मित्रांनो, वातावरणातील अनेक बदलामुळे आपणाला खूप सारे रोग आजकाल डोके वर काढताना दिसत आहेत. या आजारांचा आपल्याला खूपच त्रास होत असतो. तर मित्रांनो बऱ्याच लोकांना सर्दी, खोकला, कफ याचा खूपच त्रास होत असतो. जेव्हा आपणाला सर्दी होते तेव्हा आपल्याला श्वास घ्यायला देखील खूपच त्रास होतो. कधी कधी तापामुळे देखील आपले नाक बंद होत असते. तसेच बऱ्याच जणांना खोकला देखील वारंवार होत असतो. खोकून खोकून आपणाला कोणतेही पदार्थ सेवन करणे नकोसे वाटते.
तर मित्रांनो ही सर्दी आपणाला शक्यतो करून आठ दिवसांपर्यंत असावी. आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस जर आपले नाक बंद राहत असेल तर त्यावेळेस आपण मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. बऱ्याच जणांना आहारामध्ये बदल झाल्यामुळे देखील खोकला, सर्दी होत असतो.
तसेच पाण्यामध्ये बदल झाल्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला होतच राहतो. मग त्यावेळी नाकाच्या आत कोणताही द्रव पदार्थ भरला जातो किंवा नाकात सूज येते. यावेळी नाक बंद होते. सर्दी-ताप आला त्यावेळी देखील नाक बंद होत असते. नाकाच्या मार्गात ट्युमर तयार होणे, कोणत्या रासायनिक पदार्थांच्या संपर्कात येणे, अॅलर्जीमुळे सायनस संक्रमणामुळे देखील नाक बंद होऊ शकते.
परंतु मित्रांनो जर आपण यावर काही घरगुती उपाय केले तर आपली जी सर्दी खोकला असेल, कफ असेल तसेच आपले फुफुस देखील स्वच्छ होण्यास मदत होते. तर आज मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे. यामुळे तुम्ही घरच्या घरी आपली सर्दी खोकला कफ यापासून सुटका मिळवू शकता. तर हा उपाय कसा करायचा आहे? कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे? चला तर जाणून घेऊया.
घरातील ड्रॉप्स घातल्यानंतर आपणाला अर्ध्या तासाने किंवा वीस मिनिटांनी आपल्याला आराम मिळतो. परंतु मित्रांनो आपण जर उपायांमध्ये निलगिरी तेलाचा वापर केला तर यामुळे तुमचा जो काही छातीमध्ये कफ आहे तसेच फुफ्फुसांमध्ये काही कफ असेल तर तो देखील मोकळा होण्यास मदत होते.
तर मित्रांनो निलगिरी तेलामध्ये अनेक असे काही घटक आपल्याला पाहायला मिळतात जे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करत असतात. तर मित्रांनो ज्या लोकांना निमोनियाचा ताप झालेला आहे अशा लोकांच्या छातीवर तुम्ही जर या निलगिरी तेलाने मालिश केली तर त्यांचा ताप हा पूर्णतः निघून जातो.
तर आपण या निलगिरी तेलाचा या उपायांमध्ये कसा वापर करायचा आहे जाणून घेऊयात. तर तुम्हाला पहिल्यांदा एक कापसाचा बोळा घ्यायचा आहे थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि त्याचा व्यवस्थित बोळा करून त्यावरती आपल्याला दोन ते तीन थेंब निलगिरी तेलाचे घालायचे आहेत आणि हा जो कापसाचा बोळा घेतलेला आहे हा आपल्या नाकापाशी धरायचा आहे. म्हणजे त्याचा वास आपण घ्यायचा आहे. यामुळे मित्रांनो आपले नाक जे आहे नक्कीच मोकळे होईल.
मित्रांनो 15 वर्षांपुढील जी व्यक्ती असते यांना जर सर्दीचा खूप त्रास जाणवत असेल तर त्यांनी दोन-दोन थेंब आपल्या नाकामध्ये टाकावे. यामुळे त्यांचे नाक दोन ते तीन मिनिटांमध्ये नक्कीच मोकळे होईल.
मित्रांनो हे निलगिरी तेल तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये नक्कीच मिळेल. जर तुम्हाला हे तेल मिळालं नाही तरी तुम्ही निलगिरीच्या झाडाची दहा ते पंधरा पाने आणायचे आहेत आणि ही पाने आपल्याला पाण्यामध्ये उकळवायची आहेत. त्यामध्ये तुम्ही कडुलिंबाची दहा पाने देखील टाकू शकता आणि या पाण्याची तुम्ही वाफ घ्यायची आहे.
आपणाला दिवसभरात दोनदा वाफ घ्यायची आहे.तर निलगिरी तेलाचा जर तुम्ही उपाय करणार असाल हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळा करू शकता. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही आणि हा उपाय तुम्हाला तीन ते सात दिवस सलग करायचा आहे. यामुळे तुमचे जे काही चोंदलेले नाक असेल तसेच फूफुस तुमचे स्वच्छ करायचे असेल, खोकला असेल, छातीतील कफ असेल तर तो पूर्णतः निघून जाईल.
ज्या लोकांना निलगिरी तेलाची एलर्जी आहे अशा लोकांनी हा उपाय करताना डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा. तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमचा सर्दी, खोकला, कफ गायब करायचा असेल तर हा खास घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.