९९ % लोकांना माहित नाही पपई खाण्याचे हे औषधी गुणधर्म कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाहीत असे जबरदस्त फायदे ……!!

आरोग्य

मित्रांनो फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याप्रमाणे पपई खाणेही आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे कच्चा आणि पिकलेला पपई खाणे केव्हाही चांगलेच असते. पण कच्चा पपई खाणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता.

मधुमेह – कच्चा पपईमध्ये असलेली जीवनसत्वे आपल्याला अनेक रोगांपासून संरक्षण देतात. कच्च्या पपईचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील इंस्युलीनचे प्रमाण वाढविण्याचे काम कच्ची पपई करीत असते. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कर्करोग – कच्च्या पपईचे सेवन नियमित करणाऱ्यांना कोलन किंवा प्रोस्टेटचे कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. कच्ची पपई वजन घटविण्याच्या मदत करते. ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी दररोज जेवणासोबत कच्च्या पपईचे सेवन करावे. त्यामुळे शरीरामध्ये साठलेल्या अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. कच्च्या पपईचे सेवन करण्यासाठी कच्ची पपई किसून घेऊन तो कीस दह्यामध्ये घालून खाल्ला जाऊ शकतो. कच्च्या पपईचे सेवन सॅलडसोबतही केले जाऊ शकते.

हे वाचा:   दह्यात फक्त दोन चमचे हा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि बघा तुमचे वय ४० असो की ५० नेहमीच तरुण दिसाल जबरदस्त घरगुती उपाय !

युरीन इन्फेक्शन- युरीन इन्फेक्शनची समस्या असेल, तर त्यासाठी कच्ची पपई लाभदायक आहे. कच्च्या पपईने इन्फेक्शन रोखले जाऊन ते निर्माण करणाऱ्या बॅक्टेरीयांनाही आळा बसतो.

सांधेदुखीपासून आराम मिळतो – पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात. जर सांधेदुखी सतावत असेल तर ती कमी करण्यासाठी कच्ची पपई लाभकारी आहे.

लिव्हर – कच्च्या पपईच्या सेवनाने लिव्हर देखील निरोगी राहते.

आईचे दूध वाढविण्यासाठी – तसेच ज्या महिला आपल्या नवजात अर्भकांना स्तनपान करवीत असतील, त्यांच्यासाठी देखील पपई खाणे चांगले असते. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे मिळतात. आईचे दूध वाढविण्यासाठी पपई खूप उपयोगी ठरते.

मासिक पाळी – मासिक पाळीचा त्रास कमी होतो. अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.

हे वाचा:   कानाच्या सर्व समस्या गायब कानातील मळ बिना औषधा शिवाय फक्त एक मिनिटात बाहेर फेका तसेच ऐकण्याची शक्ति दोन पटीने वाढवणारा साधा सोपा घरगुती उपाय ..!!

थकवा – ताण-तणाव कमी होतो. दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते – आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.

सूर्य किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या, थकावट, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे., सांधेदुखी, मांसपेशीनमध्ये वेदना, सफेद केस, कमी दिसणे इत्यादी दुष्प्रभाव आढळून येतात. पपई मध्ये उपलब्ध असलेले एन्टीऑक्सिडेंट या हानिकारक सूर्य किरणांच्या नुकसाना पासून वाचवते.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *