वेळ अमावस्या पुणे लातूर हायवे वरील हा एक सत्य स्वामी अनुभव वाचून तुमच्या पण अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही असा थरारक अनुभव ….!!

अध्यात्म

मित्रांनो आज आपण एका ताईंचा अनुभव पाहणार आहोत आणि मित्रांनो हा अनुभव जिल्हा उस्मानाबाद येथून पाठवला आहे अनुभव ताई व त्यांचे मिस्टर या दोघांचेही शिक्षण एमएबीएड झाले आहे परंतु कधीतरी आयुष्यात असे अनुभव येतातच जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवावाच लागतो आणि हा माझ्या नवऱ्याला व मला प्रवास करत असताना आलेला सत्य अनुभव आहे ही घटना आहे 3 जानेवारी 2022 त्या दिवशी माझ्या माहेरी म्हणजे बार्शी येथे माझ्या काका काकूंच्या लग्नाची पंचविसावी एनिवर्सरी होती म्हणून मी आणि आमचे हे तीन जानेवारीला बार्शीला गेलो कार्यक्रम छत्रपती भवन लातूर रोड बार्शी येथे होता रात्री कार्यक्रम संपायला दहा वाजले आम्ही तिकडे खूप मजा केली सगळे कुटुंब खूप महिन्यांनी एकत्र आले होते.

आणि त्यामुळे खूप धमाल केली शेवटी तर आम्ही ग्रुप डान्स पण केला खूप म्हणजे खूप छान वाटत होतं कार्यक्रम ठीक दहा वाजता संपला खूप उशीर झाला होता कार्यक्रम ठीक दहा वाजता संपला भरपूर उशीर झाला होता त्यामुळे आम्हाला सगळ्यांनी रात्रीची वस्ती करण्यासाठी आग्रह केला इतक्या रात्री बाईकवरून प्रवास करून कसं जाणार असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यातल्या त्यात मी लहानपणापासून सगळ्यांच्या लाडाची माझे सासरला त्यामुळे पाठवताना नेहमीच सगळ्यांचे जीव जड होत असे माझ्या दोन बहिणी तिथे बार्शीतच राहायला एक जॉब साठी राहते तर दुसरीचा सासरच बार्शी आहे त्यामानाने लांब म्हटलं तर मग मीच म्हणून यानिमित्ताने का होईना लेक एक रात्र जवळ राहील या उद्देशाने सगळी जण आम्हाला थांबवत होती अखेरीस यांनी होकार दिला.

आणि आम्ही त्या रात्री तिथे राहायचं नक्की झालं आता मी राहते असं म्हटल्यावर माझे आई-वडील लवकर घरी गेले कारण कार्यक्रम हॉलवर होता आई आणि बाबा घरी पोहोचल्यावर थोड्यावेळाने त्यांनी फोन केला आणि घरी या लवकर खूप रात्र करू नका असं सांगितलं मी हो म्हणून फोन ठेवला कार्यक्रमामुळे गायीची धार काढायची राहिली होती आता राहिलोच आहोत तर आपणच जाऊन काढू असा विचार केला प्रवास एक दीड तासाचा तर आहे शिवाय लातूर पुणे हायवे वरच आपलं गाव आहे रस्ता दिवस रात्र सुरूच असतो त्यामुळे भीती वाटली नाही तरीपण रात्रीच्या वेळेचा प्रवास आणि छोटासा घाट यामुळे मी सगळे दागिने काढून छोट्या बहिणीकडे दिले मग सगळ्यांचा निरोप घेतला फोन सायलेंट वर केला.

कारण आम्ही टू व्हीलर वर जाणार होतो फोनवर बोलता आलं नसतं आमची एक सवय प्रवास जवळचा असू दे किंवा लांबचा नेहमी प्रवास करताना मनोमनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांचं नाव घेऊन दिगंबरा आमच्या सोबत राहा अशी प्रार्थना करायची आम्हाला सवय आहे कारण आम्ही मनापासून दत्तगुरूंची खूप भक्ती करतो आजही तसंच गुरुराया सोबत राहा असं म्हणून मी गाडीवर बसले प्रवास सुरू झाला रात्रीची वेळ आहे गाडीत जास्तीच पेट्रोल असावं म्हणून आम्ही बार्शी पासून पाच ते सहा किलोमीटरवर जामगाव म्हणून एक गाव आहे तिथे बायपासच्या पुढे एका पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं गाडीवर बऱ्यापैकी गारवा झोंबत होता म्हणून यावेळी मी टू साईड बसले खरंतर मला तसं बसता येत नव्हतं कारण मी माझ्या लग्नातला शालू नेसले होते हात भरून बांगड्या घातल्या होत्या.

हे वाचा:   आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामीं समर्थ महाराज आपल्याला देतात हे 10 संकेत …..!!

आणि गाडीवर झोपणारा गारवा आणि त्यात लहानपणापासून अंधाराची भीती म्हणून मी कशीतरी तू साईड बसले मधून मधून एखादी तुरळ गाडी आम्हाला पास करून पुढे जात होती नंतर नंतर तर बऱ्याच वेळाने एखादी गाडी दिसायची रोजच्यापेक्षा आज रस्ता जरा सामसूम वाटत होता रात्रीच्या वेळी गाडी चालवताना हेडलाईटच्या उजेडावर बारकी बारकी पाखर उडतात आणि तीच नाका तोंडात जातात त्यामुळे आमचे हे काहीही बोलत नव्हते शांततेत प्रवास सुरू होता आणि त्यात नेमकी त्या दिवशी वेळ अमावस्या त्यामुळे अंधार नेहमीपेक्षा जरा जास्तच वाटत होता पुढे रस्त्यावर मुसलम हे गाव आलं तिथे वाटेवर दत्त मंदिर आहे मी देवाला हात जोडले आणि म्हणाले देवा आम्हाला सुखरूप घरी सोडव पुन्हा पदर सावरून आम्ही प्रवास सुरू केला.

आणि थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं गाडीवर आधीपेक्षा जास्त जडपणा आलाय जणू माझ्या पाठी कोणीतरी बसले थोडी का होईना मनात भीती दाटून आली मागे वळून पाहण्याची हिंमत होईना कारण माझ्या मागे कोणीतरी आहे याची खूप स्पष्ट आणि ठळक जाणीव होत होती आता मात्र माझ्या सिक्स सेन सतत मला या गोष्टीची जाणीव करून देऊ लागला मी मनोमन दगडू महाराजांचा धावा करू लागले जप चालू असताना या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी हे गाडी कशी चालवतात हे पाहण्यात मन गुंतवू लागले हे गाडी अगदी रस्त्याच्या मधोमध चालवत होते अगदी डिव्हायडरची पांढरी पट्टी असते ना त्यावरून पांगरी पास झाली आणि हवेतील गारवा जरा जास्तच वाढला म्हणून मी माझे दोन्ही हात यांच्या स्वेटरच्या खिशाच्या आत ठेवले त्यामुळे मला जरा बरं वाटलं आणि मनावरचा ताणही थोडासा हलका झाला.

आणि थोड्याच वेळात घाट सुरू झाला तसा हवेतील गारवा खूप वाढला आता तर मी मनातल्या मनात मोठमोठ्याने दत्तगुरूंचा नाव घेत होते यांच्या तोंडावर येणारा गारवा आणि पाखरं यामुळे यांनी जरा वेळ गाडी बाजूला लावून तोंडाला रुमाल बांधू का असं विचारलं तर मी लगेच त्यांचे खांदेबाबत त्यांचे खांदेबाबत हीच जागा मिळाली का इथे घाटात गाडी थांबवू नका असं म्हणाले घाट संपला आणि येडशी या गावाच्या लाईट दिसू लागल्या घाटाच्या वर एक म्हसोबाचं मंदिर आहे तिथं हात जोडण्यासाठी मी मान वर केली आणि तेव्हा नजरेला एक व्यक्ती दिसली इतक्या रात्री या ठिकाणी कोण असेल म्हणून मी जरा लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला आणि क्षणात माझ्या अंगावर काटा आला अंग अंगातून वाहणारे रक्त स्पष्टपणे जाणवू लागलं आपल्याकडून काहीतरी खूप मोठा अनर्थ घडल्यावर एक क्षणासाठी जसं आपल्या शरीर थंड पडतं तसं माझं शरीर थंड पडलं होतं.

कारण जे डोळ्यासमोर पाहते ते नक्कीच माणूस नव्हतं हे समजलं त्याची उंची दहा ते बारा फूट असेल एखादं अकरावी करा झाड उभा असावा असं ते दिसत होतं अंगावर सफेद रंगाची सफारी ड्रेस होता आणि चेहरा चेहरा खूप विद्रो तोंडाची शकलं झाली होती त्याच्या डोक्याचा अर्धा भाग सोललेला होता आणि ती चामडी त्याच्या राहिलेल्या चेहऱ्यावर लोम्बत होती जणू एखादी व्यक्ती भीषण अपघातात मेलेली असावी त्याचे हात गुडघ्याच्या खाली लांब आणि हाताची बोट त्यापेक्षाही लांब सडक त्याच्याकडे पाहताना मी इतकी स्तब्ध झाले की मी किती वेळ त्याच्याकडे एकटक पाहते मलाही समजेना आणि तो माझ्याकडे व गाडी त्याच्यापासून हाकेच्या अंतरावर आली तेव्हा मी भानावर आले आणि घट्ट डोळे बंद केले.

हे वाचा:   देवपूजा करताना तुमच्या सोबत पण असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहे? श्री स्वामी समर्थ ....!!

आणि त्याचवेळी मला पुन्हा एकदा गाडीवर असलेल्या दबावाची जाणीव झाली मी मनातच स्वामींना अशी हाक मारली दुसऱ्या क्षणाला माझे डोळे उघडले तेव्हाही नजर तिथेच गेली त्यावेळी ती व्यक्ती त्याचा हात पसरून आमची गाडी पाडण्याचा प्रयत्न करणार होता त्याने कोपऱ्यातून हात उचलला पण अचानक जणू त्याला कोणीतरी बांधून ठेवले असा तो जागेवर तडफडू लागला त्याला जागेवर हालचाल करणे शक्य होईल आणि त्याचवेळी मला माझ्याबरोबर गाडीवर जाणवणारा भार कमी वाटला त्याच्यापासून पाऊलभर पाठीमागे एक साधू महाराज दिसले का वेळ एकटी दिसणारी व्यक्ती आणि अचानक भगवी शाल पांघरून हातात एखादी किटली आणि जटाधारी असलेले हे महाराज कुठून आले काहीच कळालं नाही त्यांचा चेहरा इतका तेजपुंज होता का मी शब्दात सांगू शकत नाही.

आणि आमची गाडी भर द वेगात पुढे गेली मी काय पाहते मलाच कळालं नाही आणि यांनी ही गाडी इतक्या जोरात पुढे घेतली जणू मी काय पाहते हे यांनाही कळालं असावं इतक्यात यांनी मला विचारलं शुभे काय दिसलं का मी पुन्हा एकदा खांदे दाबत काही बोलू नका असं खूनवलं आणि आम्ही दोघांनीही थोडं अंतर पुढे गेल्यावर फ्रंट मिरर मधून काही दिसतय का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण काचेत आम्हाला फक्त मोठा प्रकाश दिसला जसं काय एखादी फोर व्हीलर आमच्या पाठीमागून येत असावी विशेष याचा वाटलं इतका वेळ एकही गाडी आम्हाला दिसली नाही मग मध्येच ही फोरविलर कुठून आली ती फोर व्हीलर गाडी आम्हाला पास करून पुढे गेली.

आणि गाडी आमच्या पुढे येतात आमच्या बाईकच्या हेडलाईटच्या प्रकाश तिच्यावर पडला तर ती गाडी के ए 32 या क्रमांकाची दिसली आणि त्या गाडीच्या मागच्या काचेवर एकमुखी दत्तगुरूंचा फोटो लावला होता आणि वर लिहिलेलं होतं दत्त माझा मी दत्ताचा आम्ही त्या गाडीला लगेच हॉर्न दिला पण ती गाडी पण ती गाडी फार वेगाने पुढे निघून गेली आम्ही येडशी मध्ये आल्यावर मला हे म्हणाले का तुला मी म्हणाले तुम्ही पण तेच पाहिलं का तो राक्षसासारखा माणूस आणि साधू महाराज म्हणजे इतका वेळ मला गाडीवर जाणवणारी तिसरी शक्ती साक्षात दत्त माऊली होती जी आपल्या पाठीशी आपलं रक्षण करायला आली आणि आता गेलेली गाडी कर्नाटक म्हणजे गाणगापूरची आपल्या पुण्याचं फळ महाराजांनी सादूरूपात आपले रक्षण तर केलेच पण आपल्या भक्तीचा प्रसाद आपल्याला दर्शनही दिले तिथून पुढे अर्ध्या तासाचा प्रवास आम्ही अक्षरशः डोळ्यात पाणी आणून नामस्मरण करत गेला खरंच दत्तगुरूंचा महिमा खूप आहे ते होते म्हणून आज आम्ही आहोत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *