळखतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते. डोळ्यात अश्रू येतात.

परंतु ज्ञानेश्वर त्याच्याकडे दुसरी नजर देऊन पाहत नाही आणि गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो. तेवढ्यात उमा शंकरजवळ येते. शंकर म्हणतो, “अगं उमे, मी आपल्या लेकाला पाहिलं, ज्ञानेश्वरला पाहिलं.” उमा सांगते, “मीसुद्धा त्याला पाहिलं, त्याचं घर पाहिलं. पाचव्या मजल्यावर राहतो. खूप मोठा फ्लॅट आहे, खूप सुंदर. शंकर विचारतो “तुला कसं माहित.” उमा सांगते, “सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना, तेव्हा पाहिलं. कचरा द्यायला बाहेर आला होता तो.” शंकर उमाला विचारतो, “मग तुला काही बोलला नाही का, ओळखलं का तुला ?” उमा म्हणते, “त्याने तुम्हालाही पाहिलं ना, तुम्हाला काही बोलला का ? शंकर म्हणतो, “ओळखलं नसेल त्याने आपल्याला, किती वर्षे झाली.” उमा म्हणते, ओळखलंय त्याने आपल्या दोघांना. सकाळी तर घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं विचार करा इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा, चार चाकी गाडीत फिरणारा साहेब, माझ्यासारख्या कचरा गोळा करणारीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमनला ओळख देणार आहे का तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही नका जाऊ.

त्याला ओळखही नका देऊ शंकरला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो, “खरं बोलतेस तू उमा. तो आपल्याला कायमचा विसरला आहे मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा. आपण जसे आहोत, तसे सुखी आहोत. उमा तिच्या कामाला जाते. थोड्या वेळानंतर ज्ञानेश्वर आणि प्रगती हे दोघे सिनेमा पाहून घरी येतात परंतु ज्ञानेश्वरच्या मनात अजूनही त्याच्या आई बाबाचाचं विचार सुरू असतो. सिनेमा पाहतानासुद्धा तो त्यांच्याच विचारात गुंग होऊन गेलेला असतो. जेवण झाल्यानंतर प्रगती झोपी जाते पण ज्ञानेश्वरच्या डोळ्याला डोळा लागत नाही. त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उमा पुन्हा एकदा ज्ञानेश्वरच्या घरी कचरा घ्यायला येते. तेव्हा प्रगती दरवाजा उघडते. प्रगतीला पाहून उमाला खूप आनंद होतो.

हे वाचा:   पगार कितीही कमी असुद्या, हे पाच नियम तुम्हांला बनवतील करोडपती पहा कोणते आहे हे नियम?

कचरा घेऊन झाल्यानंतर उमा ही प्रगतीला म्हणते, “कशी आहेस सुनबाई ?” हे ऐकून प्रगतीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, “मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय ?” उमा उत्तर देते, “चुकून तोंडात आलं गं पोरी माझी सून तुझ्यासारखीचं दिसते ना, म्हणून म्हणाले, माफ कर.” प्रगती म्हणते, “नाही नाही मावशी, माफी कशाला मागताय ? मला फक्त आश्चर्य वाटलं, म्हणून विचारलं. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का ? नाही तर चहा घेता का ?” उमा म्हणते, “नको गं पोरी, तू एवढ विचारलं तेचं खूप झालं. आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही. पण तू चहाचं विचारलंस, इतक्या मानाने विचारपूस केली, त्यातचं सगळं आलं. मी जाते आता”, असं म्हणून उमा तेथून निघून जाते प्रगतीला उमाचा स्वभाव खूप आवडतो. दुपारच्या वेळेस प्रगतीचं एक पार्सल गेटवर येतं.

तेव्हा शंकर फोन करून सांगतो, “प्रगती मॅडम येथे तुमचं पार्सल आलंय.” प्रगती म्हणते, “तुम्ही येथे पाचव्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकता का, प्लिज.” शंकर हो म्हणतो आणि प्रगतीला हे पार्सल आणून देतो. प्रगतीला पाहून शंकरला खूप आनंद होतो. त्याला समजतं हीच आपली सुनबाई आहे. प्रगती त्याला पाणी विचारते. शंकर नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो शंकर जागेवर येतो तर उमा तेथेचं उभी असते तेव्हा उमा त्याला सांगते, “अहो मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं.” शंकर म्हणतो “मीही आत्ताच पाहिलं. खूप सुंदर आहे,स्वभावनेही खूप चांगली आहे. मला पाणी विचारलं.” तर उमा म्हणते, “तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं मला तर तिने चहासुद्धा विचारला. पुढच्यावेळेस जेव्हा ती म्हणेल, तेव्हा मी चहा घेईल.

सुनबाईच्या हातची चव कशी आहे ती तरी कळेल. आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहिल्याचा आनंद, या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. दुपारी प्रगती विचार करते की ‘आता आपण नवीन घरात तर शिफ्ट झालोय, परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचं राहिलंय. सर्वात आधी ज्ञानेश्वरचं सामान लावून देऊ ती ज्ञानेश्वरची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सगळं सामान ठेवू लागते. तेवढ्यात ज्ञानेश्वरची एक फाईल खाली पडते आणि यातून सगळी कागदपत्र बाहेर येतात. ही कागदपत्र पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना प्रगतीला एक फोटो सापडतो. ज्ञानेश्वरच्या लहानपणीचा फोटो असतो. जेव्हा तो दहावीला संपूर्ण जिल्ह्यात 1 ला आला होता या फोटोवरून तिला समजतं, हा ज्ञानेश्वरचं आहे. या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना ज्ञानेश्वरचे आई-बाबा असतात.

ज्ञानेश्वरच्या आई-बाबांना पाहून प्रगतीला धक्का बसतो कारण आज ती पहिल्यांदाचं त्यांना पाहत होती. तिला समजतं की, ज्ञानेश्वरची आई तर आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते आणि ज्ञानेश्वरचे बाबा आपल्याचं बिल्डिंगमध्ये वॉचमन आहेत. प्रगतीने आज पहिल्यांदा ज्ञानेश्वरच्या आई बाबांना पाहिलेलं असतं. याआधी कधीही ज्ञानेश्वरने त्यांचा उल्लेख केलेला नसतो. त्यांच्याबद्दल प्रगतीला काहीही सांगितलेलं नसतं. परंतु आज तिला सत्य समजलं होतं. ज्ञानेश्वर आज इतका मोठा माणूस झालाय त्याच्याकडे करोडोची संपत्तीही आहे, तरीही त्याचे आई-बाबा असे का काम करताय ? या परिस्थितीत का आहेत ? असे अनेक प्रश्न प्रगतीला पडतात आणि ती या प्रश्नाचं उत्तर शोधून काढायचं ठरवते.

मी जर ज्ञानेश्वरला विचारलं, तर तो कधीही सत्य सांगणार नाही, उलट माझ्यावरचं चिडेल, हे प्रगतीला माहीत होतं. त्यामुळे आता त्याच्या आई-बाबांना सगळं सत्य विचारायचं असं ती ठरवते. ती लगेचचं बिल्डिंगच्या गेटवर येते. तेथे शंकर उभा असतो. शंकरला पाहून प्रगतीला खूप आनंद होतो आणि ती विचारते “बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे ?” शंकर सांगतो, “संपेल बेटा अर्ध्या तासात, का काय झालं, काही काम आहे का तुझ्या घरात ?” प्रगती विचार करते, ‘यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाही. कामाचं सांगूनच त्यांना घरी बोलावते.’

प्रगती म्हणते, “हो बाबा, घरी एक काम आहे चांगले पैसे देईल मी तुम्हाला आणि मला आणखीन एक बाईसुद्धा हवी आहे. तुमच्या ओळखीत कुणी आहे का ?” शंकर म्हणतो, “हो आहे ना, माझी बायको उमा. या बिल्डिंग मध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते. ती ही येईल.” प्रगती म्हणते, “ठीक आहे मग” तुमची ड्युटी संपली की या. तुम्हाला माझ घर तर माहीतच आहे ना.” शंकर म्हणतो, “हो माहित आहे, येऊ आम्ही दोघे.” प्रगतीला खूप आनंद होतो, ती लगेचच घरी येते. आपले सासू-सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे प्रगती खूप खुश असते ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ अन मिठाई मागवून घेते. इकडे शंकर उमाला बोलवतो. उमा विचारते, “काय झालं ?” तर शंकर तिला सांगतो, “अगं सुनबाईने आपल्याला घरी बोलावलंय.” उमा विचारते, “तिला आपल्या बद्दल काही समजलं तर नाही ना ?” शंकर म्हणतो, “नाही नाही, आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय.

तिच्या घरी काहीतरी काम आहे, पैसे देणार म्हणाली, चल आपण जाऊया. तेवढचं आपल्या मुलाचं आणि सुन बाईचं घर तरी पाहता येईल.” उमा म्हणते, “हो हो चला.” इकडे प्रगती विचार करते की “सासू-सासरे पहिल्यांदा घरी येताय, तर त्यांच्या समोर साडी नेसली पाहिजे” आणि ती साडी नेसून तयार होते. तेवढ्यात तिच्या दरवाजाची बेल वाजते. प्रगतीला खूप आनंद होतो. ती दरवाजा उघडते, तर शंकर आणि उमा आलेले असतात. प्रगती म्हणते, “या ना आतमध्ये. हे दोघे आतमध्ये येतात. तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं प्रगतीला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो, हेच आपले सासू-सासरे आहेत. ती म्हणते, “आई बाबा, या बसा ना.” तर शंकर म्हणतो, “नाही बेटा तू काहीतरी कामासाठी बोलावलंय ना, आधी ते काम करू.” .

प्रगती म्हणते, “ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते. आधी तुम्ही बसा प्रगती या दोघांना सोफ्यावर बसवते. हे दोघे सोफ्यावर बसतात. पहिल्यांदा ते इतक्या मोठ्या घरात, महागाच्या सोप्यावर बसलेले असतात. प्रगती किचनमध्ये जाते अन या दोघांसाठी पाणी घेऊन येते. हे दोघे पाणी पितात. तोपर्यंत प्रगती त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाष्ट्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर ठेवते. प्रगती म्हणते, “घ्या ना बाबा” घ्या ना आई.” उमा आणि शंकरला समजतचं नाही की, प्रगती असं का वागते. हे दोघे खूप लाजतात आणि काहीचं खात नाही. प्रगती म्हणते, “असं का करता तुमच्याचं मुलाचं घर आहे, घ्या ना.” हे ऐकून उमा आणि शंकरला जबर धक्काचं बसतो. हे दोघेही उभे राहतात आणि म्हणतात, “हे काय बोलतेस बेटा, आमच्या मुलाचं घर असं तर काही नाहीये. प्रगती म्हणते, “आई बाबा मला सगळं समजलंय. तुम्ही ज्ञानेश्वरचे आई वडील आहात ना. माझ्या नवऱ्याचे आई वडील. आज मला त्याच्या फाईल मध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटोमध्ये तुम्हीचं आहात.” असं म्हणून ती हा फोटो त्यांना दाखवते.

हे वाचा:   घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा ही एक वस्तू, Ignor करणारे मागे – पुढे करतील, Value एवढी वाढेल लोक…..!!

हा फोटो पाहून उमा आणि शंकर या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात उमा या फोटोला छातीशी कवटाळते -आणि म्हणते “पोरी खरं बोलतेस तू हा माझा मुलगा ज्ञानेश्वर होता. परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाहीये. तो आता खूप बदललाय.” प्रगती म्हणते, “आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचंय की, असं का झालं ? तुमचा मुलगा इतका हुशार, इतका शिकलेला इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामं का करताय आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही. असं काय घडलंय तुमच्यामध्ये शंकर आणि उमा एकमेकांकडे पाहतात. शंकर प्रगतीला म्हणतो, “जाऊ दे पोरी, कशाला जुन्या गोष्टी काढायच्या ? प्रगती म्हणते, नाही बाबा, मी ज्ञानेश्वरची बायको आहे, तुमची सून आहे मला सगळ्या गोष्टी समजल्याचं पाहिजेत उमा म्हणते, “ठीक आहे आम्ही सगळं सांगतो तुला.

ज्ञानेश्वर आमचा एकुलता एक मुलगा. आम्ही गावाकडे राहायचो खूप गरिबी होती घरामध्ये. झोपडीत राहायचो. दोन वेळचं खायला मिळवणंसुद्धा अवघड होतं. परंतु ज्ञानेश्वर जन्मतः हुशार. गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा आणि तो नेहमी मला खूप शिकायचंय अन मला मोठा माणूस व्हायचंय, असचं बोलत राहायचा. गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही त्याने दहावीपर्यंत तेथे शिक्षण घेतलं. खूप नावही कमावलं, दहावीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला आला होता आमचा ज्ञानेश्वर. हा जो फोटो आहे ना, तेव्हाचाचं आहे. आम्हाला खुपचं आनंद झाला होता. परंतु त्यानंतर ज्ञानेश्वर म्हणाला, त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं. त्याने आमच्या कडे पैसे मागितले. आम्ही त्याला म्हटलं, पोरा आमच्याकडे एवढे पैसे नाहीयेत. तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल नाही तर सोडावं लागेल. त्यामुळे ज्ञानेश्वर हा आमच्यावर खूप चिडला. तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात. तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाही. तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत.

म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला. तेथे त्याने स्वतःच्या हिमतीवरच शिक्षण पूर्ण केलं. मग आमच्यामध्ये दुरावा वाढतचं गेला. आधी महिन्यातून घरी येणारा ज्ञानेश्वर मग सहा महिन्यातून यायला लागला मग वर्षातून एकदा यायचा आणि मागील दहा वर्षांपासून तर त्याची आणि आमची भेटचं झाली नाही. त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले. कालचं आम्ही त्याला अनेक वर्षांनंतर पाहिलं. कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचं शिक्षण पूर्ण नाही करू शकलो, त्याच्यासाठी पैसा नाही कमवू शकलो म्हणून त्याचा आमच्यावर राग होता आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमन त्याचा बाप आहे, हे कोण मान्य करेल, तू सांग आम्हाला हे सत्य ऐकून प्रगतीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, “आई बाबा यात तुमची कोणतीही चूक नाहीये. चूक असेल तर ती ज्ञानेश्वरची आहे. ज्ञानेश्वर चुकीचा वागलाय.

तुम्ही तर तुमच्या परिस्थितीपुढे हतबल होतात. परंतु आता ज्ञानेश्वरची परिस्थिती सुधारली आहे, तर त्याने तुमच्यासाठी करायला हवं.” उमा म्हणते, “जाऊ दे गं पोरी. आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत. कष्ट करून दोन वेळचं खातोय. आम्हाला नकोय, हा ऐशो आराम, हा मोठा फ्लॅट. आज तू आम्हाला घरी बोलावलं, आम्हाला इतका मान दिला, त्यातचं आम्ही भरून पावलो.” प्रगती म्हणते, “नाही आई, मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहू देणार. ज्ञानेश्वर हा चुकतोय. त्याची तुमच्यासाठीही काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ती आता पार पाडलीचं पाहिजे. जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले, तरी तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत. त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं, तरी ते कधीही फिटणार नाहीत. आता तुम्ही याचं घरात राहायचं आणि कोणतंही काम करायचं नाही.

तुम्ही आयुष्य खूप कष्टात काढलं, परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचं.” उमा आणि शंकर म्हणतात, “नाही गं पोरी, असं नाही होऊ शकत.” प्रगती म्हणते, “आई बाबा तुम्हाला माहित नाहीये. मी किती हट्टी आहे. तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाची गळ घातलेली आणि त्याच्याशी लग्न केलं. माझ्या आई बाबाच्या विरोधात गेले होते मी. मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते, तसं करा.” उमा आणि शंकरला काय बोलावं, हे समजतचं नाही. प्रगती उमा आणि शंकर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते. नंतर ती या दोघांना चांगले चांगले कपडे देते. थोड्या वेळातचं ज्ञानेश्वर हा घरी येईल, हे प्रगतीला माहीत असतं.

त्यामुळे ती उमा आणि शंकरला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते आणि शंकरला पेपर वाचायला सांगते तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. प्रगती दरवाजा उघडते आणि ज्ञानेश्वरला म्हणते, “आई-बाबा आलेत.” ज्ञानेश्वरला वाटतं की, प्रगतीचे आई बाबा म्हणजे, त्याचे सासू-सासरे चालेत आणि तो पुढे येऊन म्हणतो, “कसे आहात आई बाबा ?” परंतु तेथे त्याच्याचं आई-बाबांना उमा आणि शंकरला पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनचं सरकते. काय बोलावं हे त्याला कळतचं नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो. उमा आणि शंकर दोघे खूप चाबरतात आणि म्हणतात बेटा तुला सांगितलं होतं ना, पहा किती चिडल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *