पुरूषांच्या ‘या’ 5 सवयींवर एका मिनिटात आकर्षित होतात महिला…!!

मनोरंजन

मित्रांनो, प्रत्येक पुरुषाला असं वाटत असते की स्त्रीने त्याच्याकडे आकर्षित झाले पाहिजे. पुरूषांच्या ‘या’ 5 सवयींवर अगदी एका मिनिटात इम्प्रेस व आकर्षित होतात महिला, करू लागतात वेड्यासारखं प्रेम..!पुरुषांबद्दल कोणत्या गोष्टी स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करतात? हे आपल्याला माहीत नसते म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

1. चोरट्या नजरेने पाहणे. जेव्हा कोणताही पुरुष आपल्या पार्टनर कडे कधी कधी चोरट्या नजरेने पाहतो तेव्हा त्यातून तिच्या बद्दल त्याच्या मनात सध्या काय सुरु आहे हे दिसून येते पण स्त्रियांना कधी कधी अशा प्रकारचे पाहणे आवडू सुद्धा शकते. असे पाहणे पुरुषांना अधिक एट्रेक्टीव्ह करते असे मत सुद्धा अनेक स्त्रियांनी मांडले आहे. पुरूषांचा हा लुक प्रेमाचा असू शकतो पण या प्रकारचा आय – कॉन्टेक्ट स्त्रियांना त्या पुरुषाकडे खूप जास्त आकर्षित करतो. वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झाले आहे की अशा प्रकारे नजरेतूच प्रेम वाढते.

2. इम्प्रेस करण्याचा प्रयत्न न करणे. आता तुम्ही म्हणाल की ही तर पूर्णपणे उलट गोष्ट आहे. पुरुषांनी तर स्त्रियांना इम्प्रेस करायला हव पण हे प्रत्येक वेळी गरजेच नाही. अनेक स्त्रिया पुरूषांकडे तेव्हा आकर्षित होतात तेव्हा पुरुष इम्प्रेस करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत. नेहमी स्त्रियांच्या मागे लागणारे, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी सतत काही न काही करत असणारे पुरुष हे लाळघोटे समजले जातात. पण या विरुद्ध असणारे पुरुष जंटलमन समजले जातात आणि म्हणून अशा जंटलमन असणाऱ्या पुरूषांकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात.

हे वाचा:   ह्या ७ सवयींनमुळे, लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाहीत? आणि तुम्हाला किंमत पण देत नाहीत ..!!

3. ड्रेसिंग स्टाईल. पुरूषांमधील कोणती गोष्ट स्त्रिया सर्वाधिक नोटीस करतात तर त्यांची ड्रेसिंग स्टाईल. जर एखादा पुरुष फोर्मल कोल्थ्स मध्ये असेल तर त्यातून त्याचा सिरीयसनेस, पावर आणि अधिकारी वृत्ती दिसून येते. जे पुरुष कॅज्युअल कपडे परिधान करणे जास्त पसंत करतात ते जास्त मस्तीखोर आणि मजेशीर स्वभावाचे असतात असे समजले जाते. अशा प्रकारे प्रत्येक पुरुषाची विशिष्ट ड्रेसिंग स्टाईल स्त्रियांवर वेगवेगळी छाप पाडते आणि त्या नुसार त्या पुरूषांकडे आकर्षित होतात.

4. सेन्स ऑफ ह्युमर. सेन्स ऑफ ह्युमर हा कोणत्याही पुरुषाच्या व्यक्तिमत्त्वामधील महत्त्वाचा पैलू मानला जातो. स्त्रियांना खूप जास्त सिरीयस आणि सतत कपाळावर आठ्या घालून फिरणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत. ना त्यांना सतत खिदळत राहणारे आणि टाईमपास करणे पुरुष आवडतात त्या पुरूषांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर शोधतात. स्त्रियांना असे पुरुष आकर्षित करतात जे थोडेस मस्करी करणारे असतील. मध्ये मध्ये हसवतील. अचानक त्यांचा मूड खुलवतील.

हे वाचा:   तुमचा अपमान होत असेल लोक किंमत देत नसतील, तर फक्त या सहा गोष्टी करा, पूर्ण जग तुमचा रिस्पेक्ट करेल…..!!

5. इतरांची काळजी करणे. जे पुरुष इतरांची काळजी करतात, खास करून बाहेरच्या लोकांची, तर असे पुरुष स्त्रियांना खूप जास्त आकर्षित करतात. असे पुरुष हे मनाने खूप चांगले असतात असा त्यांचा समज होतो आणि कोणत्याही मुलीला असाच दयाळू आणि प्रेमळ जोडीदारच हवा असतो. त्यामुळे सतत इतरांची काळजी करणारे, आपल्या शत्रूला सुद्धा वेळ पडली तर मदत करायला धावणारे, कोणी अपमान केला तर त्याच्या बद्दल जास्त राग मनात न ठेवणारे आणि वेळेप्रसंगी सर्वाना साहाय्य करणारे पुरुष स्त्रियांच्या मनामध्ये लगेचच घर करतात.

अशाप्रकारे पुरुषांमध्ये या काही पाच सवय असला तर त्या सवयीमुळे स्त्रिया त्यांच्याकडे लगेच आकर्षित होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *