मित्रांनो आणि भगिनीनो तुम्हाला माहितच असेल कि जगातील सर्वात भव्यदिव्य, वैभवशाली, श्रीमंत मंदिर म्हणजे दक्षिण भारतातील तिरूपती बालाजी मंदिर होय, आणि आपल्यातील बरेच लोक या मंदिराला भेट देण्यासाठी आवर्जून जात असतात. हे मंदिर जेवढे श्रीमंत, वैभवशाली आणि भव्यदिव्य आहे तेवढेच तिरूपती शहराची सुध्दा भरभराट आपल्याला पहायला मिळत आणि मित्रांनो त्याच प्रमाणे मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या जणू अगणित आहे. तर मित्रांनो दरवर्षी या मंदिराला 5 कोटीहुन अधिक देश विदेशातील लोक भेट देत असतात. तिरूपती बालाजी मंदिर हे संपूर्ण जगात हे त्याच्या श्रीमंतीसाठी, वैभवशाली संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे तसेच अनेक लोक या मंदिरात नवस बोलण्यासाठी येत असतात.
तसेच अनेक लोक अगदी श्रद्धेने कुणी नोटांची बंडलं टाकतं तर कुणी सोन्याच्या विटा-दागिने इत्यादी आणि मित्रांनो यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भक्त हे निनावी टाकतात. तिरुपती संस्थानच्या प्रसिद्ध हुंडी मध्ये अश्या अनेक सामग्रीचं दान अर्पण होत असतं.
येथे जमा झालेले दान मोजण्यासाठीची यंत्रणा अचाट करणारी आहे. कित्येक लोक वेगवेगळ्या चाळण्या घेऊन नोटा मोजत असतात. आणि तसेच आणखी एका गोष्टीचे दान हे होत असते ते म्हणजे केसांचे अनेक भाविक येथे आल्यावर आपले मुंडन करून घेतात आणि ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
मित्रांनो इतकेच काय तर अगदी अनेक महिला सुद्धा येथे आल्यावर आवडीने मुंडन करून घेतात. त्यामुळे या अर्पण केलेल्या केसांचा येते खच पडलेला असतो. मात्र अनेक लोकांना अजून सुद्धा माहित नाही कि आपण दान केलेल्या केसाचे काय होते. आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत.
आपल्यातील अनेक लोकांना हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल, पण आपणांस सांगू इच्छितो कि या केसांचा पुढे जाऊन लिलाव केला जातो. ज्यातून वर्षाला आपण दान केलेल्या केसातून बालाजी मंदिर प्रशासन हे तब्ब्ल 80 ते 100 कोटी रुपये कमावते आणि अशा गोष्टीतून इतक्या कोट्यवधी रुपयाची कमाई करणारे बालाजी हे एकमेव उदाहरण असेल.
तसेच दरवर्षीं हा पैशांचा आकडा बदलत असतो. पण आता आपल्याला असा सुद्धा प्रश्न पडेल कि या केसाचे पुढे जाऊन काय होते. तर आपणास आम्ही सांगू इच्छितो कि या केसांचे कृत्रिम केस बनवले जातात ज्याची मागणी विदेशात खूप मोठ्या प्रमाणत आहे. अशा केसाचा उपयोग हा अनेक चित्रपटांमध्ये नायक, नायिका करत असतात.
शिवाय कर्करोग झालेल्या लोकांसाठी सुद्धा या केसाचा वापर केला जातो.तसेच या मधून मिळालेल्या पैशाचे बालाजी मंदिर प्रशासन हे अनेक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करते आणि येथे दर्शनासाठी आलेल्या लहान मुलांना तसेच स्त्रियांना दिले जाते.
तसेच काही दुधाचे तूप देखील करण्यात येते. ज्याचा उपयोग हा प्रसाद बनवण्यासाठी केला जातो. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की या 200 हजार जुन्या मंदिराकडे हजारो किलो सोनं आहे आणि यापैकी बरंचसं सोनं हे बँकेत जमा आहे.
आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील या मंदिरात तब्बल 9000 किलो सोनं असल्याची माहिती मिळते आहे. तसेच तिरुपती देवस्थानम टीटीडीचं 7235 किलो सोनं हे विविध जमा योजनांमध्ये देशातील दोन राष्ट्रीय बँकांमध्ये जमा आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.