मित्रांनो, अलीकडच्या काळात सर्वच लोकांना अगदी शाळेतील लहान मुलांपासून मोठया व्यक्तींपर्यंत महिला असो, अगर पुरुष सर्वांनाच केसांचा प्रॉब्लेम सुरू आहे. कुणाचे केस गळतात, कुणाचे केस अकाली पिकतात, कुणाला टक्कल पडायला सुरू होते, केसांची वाढ होत नाही, केसात कोंडा होणे इत्यादी अनेक समस्यांनी लोक त्रासलेले आहेत. केमिकलयुक्त शाम्पू आणि तेलाचा वापर केल्याने या समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. पुरुष असो वा महिला सर्वांनाच आपले केस दाट, काळेभोर, सुंदर असावेत असं वाटतं.
मित्रांनो सर्वच महिलांना आपले केस लांबसडक, सिल्की, मुलायम, काळेभोर असावेत असं वाटतं. ज्या स्त्रियांचे केस काळेभोर, लांबसडक आहेत. त्या कोणत्याही समारंभात किंवा कुठेही गेल्या तरी त्यांच्या केसांच्यामुळे आकर्षणाचा बिंदू ठरतात. चला तर पाहूया आपण एक घरगुती सोपा उपाय ज्यामुळे आपले केस लांबसडक होतील.
मित्रांनो, पूर्वीच्या काळी सर्व वयोगटातील पुरुष व महिला डोक्याला रोज तेल लावत होते. शिकेकाई आणि रिठा अशा आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करून केस धुतले जात होते. पूर्वीच्या काळी लोक तेलाने नियमित केसांना मसाज करत होते. केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, आयुर्वेदिक गोष्टींचा, वनस्पतींचा उपयोग करत होते.
मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोक हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, घरात पिकलेले तांदूळ, ज्वारी, गहू यांचा उपयोग जेवणात करत होते. त्यामुळे या लोकांना अकाली केस पिकणे गळणे दुभागणे टक्कल पडणे या गोष्टी माहितच नव्हत्या. पूर्वीच्या लोकांचे आरोग्य खूप चांगले होते.
परंतु केसांच्या समस्या साठी कित्तेक लोक दवाखान्यात भरपूर पैसा खर्च करून केसांवर ट्रीटमेंट घेतात. काहींना फायदा होतो. पण काहीना अशा गोष्टींचा काहीच फायदा होत नाही. मित्रांनो यासाठी आज आम्ही तुम्हाला एक घरगुती सोपा उपाय सांगणार आहोत यामुळे तुमचे केस लांबसडक आणि काळेभोर, मुलायम होतील. चला तर पाहूया काय आहे तो उपाय.
मित्रांनो, यासाठी आपल्याला लागणार आहे.चहा पावडर, एरंडेल तेल आणि मेथी दाणे म्हणजेच मेथ्या. या उपाय साठी आपल्याला दोन चमचे खोबरेल तेल आणि दोन चमचे एरंडेल तेल लागणार आहे. खोबरेल तेल बऱ्याच जणांची केस कोरडे रुक्ष आणि कमकुवत असतात. अशा केसांसाठी खोबरेल तेलाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. एरंडेल तेलात विटामिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते यामुळे केस मजबूत होतात आणि केस लांबसडक आणि भरभरून वाढण्यास मदत होते.
मित्रांनो यासाठी आपल्याला लागणार आहेत मेथी दाणे. अर्धा ते पाऊन चमचाभर मेथीदाणे पावडर. मेथीदाणे मध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. केसांची मुळं घट्ट करण्याची ताकद केस मुलायम सिल्की करण्याची जादू या मेथी दाण्यामध्ये असते.
मित्रांनो एका भांड्यात एक कप पाणी घाला. त्यात मेथी दाणे एक चमचा पावडर घाला. तसेच एक चमचा चहा पावडर घाला. हे मिश्रण सहा ते सात मिनिटं उकळू द्यात किंवा पाण्याचा रंग बदलेपर्यंत उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घ्या. त्यानंतर यात एक चमचाभर एरंडेल तेल घाला. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. मग केसांना लावा जास्त प्रमाणातही आपण बनवून एका हवाबंद बाटलीत भरून ठेवू शकतो.
मित्रांनो हे तयार झालेले हेअर टॉनिक आंघोळीपूर्वी एक ते दोन तास आधी केसांच्या मुलांना लावा. केसाच्या शेंड्यापर्यंत हेअर टॉनिक लावून द्या. एक ते दोन तास तसंच ठेवा आणि त्यानंतर आयुर्वेदीक शाम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.
मित्रांनो, घरीच तयार झालेले हे हेअर टॉनिक वापरल्याने तुमच्या केसांची गळती थांबेल. पांढरे केस काळे होतील. केसातील कोंडा असेल तर निघून जाईल. हे तेल आठवड्यातून तीन वेळेस लावा आणि आयुर्वेदिक शाम्पूने केस धुवा. या हेअर टॉनिकचा तुम्हाला नक्की फायदा होईल. केसांना खोलवर पोषण मिळाल्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात. मसाज केल्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण चांगल होते. यामुळे केस घनदाट, जाड, काळेशार आणि सुंदर होण्यास मदत मिळते. परंतु एक लक्षात ठेवा कि, केस धुण्यासाठी कधीही खूप गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवावेत.
मित्रांनो हा घरी करता येणारा सहज सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा. यामुळे तुमच्या केसांना कोणतीही इजा पोहोचणार नाही. केसांचे कोणतेही नुकसान होणार नाही. हा उपाय तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर सांगा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.