हे काम केल्याने मनुष्याला मिळतो कुत्र्याचा जन्म? एकदा नक्की बघा कोणती आहेत ही कामे …!! श्री स्वामी समर्थ

अध्यात्म

मित्रांनो, जन्म आहे म्हणजे मृत्य ही आहे. मृत्य आहे म्हणजे पुन्हा जन्म ही आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार पुढील जन्म कशाचा मिळेल हे ठरते ते आज आपण पहाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप-पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते. पुढील जन्म तो कोणत्या रुपात घेणार हे ही त्यानुसारच निश्चित होते. गरुड पुराणानुसार विविध प्रकारचे पाप करणारे लोक नरकात जातात. नरकात त्यांनी केलेल्या पापांचा दोष कमी होतो. परंतु इतर पापांची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पशु-पक्ष्यांच्या रुपात जन्म घ्यावा लागतो.

मित्रांनो, आज आपण कोणते कर्म केल्याने मनुष्याला कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो. यासाठी आपण एक कथा पाहणार आहे. एकदा श्री राम आपल्या दरबारात बसलेले होते तेव्हा त्यांच्या दारावर एक कुत्रा येऊन रडू लागला. आणि त्यावेळी दूतांनी त्या कुऱ्याला हाकलावून लावले दुसऱ्या दिवशी परत दारावर येऊन कुत्रा रडू लागला तेव्हा दूतांनी परत त्याला हाकलावून लावले. तिसऱ्या दिवशी परत तो कुत्रा दारावर येऊन रडू लागला तेव्हा श्री रामाणी आपल्या दूतांना कुत्र्याला बोलावून आणायला सांगितले.

हे वाचा:   चिमूटभर मिठाचा उपाय गरिबी कायमची नष्ट करतो… कधीही फेल न झालेला उपाय …!!

त्यानंतर दूत कुत्र्याकडे गेला व कुत्र्याला म्हणाला तुला प्रभूंनी आत बोलावलं आहे कुत्र्याने सांगितले माझ ज न्म नीच यो-नीत झाला आहे म्हणून तुम्ही भगवंताला सांगा की त्यांनी स्वतः येऊन मला भेटावे. आणि दूतांनी आत जाऊन श्री रामाला संगीतले दूतांचे बोलणे ऐकून श्री राम कुत्र्या कडे आले व त्याला रडण्याचे कारण विचारले.

कुत्र्यांनी उत्तर दिल मी काहीही न करता त्या संन्याशानी मला दगड फेकून मारला व माझा पाय मोडला. आता तुम्ही न्याय करा. तेव्हा भगवंतांनी संन्याशाला बोलवले व कुत्र्याला मा-रण्याचे कारण विचारले तेव्हा संन्याशानी उत्तर दिले. दुपारची वेळ होती आणि मी भिक्षा ग्रहन करणार होतो तर माझ्या भिक्षेला या कुत्र्यांनी स्पर्श केला म्हणून मी रागाने त्या कुत्र्याला दगड भिरकावला व त्याचा पाय मोडला. त्यात माझी काय चूक आहे.

तेव्हा भगवंत म्हणाले तो अज्ञानी आहे. पण तुम्ही तर ज्ञानी आहात. त्या कुत्र्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात म्हणून तुम्हाला शिक्षाही कुत्राच देईल. तेव्हा कुत्र्यांनी सांगितले या संन्याशाला एखाद्या शिव मंदिराचा महंत करा. तेव्हा भगवतांनी त्या संन्याशाला वाजत गाजत एका शिव मंदिरात नेऊन त्याला तेथील महंत पद दिले. तेव्हा संन्याशाला वाटले मला किती छान शिक्षा मिळाली.

हे वाचा:   जेजुरीला साक्षात खंडोबांनी भरली माझी ओटी भरली, स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते खंडोबा भेटतील अनुभव सांगताना आज या ताईला रडूच आवरत नव्हते ....!!

तेव्हा भगवंताच्या दूतांनी कुत्र्याला विचारले तू अशी काय शिक्षा त्या संन्याशाला दिली आहेस. त्यावेळी कुत्र्यांनी सांगितले शिव्याशाप करणारे, अन्याय करणारे, इतरांचे धन लुबाडनारे, वाईट कार्य करून अधिक धन जोडणारे हे सर्व पुढील जन्मात कुत्र्याच्या रुपात जन्म घेतात. मी ही या जन्मी म्हणूनच कुत्रा झालो आहे. की मागच्या जन्मी मी एका मठाचा महंत होतो मी त्या संन्याशाला त्याच्या कर्माचे फळ मिळावे म्हणूनच हे पद दिले आहे. नंतर त्या संन्याशानी शिव मंदिरात महंत पदावर बसून जी काही पाप कर्मे केली त्या कर्मामुळे त्याला पुढील जन्म कुत्र्याचा मिळाला.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *