मित्रांनो, आजकाल विविध प्रकारचे आजार येत आहेत. त्यामूळे सर्वांनीच आपल्या तब्बेतिची काळजी घेणे गरजेचे आहे.अनेक प्रकारच्या आजारांवर घरगुती व आयुर्वेदिक उपाय असतात त्यामुळे रोग बरे होण्यास मदत होते. अशाच स्ट्रेच मार्क वरती काही घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत.
मित्रांनो, स्ट्रेच मार्क्स..असं म्हटलं की साधारणपणे प्रेग्नंट स्त्रिया आपल्यासमोर येतात. कारण, बऱ्याचदा हे स्ट्रेच मार्क्स केवळ प्रेग्नंट स्त्रियांनाच येतात असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, हे स्ट्रेच मार्क्स कोणत्याही वयात आणि स्त्री, पुरुष अशा दोघांनाही येऊ शकतात. विशेष म्हणजे या खुणा येण्याची अनेक कारणं आहेत. अनेकदा वजन वाढल्यामुळे, शरीरावरील अतिरिक्त मेद यांच्यामुळेही स्ट्रेच मार्क्स येतात. म्हणूनच, पोट, कंबर, मांड्या यांसारख्या ठिकाणी आलेले स्ट्रेच मार्क्स कसे कमी करायचे याचे काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.
मित्रांनो साठी सर्वात पहिला आणि सोपा उपाय आहे तो म्हणजे ऑर्गन ऑइलचा, कारण ऑर्गन ऑइलमध्ये व्हिटामिन इ चं मुबलक प्रमाण असतं. ज्यामुळे त्वचेमधील लवचिकता वाढते. म्हणूनच, ऑर्गन आइलने दररोज मसाज केल्यामुळे त्वचेवर पडलेल्या सुरकुत्या दूर होतात. व कालांतराने स्ट्रेच मार्क्ससुद्धा कमी होतात. त्यानंतर ची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लिंबाचा रस लिंबाचा रस नैसर्गिक ब्लिचिंगचं काम करतो. त्यामुळे स्ट्रेच मार्क कमी करण्यास मदत मिळते. म्हणून दररोज लिंबाचा रस किंवा लिंबाची फोड स्ट्रेच मार्क्सवर लावावी.
त्याचबरोबर मित्रांनो आपण स्टेशन मार्ग घालवण्यासाठी आंडयातील पांढरा भागाचाही उपयोग करू शकतो. अंड्यामधील पांढऱ्या भागामध्ये प्रोटिन्स आणि अमिनो अॅसिडचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे त्वचेसाठी ते एखाद्या सुपरफूड प्रमाणे काम करतं. म्हणूनच, स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर अंड्यामधील पांढरा भाग लावावा.४. बटाट्याचा रस -बटाट्यामध्ये स्टार्च असतं. ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते. म्हणूनच अनेकदा गुडघे, हाताचे कोपरे, मान यांचा काळपटपणा कमी करण्यासाठी बटाट्याचा रस लावण्याचा सल्ला दिला जातो.
त्याचप्रमाणे हा रस ब्लीचसारखंदेखील काम करतो.त्यामुळे पोटावरील स्ट्रेच मार्क्स कमी होतात.
मित्रांनो ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी ऑक्सिडेंट् आणि अन्य पोषक घटकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. या घटकांमुळे डॅमेज झालेली त्वचा रिपेअर होण्यास मदत मिळते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी कोल्ड प्रेस्ड ऑलिव्ह ऑइल लावल्याने हे डाग कमी होतात. मित्रांनो आपण जर साखर, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस मिक्स करुन त्याचा स्क्रब तयार करा त्यानंतर स्ट्रेच मार्क्सवर हे स्क्रब लावा आणि १० मिनीटे मालिश करा. १० मिनीटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ पुसून घ्या.
मित्रांनो त्याचबरोबर स्ट्रेचमार्क्सवर कोरफडीचा गर नियमित लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने सारा भाग स्वच्छ करा. सलग काही आठवडे हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास दूर होईल. तेलाचा मसाज नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.