देवघरात असणाऱ्या या वस्तूंमुळे घरात आजारपण, वादवाद नवरा बायकोमध्ये भांडणे, संकटे, स्वतःचे घर न होने या सर्वांचा करावा लागतो सामना ….!!

अध्यात्म

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते. अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या मुर्त्या फोटोज आपल्या देवघरांमध्ये असतात. आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने देवीदेवतांचे पूजा करीत असतो. तसेच अनेक प्रकारचे उपवास व्रत करीत असतो. दररोज देवी देवतांची आरती देखील करीत असतो. परंतु मित्रांनो आपल्या देवघरांमध्ये अशा काही वस्तू आपण ठेवायच्या नाहीत. जेणेकरून त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. म्हणजेच मित्रांनो आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असणे, अनेक प्रकारची संकट, दुःख तसेच नवरा बायकोमध्ये भांडणे तसेच मुले आपले काहीही न ऐकणे असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात.

परंतु हे नेमके कशामुळे होते याकडे आपण जास्त लक्ष ही देत नाही. परंतु मित्रांनो आपल्या देवघरांमध्ये अशा काही वस्तू आपण ठेवत असतो या वस्तूंचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. तर देवघरांमध्ये अशा कोणत्या वस्तू आपण ठेवायच्या नाहीत त्याचीच सविस्तर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे.

तर मित्रांनो आपले देवघर हे नेहमी स्वच्छ असावे. आपण दररोज देवी देवतांना स्नान घालून त्यांची पूजा अवश्य करावी. तर या देवघरांमध्ये आपणाला मारुतीची मूर्ती अजिबात ठेवायची नाही. मारुतीची मूर्ती ही मंदिरात असते. परंतु आपण आपल्या देवघरांमध्ये मारुतीची मूर्ती ठेवून त्याची पूजा करणे योग्य मानले गेलेले आहे. कारण यामुळे मग आपणाला प्रत्येक कामांमध्ये यश प्राप्त होत नाही.

हे वाचा:   तुमच्याही घरामध्ये पुजेच्या दिव्यात फुल किंव्हा चंद्रकोर तयार होत असेल तर नक्की वाचा? काय असतात दैवी संकेत वाचून अंगावर काटा येईल …!!

तसेच अनेक अडचणी येत राहतात. तसेच म्हसोबा देखील आपल्या देवघरांमध्ये पुजायचा नाही. त्याचे विशिष्ट स्थान हे शेतामध्ये एका विशिष्ट जागी असते. त्यामुळे म्हसोबा देखील आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा नाही. तसेच एखाद्या देवी देवतांच्या दोन मूर्ती असता कामा नयेत. बरेच लोक हे कोणत्याही तीर्थयात्रेस किंवा यात्रेस गेल्यानंतर तिथून मूर्ती आणत असतात.

परंतु आपल्या देवघरांमध्ये देवी देवतांच्या दोन मुर्त्या असू नयेत. एकाच देवाच्या एक मूर्ती आणि फोटो चालतो. परंतु दोन्हीही मुर्त्या चालत नाहीत. म्हणजेच जर तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असेल आणि फोटो असेल तर चालतो. परंतु दोन्हीही गणपतीच्या मूर्ती असणे शुभ मानले जात नाही.

तसेच आपण देवपूजा करीत असताना ज्या देवघरामधील मूर्ती आहेत त्या समोर तोंड करून असाव्यात. त्या तिरक्या किंवा एकमेकांकडे पाहणाऱ्या नसाव्यात. कारण जर तुम्ही अशा मुर्त्या ठेवल्या म्हणजेच तिरक्या किंवा देव हे एकमेकांकडे पाहतात अशा प्रकारे जर तुम्ही देवपूजा करताना मूर्ती ठेवल्या तर आपणाला आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण राहत नाही. नकारात्मक ऊर्जा पसरते.

नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत राहतात. तसेच आपल्या देवघरांमध्ये शिवशंकरांची मूर्ती देखील असणे चुकीचे मानले गेलेले आहे. तुम्ही आपल्या देवघरांमध्ये पिंड ठेवू शकता. परंतु शंकरांची मूर्ती किंवा फोटो अजिबात ठेवायचा नाही. तसेच बरेच जण हे आपल्या मेलेल्या पितरांचा टाक वगैरे बनवून आणतात आणि तो देवघरांमध्ये पुजतात.

हे वाचा:   तुम्हीही घरामध्ये कुत्रा पाळत असाल तर नक्की बघा कुत्रा पाळण्याचे हे सात अद्भुत फायदे आपल्याला देतात भाग्य बदलण्याचे हे संकेत ….!!

परंतु मित्रांनो देवघरांमध्ये फक्त देवतांचे स्थान असते. आपल्या गुरुचे स्थान असते. त्यामुळे आपल्या पितरांचा टाक वगैरे आपण देवघरांमध्ये अजिबात ठेवायचा नाही.

आपण आपल्या देवघरांमध्ये भंग पावलेले मूर्ती देखील अजिबात ठेऊ नये. कारण मग यामुळे आपण जर कितीही मेहनत घेतली तरी पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि मिळालेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत राहतो. त्यामुळे भंग पावलेली मूर्ती आपण देवघरांमध्ये अजिबात ठेवायची नाही.

तसेच आपल्या देवघरामधील प्रत्येक मूर्ती ही अंगठ्यापेक्षा जास्त उंचीची नसावी. म्हणजेच साडेतीन इंच पेक्षा मोठी मूर्ती अजिबात नसावी. कारण याचा देखील नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या वस्तू तुम्ही देखील आपल्या देवघरांमध्ये अजिबात ठेवू नका. कारण यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो. तर आपल्या घरामध्ये आजारपण, संकटे, दुःख, नवरा बायकोमध्ये भांडणे होत राहतात. त्यामुळे आपले घर हे अप्रसन्नतेचे होते आणि घरातील प्रत्येक व्यक्ती हा मग निराशामध्ये जीवन जगायला लागतो. तर या विशेष गोष्टींची तुम्ही अवश्य काळजी घ्यायची आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *