बघा स्वामी आपल्या भक्तांचे कसे नशीब बदलतात सौ जयश्री ताईंना आलेला हा अनुभव वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ; श्री स्वामी समर्थ ….!!

अध्यात्म

मित्रांनो स्वामी हे अशक्य ही शक्य करतात हे आपणा सर्वांनाच माहिती आहे आपल्या पाठीशी कायम स्वामी उभे राहतात त्यामुळे ते भक्तांना म्हणतात की घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजेच आपण कोणत्याही परिस्थितीला लिहून न जाता त्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद आपणाला स्वामी देत असतात स्वामी हे आपल्या भक्तांना कधीच दुखवत नाहीत त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ देत नाहीत तर मित्रांनो स्वामींचा असाच एका ताईंना आलेला अनुभव आज त्या ताई स्वतः आपणाला सांगणार आहे तर मित्रांनो या ताईंना आलेला अनुभव आपण त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेऊया.

मित्रांनो, नमस्कार मी सौ जयश्री पांडुरंग विसपुते.मी माझा अनुभव तुम्हास सांगू इच्छिते. मी आज स्वामींकडे खूप रडले कारण तब्बल आजच्या दिवसाला दहा वर्षांपूर्वीचे दिवाळीचे दिवस मला आठवले. माझ ज्यावेळेस लग्न झाले तेव्हाची माझी दिवाळी आठवली. सर्वच मुली पहिल्या दिवाळीत खूप आनंदाने साडी, दागदागिने घालून आनंदी असतात. आईच्या म्हणजेच माहेरी जातात. त्या खूपच मज्जाच मज्जा करतात.

अनेक चांगल्या तऱ्हेने दिवाळी साजरी करतात. आधीच्या वेळी आमची परिस्थिती अशी होती की साधा आम्ही फराळ सुद्धा घरी बनवू शकत नव्हतो. पण आम्ही दोघां नवरा बायकोंनी कोणाचीही कधीच अपेक्षा केली नाही. विशेष म्हणजे माझ्या पतीने सुद्धा पैशासाठी मला कधी ही कामाला पाठवले नाही.

ते माझी खूप काळजी घेत होते. स्वामी सेवा हीच खरी कमाई हे नेहमी मला ते सांगायचे. म्हणून फक्त स्वामी सेवा आम्ही केली. तेव्हा लक्ष्मीपूजनाला खिचडीचा प्रसाद स्वामींना दाखवला होता. पण आमची स्वामी सेवा ही सुरू होती. दिवस बदलत होते. काही काळानंतर मला प्रसूती झाली. तेव्हाही परिस्थिती अशीच होती. मला कोणीही मदत केली नाही की कोणी आर्थिक मदत केली नाही.

हे वाचा:   ४० दिवसात १००% लग्नाचा योग जुळून येईल? मुलगा मुलगीच लवकर लग्न जमण्यासाठी स्थळे येण्यासाठी फक्त एक मंगळवार आईने करा हा उपाय …!!

पण ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे स्वामी असतात. डिलिव्हरीच्या वेळी सर्व मुलींसोबत आई-वडील, भाऊ असतात पण माझ्यासोबत फक्त आणि फक्त स्वामी शक्ती होती. शेजारच्या ताई स्वामी रुपात माझ्यासोबत होत्या. कदाचित स्वामींनी त्यांना पाठवले होते. आणि त्यामुळे माझी प्रसूती नॉर्मल झाली.

मी अगदी पाचव्या दिवसापासूनच घरकाम करायला लागले. मला अजून पर्यंत अगदी कोरोना सुद्धा दवाखान्यात ऍडमिट व्हायची वेळ आणली नाही. माझ्या मुलाची पण पहिली दिवाळी आमच्यासारखीच. दुकानातील सर्वात कमी दर्जाचे कमी किमतीचे कापड त्याला घेऊन दिले. कारण आम्ही भारी कपडे घेऊ शकत नव्हतो. फक्त आमची स्वामीनारायण व स्वामी सेवा सुरू होती.

समाधानाने दिवाळी आम्ही साजरी करत होतो व त्याही दिवाळीला आम्ही बेसन पोळी स्वामींना प्रसाद म्हणून दिली. हळूहळू सत्यनारायण पूजा, दिवाळीची विशेष सेवा वर्षभरात अनेक सेवा करत गेलो. मी हे कायम करत होते.

आम्ही कोणाकडे कधीच हक्काने काही मागितले नाही.पण मला सांगायला इतका आनंद होतो की, आता आमचे स्वतःचे घर आहे, गाडी आहे, पतिला चांगल्या पदाची नोकरी आहे. हे सर्व स्वामींच्या अखंड सेवेमुळे आम्हाला मिळाले आहे.

हा स्वामी मार्ग मिळाल्यापासून स्वामींनी जणू काही सर्व कारभार व आमची काळजी त्यांच्या हाती घेतली आहे. ही दिवाळी आमच्या जीवनात रोजचे झाली आहे. आता स्वामींनी परिस्थिती खूप चांगली केली आहे. लग्नानंतर तीन वर्ष दिवाळी केलेली खूप काही शिकवून गेली. स्वामींनी माझ्या आयुष्यात ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती असं काही भरभरून दिल.

हे वाचा:   मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांना आलेला स्वामीचा हा सत्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

त्यावेळेस एक एक दिवस आमच्यावर उपाशी राहायची वेळ यायची. पण त्याही वेळेत स्वामी कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन आम्हाला घास भरवत होते.आम्ही फक्त स्वामी माऊलींवर विश्वास ठेवला होता. आज मला खूप रडायला येतं. विशाल दुःख आहे म्हणून नाही तर माझी परिस्थिती स्वामींनी काय होती आणि आता कशी केली हे सर्व पाहून स्वामीं समोर मी रोज एकदा तरी रडते.

स्वामींना पाहून मी भरभरून रडून घेते. स्वामींसमोर रडल्याने मन हलकं होतं. मी अखंड अगदी मला मरण येईपर्यंत स्वामींची सेवा चालू ठेवणार आहे. स्वामी भक्तांनो माझी स्वामी चरणी एकच प्रार्थना आहे स्वामींचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत आणि तुम्हा सर्वांसोबत कायम राहू दे. श्री स्वामी समर्थ स्वामी.

तर मित्रांनो जयश्रीताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही देखील स्वामींची सेवा अशीच मनोभावे करा. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा केल्याने स्वामी आपल्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता भासू देणार नाहीत. म्हणजेच अशक्य ही शक्य करतील स्वामी.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *