मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये आपणाला अनेक लोकांचे वजन हे वाढलेले दिसत आहे आणि वजन वाढल्यामुळे आपल्या शरीराची हालचाल देखील कमी होते आणि मग आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांचा सामना देखील करावा लागतो. तसेच वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे औषधोपचार घेतो. तसेच अनेक प्रकारचे घरगुती उपाय देखील करीत असतो तसेच आयुर्वेदिक उपाय देखील करीत असतो. परंतु या उपायांचा काहीच आपल्याला फरक पडत नाही. त्यामुळे आपण खूपच निराश होतो आणि आपणाला चार चौघांमध्ये जाणेदेखील खूपच लाजल्यासारखे होते.
तर मित्रांनो आज मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये काय खायचे आहे आणि काय खायचे नाही याबद्दल सांगणार आहे. म्हणजेच अशाप्रकारे तुम्ही जर आहार केला तर यामुळे तुमचे पंधरा दिवसांमध्ये नक्कीच दहा किलो वजन हे कमी होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपण नेमक्या आपल्या आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा वापर करायचा आहे आणि कोणत्या पदार्थांचा वापर करायचा नाही.
तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अगोदर तीन किलोमीटर पळायचे आहे किंवा चार ते पाच किलोमीटर चालायचे आहे. नंतर चालून आल्यानंतर आपणाला घरामध्ये कोमट पाणी एक ग्लास करायचे आहे आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये एक चमचा मध घालायचा आहे आणि हे कोमट पाणी आपण दररोज प्यायचे आहे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
तसेच मित्रांनो जर तुम्ही ग्रीन टी जरी पिला तरीही चालते. म्हणजेच तुम्ही त्या ग्रीन टी मध्ये साखर अजिबात वापरायची नाही. एक कप ग्रीन टी देखील तुम्ही पिऊ शकता. तसेच तुम्ही सकाळचा नाश्ता वगैरे पूर्णपणे बंद करायचा आहे आणि आपल्या आहारामध्ये भात आपण अजिबात खायचा नाही.
म्हणजेच तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोनच वेळा जेवायचे आहे. नाश्ता वगैरे तुम्ही अजिबात करायचे नाही किंवा दिवसभरात दुसरे कोणतेही पदार्थ देखील खायचे नाहीत. म्हणजेच तुम्ही दोन वेळेचे जेवण करता त्या जेवणामध्ये तुम्हाला सहा ते सात तास गॅप ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास अगोदर जेवण करायचे आहे आणि सकाळी देखील तुम्ही नाश्ता न करता तुम्ही सकाळचे जेवण करायचे आहे. असे दोनच वेळा तुम्ही जेवण करायचे आहे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना चहाची देखील खूपच सवय आहे. त्यामुळे तुम्ही वजन जर कमी करायचे असेल तर चहा पूर्णपणे बंद करायचा आहे. कारण चहाने देखील वजन वाढण्यास मदत होते. तसेच मित्रांनो तुम्ही रात्रीचे ज्यावेळेस जेवण करता त्यावेळेस तुम्ही जेवणाआधी मोड आलेले हिरवे मूग किंवा हरभरे मोड आलेले तुम्ही कुकरमध्ये एक शिट्टी देऊन ते सेवन करायचे आहे.
जर तुम्हाला मूग आणि हरभरे खायचे नसतील तर तुम्ही एक वाटी कोबी बारीक करून घ्यायच आहे आणि त्यामध्ये तुम्ही एक टोमॅटो घालायचा आहे आणि चवीपुरते मीठ घालून ते देखील तुम्ही खाऊ शकता. दररोज तुम्ही जेवण्याआधी जर हे सेवन केले तरी देखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
तसेच मित्रांनो तुम्ही हॉटेलचे जे जेवण आहे हे देखील जेवण अजिबात जेवायचे नाही. तसेच आपल्या जेवणामध्ये तुम्ही मैदा किंवा पांढरे पदार्थ किंवा गोड पदार्थ यांचा समावेश अजिबात करायचा नाही आणि भात पूर्णपणे बंद करायचा आहे. तसेच तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता किंवा बाजरीची भाकरी देखील खाऊ शकता आणि आपल्या आहारामध्ये तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये ताकाचा समावेश करायचा आहे. यामुळे देखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जर आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश केला तर यामुळे तुमचे नक्कीच वजन कमी झालेले तुम्हाला जाणवेल.