टिटवी पक्षी आणि पारस दगड हि कथा वाचणारा कधीच गरीब राहत नाही…..!!

ट्रेंडिंग

मित्रांनो, आजची कथा आहे, ती एका टिटवी पक्षाची कथा आहे. तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल, की टिटवीच्या अंड्यांपासून पारस दगडाची प्राप्ती होत असते. जो दगड लोखंडाला सोना बनवू शकतो, अशा कथा आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात. ज्या ग्रंथांमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेले आहे, की टिटवीच्या अंड्यांमध्ये पारस दगड असतो. परंतु तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का, की या पारस दगडाची प्राप्ती टिटवी पक्षाला कशाप्रकारे झाली? यामागे एक खूपच प्राचीन अशी कथा आहे. ही कथा आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

पुरातन काळातील गोष्ट आहे.. श्रावण महिना सुरू होणार होता आणि टिटवी पक्षाचा जोडा एका जंगलामध्ये एका झाडावर बसलेला होता. त्याच जंगलामध्ये मादा टिटवी दोन अंडी घालते . परंतु टिटवी पक्षाचा जोडा आता खूपच काळजीत राहू लागला होता. कारण, अंडी देऊन खूप दिवस झाले होते,परंतु त्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर आली नव्हती.. दोघेही नवरा बायको अशा लावून बसले होते, की जेव्हा अंडी फुटतील तेव्हा त्याच्यातून दोन छोटे छोटे पिल्लं बाहेर येतील आणि त्यांचे जीवन आनंदानेभरून जाईल. दोघे नवरा बायको त्यांच्या मुलांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत होते. परंतु खूप दिवस होऊनही त्यांचे अंडे अजूनही फुटत नव्हते.

शेवटी श्रावण महिना सुरु होतो आणि दोघेही नवरा बायको खूपच काळजीत येतात. तेव्हा टिटवी टिटव्याला म्हणते, अहो श्रावण महिना सुरू होणार आहे. परंतु, अजूनही आपली अंडी फुटण्याचं नाव घेत नाहीत. जर वेळेवर अंडी फुटली असती तर आपली मुलं इतक्याला मोठी झाली असती. ह्या अंड्यांना फोडण्यासाठी असा कोणता उपाय केला जाऊ शकतो, की ज्यामुळे अंडी लवकरच फुटतील आणि आपली छोटी छोटी पिल्लं बाहेर येतील. तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो, प्रिये या गोष्टीचा उपाय तर माझ्याकडे सुद्धा नाही. दोघे नवरा बायको सारखे चोचीने त्या अंड्यांवर टोची मारत असतात. परंतु तरीसुद्धा ती अंडी फुटत नाहीत.

त्याच वेळेला नारद मुनी तिथून जात होते. जात असताना नारद मुनींचे लक्ष टिटवीच्या अंड्यांकडे जातं आणि टिटवीच्या जोड्याकडे जातं. तेव्हा नारद मुनी तिथे थांबतात आणि टिटवी आणि टिटव्याला त्यांच्याजवळ बोलवतात जेव्हा टिटवी आणि टिटवा नारद मुनींजवळ जातात तेव्हा ते सर्वप्रथम नारद मुनींना प्रणाम करतात आणि प्रणाम करून त्यांची व्यथा नारद मुनींना सांगू लागतात. नारद मुनींना ते म्हणू लागतात, हे मुनीवर टिटवी ने अंडी घालून खूप दिवस झाले आहेत. परंतु, अजूनही त्याच्यातून पिल्लं बाहेर आले नाहीत. जर काही वेगळा मार्ग असेल, तर तुम्ही आम्हांला सांगावा. जर आमची अंडी वेळेवरच फुटली असती, तर आमची पिल्ले आता मोठी झाली असती.

टिटवी पक्षाच्या जोड्याचं हे बोलणं ऐकून नारद मुनी सुद्धा आश्चर्यात पडतात आणि ते विचार करूं लागतात, की ह्या टिटवीची अंडी फुटत का नाहीत? असा कोणता कारण असू शकतो. तेव्हा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णूंचा ध्यान धरतात. तेव्हा त्यांना एक उपाय सुचतो. तेव्हा नारद मुनी टिटवी आणि टिटव्याला म्हणतात, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुम्ही हा उपाय केलात , तर तुमच्यावर महादेव खूप प्रसन्न होतील आणि जेव्हा महादेव प्रसन्न होतील, तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल अशी गोष्ट देतील.ज्याच्या मदतीने तुम्ही ही अंडी फोडू शकाल. नारद मुनींचे हे म्हणणं ऐकून, टिटवी आणि टिटवा दोघेही नारद मूनिंना म्हणतात, हे मुनीवर तुम्ही आम्हाला लवकर सांगा, तो कोणता उपाय आहे. आम्ही दोघेही मिळून तो उपाय नक्कीच करू.

त्यानंतर नारदमूनी आसन लावून बसतात आणि टिटवीचा जोडा दोघेही नारद मुनींच्या समोर बसतात आणि नारद मुनी उपाय सांगू लागतात. नारद मुनी सांगतात, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही दोघांनीही हरिद्वाराला जावे. हरिद्वाराला जाऊन तुम्ही पूर्ण श्रद्धा भावनेने देवाधिदेव महादेवाची कावड घेऊन या. आणि महादेवाला पूर्ण तना मनाने कावड अर्पण करा. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भावनेने जर तुम्ही हे कार्य करत असाल. तर महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. नारद मुनी पुढे म्हणतात, हे पक्षांनो याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही. इतकं म्हणून नारद मुनी तिथून निघून जातात. त्यानंतर टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये आता आपल्याला हरिद्वाराला जावे लागेल आणि तिथून देवाधिदेव महादेवांसाठी कावड घेऊन यावे लागेल आणि कावड आपण महादेवाला अर्पित करू.

हे वाचा:   हार्पिक ची कमाल फक्त एकदा वापरून पहा? परत नावालाही घरामध्ये उंदीर, घूस दिसणार पण नाहीत उंदीर, घूस घालवण्यासाठी उपाय…..!!

तेव्हा टिटवी म्हणते, आहो आपण हरिद्वारा जाऊ, तिथून कावड सुद्धा घेऊन येऊ.परंतु त्यापूर्वी आपल्याला आपल्या अंड्यांची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. जेणेकरून कुठलाही दुसरा प्राणी आपल्या अंड्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवू नये. तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये जर कुठला दुसरा जीव आपल्या अंड्यांना नुकसान पोहोचवू इच्छित असेल, तर पोहोचवू दे. आज या क्षणाला आपण आपली अंडी महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत. आपल्या पिल्लांना महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत. आज पासून आपण कधीच कुठल्याही वृक्षावर आपली अंडी द्यायची नाही. आपण आपली अंडी फक्त जमिनीवरच द्यायची. दोघेही टिटवा आणि टिटवी पाणी हातात घेऊन असा संकल्प करतात, की आज पासून आपण कधीच झाडावर अंडी द्यायची नाही. आज पासून आपण फक्त जमिनीवर अंडी द्यायची.

असं म्हटलं जातं, की आईची आत्मा खूप मोठी असते. एक आई तिच्या मुलांसाठी काहीही करायला तयार होते. इतकच नाही, तर ती तिचे प्राण सुद्धा अर्पण करायला तयार असते. त्यानंतर टिटवी काही दगड घेते आणि तिच्या अंड्यांच्या सभोवताली ते दगड. ठेवते आणि ओम नमः शिवाय जप करत ते दगड त्या अंड्यांभोवती लावते आणि ओम नमः शिवाय जप करत दोघेही नवरा बायको हरिद्वाराला पोहोचतात. हरिद्वाराला पोहोचल्यावर ते पूर्ण श्रद्धे भावनेने, देवाधिदेव महादेवाचा नामस्मरण करत असतात आणि हरिद्वारावरून कावड उचलून देवाधिदेव महादेवाचा नाम जप करत ती कावड घेऊन पुन्हा येतात आणि कावड महादेवाला अर्पण करतात. दोघांनीही महादेवाला कावड अर्पण केली. परंतु महादेव तरीसुद्धा त्यांच्यासमोर आले नाहीत, त्यांना दर्शन दिले नाहीत. तेव्हा दोघेही नवरा बायको आणखी दुःखी होतात. ते विचार करू लागतात, की आता आम्ही नारद मुनींनी सांगितलेला उपाय सुद्धा केला आहे. तरी सुद्धा महादेवांनी आम्हाला दर्शन दिले नाही.

तेव्हा टिटवा पक्षी टिटवीला म्हणतो, तू काळजी करू नको. देवाधिदेव महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील. आपण आता देवाधिदेव महादेवाची घोर तपश्चर्या करू. आता दोघेही नवरा बायको पुन्हा संकल्प घेतात आणि महादेवाच्या घोर तपश्चर्ये मध्ये बसून राहतात. जेव्हा टिटवा आणि टिटवी महादेवाच्या भक्ती मध्ये बसून राहतात, तेव्हा श्रावण महिन्याचा अंतिम वेळ चालू होती. श्रावण महिना संपणार होता. तेव्हा महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या समोर येतात. महादेव टिटवा आणि टिटवीच्या समोर येतात आणि त्यांना म्हणतात, हे पक्षी आम्ही तुमच्या भक्तीवर खूप प्रसन्न झालो आहोत. तुम्हाला जे काही मागायचं आहे, तो वरदान तुम्ही मागू शकता.

तेव्हा टिटवा आणि टिटवी दोघेही त्यांचे डोळे उघडतात. डोळे उघडतात दोघांनाही देवाधिदेव महादेवांचे दर्शन घडतात. त्यानंतर टिटवा आणि टिटवी दोघेही नवरा बायको महादेवाला म्हणतात, हे प्रभू आम्ही दोन अंड्यांचा जन्म दिला आहे आणि त्या अंड्यांना जन्म देऊन खूप दिवस झाले आहेत. परंतु अजूनही ती अंडी फुटत नाहीत. आम्हाला असा वरदान द्या, ज्याद्वारे आम्ही आमचे अंडी फोडू शकू आणि आमच्या पिल्लांना आम्ही बाहेर काढू शकू. जर आमची अंडी फुटली नाही, तर आमचा वंश इथेच समाप्त होईल, आमचा वंश पुढे वाढणार नाही आणि त्यामुळे आमच्या प्रजातीचा नाव या दुनियेतून नष्ट होईल. त्यामुळे हे प्रभू आम्हाला असा वरदान द्या, ज्या वरदानामुळे आम्ही आमच्या पिल्लांना अंड्यांमधून बाहेर काढू शकतो. त्यानंतर देवाधिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला म्हणतात, हे पक्षी, तुम्ही लक्ष देऊन ऐका. श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी, आमच्या मधून एक धातू बाहेर येईल. जो धातू सर्व धातूंमध्ये श्रेष्ठ असेल. जो धातू सर्वात वजन, सर्वात नरम आणि सर्वात श्रेष्ठ असेल.

हे वाचा:   घरामधील किचनमधील नळ, वॉश बेसिन, बाथरूम मधील खराब झालेले नळ चमकवा आता फक्त मोजून पाच मिनिटांत …..!!

त्याच धातूपासून पारस दगडाची निर्मिती होणार आहे. जो एका लोखंडाला सुद्धा सोन्यामध्ये परावर्तित करू शकतो. हे पक्षांनो, तुम्हाला तो पारस दगड घ्यायचा आहे, जो आमच्या धातूपासून बनणार आहे आणि तोच पारस दगड तुमच्या अंड्यांना फोडू शकतो. त्यानंतर देवाधिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला पारस दगडाची ओळख सांगतात. हा पारस दगड धूम्र रंगाचा असेल, थोडा कठोर असेल, दगडासारखा दिसायला असेल. तुम्हाला फक्त हा दगड मिळवायचा आहे आणि हा दगडाचा मिळवायचा आहे आणि हा दगडाचा तुमच्या अंड्यांना स्पर्श करायचा आहे. . अंड्यांना स्पर्श होताच, तुमची अंडी फुटतील आणि तुमची पिल्लं बाहेर येतील. इतकं म्हणून देवाधीदेव महादेव अंतर ध्यानात विलीन होतात.

श्रावण महिन्याचा अंतिम सोमवार येतो, तेव्हा महादेवांपासून एका धातूची निर्मिती होते व त्यापासून पारस दगडाची निर्मिती होते. तेव्हा टिटवी तो पारस दगड शोधतात आणि चोचित पकडून त्यांच्या अंड्यांजवळ घेऊन येतात आणि त्यांच्या अंड्यांना त्या पारस दगडाचा स्पर्श करतात. जसा पारस दगडाचा स्पर्श त्या अंड्यांना होतो, तेव्हा ती अंडी फुटतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येतात. मित्रांनो अशा प्रकारे टिटवी पंक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली. देवाधिदेव महादेवाच्या असीम कृपेने, टिटवी पक्षाला पारस तगडाची प्राप्ती झाली आहे.

हे पूर्णपणे सत्य आहे, यामध्ये संशय घेण्यासारखं असं काहीच नाही, की टिटवी पक्षाच्या अंड्यांमध्ये पारस दगड नसतो, तर त्यामध्ये पारस दगड नक्की असतो. टिटवी पक्षी त्या पारस दगडाला खूप सांभाळून ठेवते आणि तिच्या पिल्लांना नेहमी त्या दगडाबद्दल सांगून जाते. प्रिय मित्रांनो असं म्हणण्यात आले आहे, की पारस दगडाचं गुपित फक्त टिटवी पक्षाला माहित आहे. ती तिच्या पिल्लांशिवाय दुसऱ्या कुठल्याही सजीवाला किंवा प्राण्याला या पारस दगडाबद्दल काहीच समजू देत नाही. काही लोकांचा असा समज आहे, की टिटवी पक्षी तिच्या घरट्यातच पारस दगड सोडते. परंतु, असं नाही आहे. टिटवी पक्षी खूपच काळजीपूर्वक पारस दगड एका गुप्त जागेवर ठेवून देते. ज्या जागेवर कोणीही पोहोचू शकत नाही. त्या जागेची माहिती फक्त टिटवी पक्षाला असते.

मित्रांनो एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल, की सर्व पशुपक्षी रात्रीच्या वेळी आराम करतात. फक्त ज्यांना दिवसा दिसत नाही. वटवाघुळ, अशा प्रकारचे पक्षी दिवसा आराम करतात. परंतु टिटवी पक्षी एक असा पक्षी आहे, तो दिवसा किंवा रात्री कधीच आराम करत नाही. हा पक्षी नेहमी सतर्क असतो. कारण ह्या पक्षाला नेहमी ही काळजी असते, की ह्याचा पारस दगड कोणी चोरून घेऊन जाऊ नये. त्यामुळे हा रात्री सुद्धा जागा असतो आणि दिवसा सुद्धा जागा असतो. असं सुद्धा म्हटले जाते, की जागून जागून जेव्हा याचे डोळे थकून जातात. डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतो. तेव्हा हा पक्षी त्याच पारस दगडाला डोळ्यांवर लावतो आणि त्यामुळे त्याचे डोळे पुन्हां ताजे-तव्हाने होतात आणि पुन्हा हा पक्षी अनेक महिने पारस दगडाची काळजी घेऊ शकतो, न झोपता काळजी घेऊ शकतो.

अशाप्रकारे ही टिटवी आणि पारस दगडाची कथा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *